Your cart is empty now.
इ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.