{"title":"FYBA Semester II","description":"","products":[{"product_id":"व्यावहारिक-मराठी","title":"व्यावहारिक मराठी","description":"\u003cp\u003eया विषयाच्या प्रथम सत्रामध्ये उपयोजित मराठी तर द्वितीय सत्रामध्ये व्यावहरिक मराठी या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला आहे. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीचे स्वरूप व्याप्ती, आवश्यकता व त्याचे महत्त्व तसेच निबंधलेखन, त्याचे स्वरूप, व्याप्ती, निबंधलेखनाचे विविध प्रकार हा घटक क्रमांक एक निहीत केलेला आहे. तर घटक क्रमांक दोनमध्ये अर्ज लेखन आणि पत्रलेखन या दोन संयुक्त घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्यांचे स्वरूप, त्यांचे विविध प्रकार, त्याची आवश्यकता आणि त्याचे व्यावहरिक मराठीच्या अभ्यासक्रमात असणारे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या सर्व घटकांचा यथासांग आढावा घेण्याचा प्रयत्न सदर संदर्भ पुस्तकात केलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकांची आणि अभ्यासकांची मते विचारात घेऊन व्यावहरिक मराठीचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता नमूद केलेली आहे. आज प्रत्येक व्यक्तीला केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्याबरोबरच त्याच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यक्तीला अनेक कौशल्यांची गरज भासते. जसे की, कार्यक्रम संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, या भाषिक कौशल्यांबरोबरच मुद्रित शोधन, टंकलेखन, दुभाषी इत्यादी. प्रशासनिक क्षेत्रामध्ये देखील विविध प्रकारच्या व्यावहरिक मराठीच्या कौशल्यांची आवश्यकता असते. आजचा विद्यार्थी जर उच्चविद्याविभूषित असल्याबरोबरच कौशल्यप्रवण असेल तर त्याला कोणत्याही शिक्षणसंस्थांचे, संस्थापकांचे, उद्योजकांचे किंवा विविध कंपन्यांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. स्वतः आत्मसात केलेल्या कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तो उभे करू शकतो आणि त्या माध्यमातूनच स्वतः स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांना देखील अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. हे केवळ व्यावहरिक मराठीतील विविध कौशल्य हस्तगत केल्यामुळेच शक्य होणार आहे. अर्थात हा विचार करूनच पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत विषयाची निवड केलेली आहे ती सार्थ वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399788769509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavaharik-Marathi_Dr-Haresh-Shelke-1-768x1137.jpg?v=1770878573"},{"product_id":"उपयोजित-आणि-व्यावसायिक-मराठी-लेखन-कौशल्य","title":"उपयोजित आणि व्यावसायिक मराठी लेखन कौशल्य","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399887597797,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Ani-Vyavaharik-Marathi-Kaushalye_Dr-Gitanjali-Chine-1-768x1154.jpg?v=1770880417"},{"product_id":"लोकसंख्या-भूगोल-2","title":"लोकसंख्या भूगोल","description":"\u003cp\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.\u003cbr\u003eसुजान वाचक मित्रहो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाच्या प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते किंबहुना ही त्या देशाची एक महत्त्वाची साधनसंपत्ती मानली जाते. परंतु आधुनिक काळात झालेली लोकसंख्या वाढ ही एक चिंतनाचा विषय ठरत आहे. कारण 21 व्या शतकात जगातील लोकसंख्या वाढीने विस्फोटक रूप धारण केले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे हे लोकसंख्या भूगोलाचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणून लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकामध्ये लोकसंख्या भूगोल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती आणि लोकसंख्या सामग्रीचे प्रकार आणि स्त्रोत, लोकसंख्या घनता, घनतेचे प्रकार आणि लोकसंख्या सिद्धांत, भारताचे व जागतिक लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची संकल्पना आणि 2000 चे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जनन, मर्त्यता आणि स्थलांतर, लोकसंख्या रचना आणि वैशिष्टे – यात लिंगरचना, वयरचना, भारतातील लिंगरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता आणि 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील धार्मिक स्थिती इत्यादी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाचमी मांडणी, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता भूगोलप्रेमी अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470337880293,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksankhya-Bhugol_Dr-Namdev-Gajre_cnvt-1.jpg?v=1772001780"},{"product_id":"संप्रेषण-कौशल्य-आणि-राजकीय-संप्रेषणात-कौशल्य-विकास","title":"संप्रेषण कौशल्य आणि राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eसंप्रेषण कौशल्य व कौशल्य विकास या विषयाचा तीव्र गतीने विकास होत आहे. राजकीय क्षेत्रात राजकीय संप्रेषणाला व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकसित करण्याला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. योग्य राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित न झाल्याने किंवा योग्यरितीने राजकीय संप्रेषण न केल्याने राजकीय क्षेत्रात नुकसान झाल्याची उदाहरणे घडलेली आहेत. राजकीय क्षेत्र हे खूप प्रतिस्पर्धात्मक कटकारस्थानकारक, डावपेचात्मक, व्युव्हरचनात्मक झालेले आहे. प्रतिस्पर्धकाला किंवा विरोधाला संपविण्यासाठी नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा प्रराभूत करण्यासाठी अनेक प्रकारचे गैरसमज, अफवा पसरविले जातात. विरोधकाची किंवा प्रतिस्पर्धकाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो व त्यासाठी राजकीय संप्रेषण कौशल्याचा वापर केला जातो. