Your cart is empty now.
साधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.