Your cart is empty now.
जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोठा गुंतवणूकदार वारेन बफेट म्हणतात. “जर तुम्हाला झोपण्याच्या वेळेस, झोपेत असताना पैसे कमावण्याची एखादी पद्धत सापडत नसेल तर मग तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावे लागेल.” पैसे कमावण्याच्या संदर्भात एक विधान केले जाते. “जर तुमच्याकडे पैसा आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्ही पैशाला कामाला लावा स्वत:ला नाही.” या दोन्ही विधानांचा अंगुली निर्देश शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय नियोजन करतात, तेव्हा तुमच्यासमोर शेअर बाजार हा सक्षम पर्याय आहे. शेअर बाजारात एकदा का विचारपूर्वक गुंतवणूक केली किंवा शेअर ट्रेडिंग केले की मग शेअर बाजारातील चढ उतारांनी तुमच्या Portfolio मध्ये आणि संपत्तीत वाढ होते. मग तुम्ही काम करा की करु नका, झोपेत असा की जागे असा, सुटीवर असा की पर्यटनाला असा. तुमचा पैसा या बाजारात वाढत जातो आणि तुमच्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतात. पण यासाठी शेअर बाजाराचे बेसिक नॉलेज असणे, अनुभव व कौशल्य असणे, बाजार विश्लेषण करणे यासारखे बौद्धिक श्रम करण्याची तयारी हे सर्व आवश्यक आहे.