Your cart is empty now.
समाजशास्त्र या विषयाच्या अभ्यासाने महत्व त्याला विविध क्षेत्रातील उपयुक्ततेमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. व या विषयाच्या अभ्यासकाला रोजगाराच्या संधीत वाढ होत आहे. तेव्हा समाजशास्त्राचे विद्यार्थ्याला सखोल ज्ञान व्हावे यादृष्टीने समाजशास्त्र उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी असा उद्देश यामागे आहे. समाजशास्त्रीय संकल्पना दैनंदिन व्यवहारातून घेतल्या असल्या तरी त्याचा समाजशास्त्रातील विशिष्ट अर्थ लक्षात यावा याकरीता प्रस्तुत पुस्तक महत्वाचे वाटते.
या छोट्याश्या पुस्तकाच्या माध्यमातून असा दावा करता येणार नाही की संपूर्णपणे समाजशास्त्रीय संकल्पनाची ओळख या पुस्तकाद्वारे होईल. मात्र बी.ए.भाग 1 च्या सत्र 2 च्या सुधारीत अभ्यासक्रमानुसार बहुतांशी संकल्पनाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात आला आहे.
निर्धारित अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाची रचना केली असली तरीही, प्राध्यापक बांधव व जिज्ञासू अभ्यासक यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.