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी प्रभावी संप्रेषण कौशल्याचा वापर करणे आवश्यक असते. राजकीय संप्रेषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कल, अपेक्षा, अडीअडचणी, प्रश्न जसे समजतात तसाच त्यांचा विरोध किंवा समर्थन सुद्धा समजते. याशिवाय राजकीय प्रतिमा किंवा राजकीय ब्रॅन्ड निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय संप्रेषण कौशल्याचे महत्व अधिक प्रमाणात वाढले आहे.\u003cbr\u003eयादृष्टीने संप्रेषण कौशल्य व राजकीय संप्रेषणात कौशल्य विकास या पुस्तकात अभ्यासपूर्ण उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने साध्या सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. राजकीय संप्रेषण कौशल्य विकसित करण्याच्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470816194789,"sku":null,"price":410.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanpreshan-Kaushalya-V-Rajkiya-Sanpreshanat-Kaushalya-Vikas_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1772014474"},{"product_id":"मानवी-भूगोल-व-प्रात्यक्षिके","title":"मानवी भूगोल व प्रात्यक्षिके","description":"\u003cp\u003eमानवी भूगोल म्हणजे मानवाच्या आणि त्याच्या पर्यावरणाच्या आंतरसंबंधांचा अभ्यास. या शाखेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे आहे, जेणेकरून मानवी विकास आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे स्पष्ट होईल.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास करताना, मानव व निसर्ग यांच्यातील विविध घटकांची समज घेतली जाते. मानवी जीवनशैली, रोजगार, समाजव्यवस्था आणि संस्कृती यामध्ये जैविक, भौगोलिक आणि सामाजिक घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पर्यावरणाशी मानवी समायोजनामुळे पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहिले आहे, तसेच विविध प्रकारच्या पर्यावरणामुळे मानवाचा जीवनशैलीत विविधता येते.\u003cbr\u003eमानवी भूगोल पृथ्वीवरील विविध प्रदेशांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि भौगोलिक भिन्नता समजून घेते. यामध्ये शारीरिक ठेवण, पोषाख, चालीरिती, रूढी, परंपरा आणि मानवाच्या जीवनशैलीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. पर्यावरणीय घटकांच्या प्रभावामुळे मानवाची जीवनशैली आणि संस्कृती विकसित होतात, ज्यामुळे विविधतेला महत्त्व दिले जाते.\u003cbr\u003eमानवी भूगोलाचा अभ्यास केल्याने आपल्याला मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद समजून घेता येतो, जो मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470827925733,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Bhugol-V-Pratyakshike_Dr-Babasaheb-Wani_cnvt-1_fda819a7-d008-4119-8787-ad0f18175b72.jpg?v=1772015403"},{"product_id":"indian-economic-policy-i-ii","title":"Indian Economic Policy – I \u0026 II","description":"\u003cp\u003eIndian Economic Policy – I \u0026amp; II the content of the book is designed to introduce students to the fundamental concepts of the Indian economy, its sectors, and demographic trends.\u003cbr\u003eIn Semester I, Chapter 1 discusses the basics of the economy, focusing on the differences between developed and developing economies, policy-making at various government levels, and recent developments in the Indian economy. Chapter 2 explores the role of agriculture, industry, and the service sector in India, as well as the interdependencies among these sectors and their contributions to India’s economic development. It also covers India’s New Economic Policy.\u003cbr\u003eSemester II focuses on demographic issues in India. Chapter 3 addresses the country’s demographic profile, including occupational distribution, population policies, and poverty, with a focus on types of poverty, causes, and measures for poverty alleviation. The practical component of Semester II involves studying the demographic structure of a specific village, ward, or city, which allows students to apply their learning to real-world situations.\u003cbr\u003eThe purpose of this book is to provide students with a clear understanding of the interconnections between economy and society, population policy, and to encourage critical thinking about socio-economic conditions. The book also compares the Indian economy with other global economies and emphasizes its multidisciplinary relationship with various social sciences.