Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वनस्पती
शास्त्राच्या BO-123 (OE/GE) ‘अन्न तंत्रज्ञान '(Food Technology) याची मराठी
आवृत्ती आपणासमोर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेता यावे अशी तरतूद आहे.
त्यालाच अनुसरुन वरील विषय जो कला आणि मानव्य विद्याशाखेतील तसेच
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याची मराठी आवृत्ती तयार
करण्याचा हा एक प्रयत्न. हे करत असताना मुळ इंग्रजी शब्दांना मराठी शब्द शोधणे
तसेच या विषयावरील काही मराठी पुस्तके संदर्भासाठी घेऊन या पुस्तकाचे लेखन
करणे हे अतिशय अवघड काम होते. हे पुस्तक लिहिण्यामागचा मुख्य उद्देश राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार विषयाची मूलभूत माहिती मातृभाषेत
प्रदान करणे हा आहे. त्यानुसार आम्ही ही माहिती आणि संकल्पना सोप्या भाषेत
स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्याचे सहज आकलन
होईल. ही नवनिर्मिती नसून विषय चांगल्या प्रकारे समजावा यासाठी केलेला एक
प्रयत्न आहे. प्रत्येक युनिटनंतर प्रश्नांचा देखील समावेश आम्ही केलेला आहे.
जेणेकरुन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत होईल.