Your cart is empty now.
देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.