Your cart is empty now.
आजच्या स्पर्धाच्या युगात जाहिरात कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जाहिरात सेवेला जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील होणारे बदलाचे पडसाद व्यवसायामध्ये दिसून येतात. प्रत्येक उत्पादक आणि व्यावसायिक संस्था आपल्या विक्रय वस्तूंच्या जाहिरातवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतांना दिसून येतात. अलिकडे जाहिरात हा खर्च नसून ती दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते. जाहिरातीमध्ये सुरक्षितता, सौंदर्य, आरोग्य, आत्मविश्वास, प्रेम, वात्सल्य, चिंता इ. क्रयप्रेरणांपैकी योग्य खरेदी प्रेरणाव्दारे आवाहन केले जाते. वस्तू व सेवांची माहिती विविध जाहिरातीच्या माध्यमाद्वारे ग्रहकांच्या मनावर आघात करीत असते. आजच्या स्पर्धायुक्त बाजारपेठेत, वस्तू किंवा सेवांची विक्री वाढावी बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक असते.
Aadhunik Jahirat Tantre