1. पर्यावरण अभ्यासाची ओळख :
ओळख, व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व, पर्यावरणाचे घटक, पर्यावरणाचे प्रकार, जनजागृतीची गरज
2. नैसर्गिक संसाधने :
नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण – अ) वन संसाधन – फायदे, कार्य, निर्वनीकरण, वृक्ष संवर्धन, लाकूड कटाई, खाणकाम, जंगले-आदिवासी जीवनावरील परिणाम ब) जलसंसाधन – भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा उपयोग आणि अतिवापर, पूर, अवर्षण, जलविवाद, अवर्षणाची कारणे, परिणाम, उपाय, धरणांचे फायदे-तोटे क) खनिज संपत्ती – उपयोग, परिणाम ड) अन्नधान्य संपदा – समस्या, कारणे, आधुनिक शेती परिणाम इ) ऊर्जासाधने – गरज, पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय ऊर्जासाधने ऊ) भूमी संसाधन – संसाधन, अवमूल्यन, भूमिपात, मृदा धूप, वाळवंटीकरण
3. परिसंस्था :
व्याख्या, संकल्पना व परिसंस्था रचना, परिसंस्थेची रचना आणि कार्ये, परिसंस्थेतील ऊर्जास्त्रोत, अन्नसाखळी, अन्नजाळी, परिस्थितिकी मनोरा, परिस्थितिकीय अनुक्रम, पोषक द्रव्यांचे चक्रीकरण, विविध परिसंस्थांचा अभ्यास – अ) गवताळ परिसंस्था ब) जलीय परिसंस्था क) वाळवंटीय परिसंस्था ड) जंगल परिसंस्था इ) प्राणी संवर्धन
ई) जैवविविधतेचे संरक्षण
4. जैवविविधता व तिचे संवर्धन :
व्याख्या, प्रकार, भारतातील जैव भौगोलिक वितरण, महत्त्व, वैश्विक, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवरील जैवविविधता, जागतिक जैवविविधता, भारतातील जैवविविधता, जैविक विविधतेचे संरक्षण, नामशेष होऊ पाहणाऱ्या सजीवांसाठी महत्त्वाचे प्रकल्प, जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे किंवा जैवविविधतेच्या संवेदनशील जागा, जैवविविधतेवरील संकटे – अधिवासाचा ऱ्हास, वन्यजीवांची शिकार, मानव व वन्य जीवन संघर्ष, भारतातील वनस्पती व प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती, ठरावित भागातच असणाऱ्या जाती-प्रजाती, जैविक विविधता संरक्षणाच्या पद्धती
5. पर्यावरण प्रदूषण :
व्याख्या, दूषितके, प्रदूषणाचे प्रकार, कारणे, परिणाम व उपाय – हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, सागरी प्रदृषण, ध्वनि प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, आण्विक आपत्ती, घन कचरा प्रदूषण; प्रदूषण नियंत्रणातील वैयक्तिक सहभाग
6. पर्यावरणीय आपत्ती :
पर्यावरणीय आपत्तीचे प्रकार – भूकंप, चक्रीवादळ किंवा आवर्त, पूर, अवर्षण, जैविक आपत्ती, भूमिपात
7. सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण :
अशाश्वत विकासाकडून शाश्वत विकासाकडे, खेडी व शहरवासियांच्या ऊर्जासंबंधी समस्या, जलसंवर्धन – पावसाचे पाणी साठविणे, जमिनीत मुरविणे, लोकांचे पुनर्अधिवास व पुनर्वसन समस्या, पर्यावरण नीती, समस्या व निराकरण, वातावरणीय बदल – पृथ्वीच्या तापमानातील वाढ, ओझोन क्षय, आम्ल पर्जन्य, हरितगृह परिणाम, आण्विक अपघात व विनाश, पडीक जमिनीचा विकास, टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त उत्पादनांची निर्मिती, पर्यावरण संरक्षण अधिनियम, पर्यावरण कायदे लागू करण्यात येणाऱ्या अडचणी, जनजागृती
8. मानवी लोकसंख्या आणि पर्यावरण :
लोकसंख्येची वाढ – राष्ट्राराष्ट्रातील फरक, लोकसंख्या विस्फोट, कुटुंबकल्याण कार्यक्रम, पर्यावरण व मानवी आरोग्य, मानवी हक्क – मानवी अधिकार, मूल्य शिक्षण, एचआयव्ही/एड्स, महिला व बालकल्याण, पर्यावरण व मानवी आरोग्यात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका
9. पर्यावरण व्यवस्थापन आणि नियोजन :
पर्यावरणीय व्यवस्थापन व त्याची वैशिष्ट्ये, पर्यावरण नियोजन – व्याख्या, पर्यावरण नियोजनाचे प्रकार, पर्यावरण व्यवस्थापन व नियोजनाची गरज
10. शाश्वतता आणि शाश्वततेचे घटक :
चिरंतनतेची (शाश्वततेची) व्याख्या, विकासाची व्याख्या, शाश्वततेचे घटक – (अ) पर्यावरणीय शाश्वसता (ब) आर्थिक शाश्वसता (क) सामाजिक शाश्वसता
11. शाश्वत विकास :
शाश्वत विकासाची व्याख्या व स्वरूप, शाश्वत विकासाची गरज, शाश्वत विकासाची उद्दीष्टे, विविध परिसंस्थामधील शाश्वत विकास – कृषी व वने परिसंस्था, शाश्वत विकासात व्यक्ती समाजाची भूमिका, स्वच्छ विकास यंत्रणा (तंत्र)
12. क्षेत्रकार्य :
क्षेत्रकार्य म्हणजे काय?, अहवाल लेखन, क्षेत्रकार्याच्या भेटीची ठिकाणे व परिसंस्था, नदी परिसंस्था, तळे परिसंस्था, जंगल अथवा वन क्षेत्र अभ्यास परिसंस्था, कुरण क्षेत्र परिसंस्था, पर्वतीय क्षेत्र परिसंस्था, स्थानिक प्रदूषित भागांना भेट, शहरी भाग, ग्रामीण भाग, औद्योगिक भाग, वृक्ष, कीटक व पक्षी यांचा अभ्यास