Welcome to Prashant Publications

Rs. 110.00
Availability: 10 left in stock

प्रिय वाचक मित्रांनो, ‘प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती’ (Corporate Law and Secretarial Practice) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती
- +

प्रिय वाचक मित्रांनो, ‘प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती’ (Corporate Law and Secretarial Practice) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुनर्रचित अभ्यासक्रमाअंतर्गत लिहिलेले पुस्तक आपल्याकडे सोपवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक असतो. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या संदर्भात त्याचप्रमाणे विशेष करून सचिवाच्या कार्यपद्धती संदर्भात या पुस्तकांमध्ये पूर्णपणे विवेचन करण्यात आलेले आहे. सचिव हा कोणत्याही प्रकारच्या कंपनीतील उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील महत्त्वाची व्यक्ती असतो. प्रमंडळाच्या यश अपयशामध्ये सचिवाने घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत असतो. खरे तर सचिवाद्वारे कोणत्याही कंपनीची कायदेशीर धुरा सांभाळली जात असते. कंपनी कायदा 1956 नुसार व्यवसायाच्या संदर्भातील संपूर्ण तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर संकल्पनांचा या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 मधील जे ठळक बदल आहेत त्यांचाही अंतर्भाव सदर पुस्तकांमध्ये दिसून येईल. कंपनी कायदा 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्यांपैकी प्रमाणाच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि इतरच्या बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या विकासावर या कायद्याचा परिणाम होत असताना दिसून येतो.