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470829367525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Indian-Economic-Policy-I-II_Prof-Santosh-P-Adhav_cnvt-1.jpg?v=1772015632"},{"product_id":"भारतीय-अर्थव्यवस्था","title":"भारतीय अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eभारतीय अर्थव्यवस्था (भाग 3 व 4) या पुस्तकातील भाग-3 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेतील पंचवार्षिक नियोजन, 12 वी पंचवार्षिक योजनांचे यश-अपयश, नीती आयोग, महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वैशिष्टे, सहकार चळवळ, प्रादेशिक असमतोल, जलव्यवस्थापन इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तर भाग-4 मध्ये तसेच दारिद्य्राच्या संकल्पना, कारणे, बेरोजगारी प्रकार कारणे, दारिद्रय निर्मूलनाचे उपाय व बेरोजगारी निर्मूलनाचे उपाय इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे. तसेच यात प्रात्यक्षिक सबंधित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक तत्वे, प्रात्यक्षिक लिखाण नमुना प्रात्यक्षिके दिलेली असून सोबतच प्रात्यक्षिक गुण विभागणी दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकनाचा नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470841655525,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiya-Arthavyavastha_Prof-Santosh-P-Adhav_cnvt-1.jpg?v=1772016111"},{"product_id":"मानसशास्त्रातील-मूलभूत-तत्वे-आणि-संकल्पना","title":"मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना","description":"\u003cp\u003eशैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506535653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Mulbhut-Tatve-Aani-Sankalpna_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772178405"},{"product_id":"मूलभूत-आणि-बोधात्मक-मानसशास्त्र","title":"मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र (सत्र 1-2)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ् यांनी ‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48480188301541,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Aani-Bodhatmak-Manasshastra_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772283872"},{"product_id":"भूरूपशास्त्राची-मूलतत्त्वे-principle-of-geomorphology","title":"भूरूपशास्त्राची  मूलतत्त्वे  Principle Of Geomorphology","description":"\u003cp\u003e‘भूरूपशास्राची मूलतत्त्वे’ हे क्रमिक पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. भाग-1 च्या विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. हे पुस्तक नवीन राष्ट्रीय धोरणाच्या उद्देशानुसार लिहिले आहे. हे पुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांच्या हाती देताना आनंद होत आहे. विद्यार्थी व शिक्षक वर्ग या पुस्तकाचे निश्चित स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003eभूरूपशास्र भूगोलाची मुख्य शाखा आहे. भूरूपशास्राचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययन-अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात. भूरूपशास्राच्या संकल्पना समजल्यावर भूगोलशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने पाठ्यांशाची मांडणी केली आहे.\u003cbr\u003eसदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेली आहे. त्यात भूरूपशास्राची सामान्य संकल्पना, विदारण, नदी, वारा आणि हिमनदी या कारकांचे भूरूपीय कार्य या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.\u003cbr\u003eभूरूपशास्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 74 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48630984704229,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhurupshastrachiMultattve_DrShankarRChaudhari-1.jpg?v=1774939164"},{"product_id":"मूलभूत-समाजशास्त्रीय-संनकल्पना-basic-concept-of-sociology","title":"मूलभूत समाजशास्त्रीय  संकल्पना  Basic Concept Of Sociology","description":"\u003cp\u003eसमाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासाने महत्व त्याला विविध क्षेत्रातील उपयुक्ततेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. व या विषयाच्या अभ्यासकाला रोजगाराच्या संधीत वाढ होत आहे. तेव्हा समाजशास्त्राचे विद्यार्थ्याला सखोल ज्ञान व्हावे यादृष्टीने समाजशास्त्र उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी असा उद्देश यामागे आहे. समाजशास्त्रीय संकल्पना दैनंदिन व्यवहारातून घेतल्या असल्या तरी त्याचा समाजशास्त्रातील विशिष्ट अर्थ लक्षात यावा याकरीता प्रस्तुत पुस्तक महत्वाचे वाटते.\u003cbr\u003eया छोट्याश्या पुस्तकाच्या माध्यमातून असा दावा करता येणार नाही की संपूर्णपणे समाजशास्त्रीय संकल्पनाची ओळख या पुस्तकाद्वारे होईल. मात्र बी.ए.भाग 1 च्या सत्र 2 च्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार बहुतांशी संकल्पनाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात आला आहे.\u003cbr\u003eनिर्धारित अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असली तरीही, प्राध्यापक बांधव व जिज्ञासू अभ्यासक यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632219697381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MulbhutSamajshastriyaSankalpna_DrBHKirdak-1.jpg?v=1774944034"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/fyba-semester-ii.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}