{"title":"Library","description":"","products":[{"product_id":"प्राकृतिक-भूगोलाची-मूलतत्त्वे","title":"प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386717188325,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakritik-Bhugolachi-Multattve_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1770721478"},{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"आधुनिक-युरोपचा-इतिहास-इ-स-1780-ते-1945","title":"आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466086723813,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Yuropcha-Itihas-AD-1780-to-1945_cnvt-1.jpg?v=1771920412"},{"product_id":"gg-112-introduction-to-physical-geography-ii-atmosphere-and-hydrosphere","title":"GG-112 | Introduction to Physical Geography – II (Atmosphere and Hydrosphere)","description":"\u003cp\u003eF.Y.B.Sc. | Sem I | GG-112\u003cbr\u003eGEOGRAPHY\u003cbr\u003eIntroduction to Physical Geography – II\u003cbr\u003e(Atmosphere and Hydrosphere)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eIn September 2019 we have published the book ‘Introduction to Physical Geography I – Geomorphology.’ The students and the teachers have overwhelmingly accepted this book. Now we are publishing the second part of the book – ‘Introduction to Physical Geography’–‘Atmosphere and Hydrosphere.’ The present textbook is written on the syllabus of F. Y. B. Sc. Semester I of Savitribai Phule University of Pune. No doubt the book contains cent percent of F. Y. B. Sc. Geography syllabus, but it includes the text matter more than that of thesyllabus.\u003cbr\u003eIt gives us a great pleasure to hand over the book to the students and teachers. We hope students and teachers will welcome this book by heart. The entire book is prepared on computer. All figures in the book are drawn on computer by Prof. Kiran Gavit under the guidance of Prin. Dr. S .R. Chaudhari, therefore, the book has become more illustrative and informative. Most of all important points are explained with the help of figures. This is the special feature of this book. There are in all more than 130 figures. As the figures are drawn by the authors themselves; the content displayed in the figures is more precise andaccurate.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470997336293,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GG-112_Introduction-to-Physical-Geography-II-Atmosphere-and-Hydrosphere_cnvt-1.jpg?v=1772025618"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-शिलावरण-वातावरण-व-जलावरण","title":"प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण व जलावरण)","description":"\u003cp\u003eसूर्य, चंद्र, तारे, ग्रह हे अवघे विश्व कसे निर्माण झाले, ते कोणी निर्माण केले, विश्वाची व्याप्ती किती आहे आदींसारखे अनेक प्रश्न मानवाला सुरुवातीपासून भेडसावत होते. त्याअनुषंगाने प्राचीन काळापासून ते आजतागायत पुष्कळशा परिकल्पना मांडल्या गेल्या आहेत. अठराव्या शतकापासून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात झाली. पृथ्वीचे अंतरंग हे निसर्गातील सर्वात मोठे गुढ आहे. भूकवचात बदल घडवून आणण्याचे कार्य सातत्याने काही शक्ती अथवा प्रेरणा करीत असतात हे स्पष्ट होते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात काल्पनिक रेषा व पृथ्वीची गती, पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय, पृथ्वीचे अंतरंग, खंड व महासागर यांच्या वितरणाविषयीचे सिद्धांत, खडक आणि विदारण, नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य, वातावरण आणि सौरशक्ती, वायुभार आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, सागरतळ, समुद्रप्रवाह इ. विविध मुद्यांचा परामर्ष घेतलेला असून साध्या-सुलभ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol (Shilavaran, Vatavaran V Jalavaran)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477490872549,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol-Bhag-I-II_Dr-Uttam-Nile_cnvt-1.jpg?v=1772177811"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-2","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003cbr\u003eप्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477501817061,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772178222"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-शोध-सारांश","title":"शैक्षणिक संशोधन शोध सारांश","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477754097893,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-2020_cnvt-1.jpg?v=1772189092"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन-1","title":"महाराष्ट्र प्रशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथात महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी, महाराष्ट्र राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये, घटकराज्यांचे विधिमंडळ, न्याय व्यवस्था, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, संविधानात्मक व वैधानिक मंडळे, कल्याणकारी प्रशासन, राज्य नियोजन, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, दबाव गट, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी. त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, महिला चळवळ, सहकार चळवळ, विद्यार्थी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ आदी असून त्यांचा परामर्श घेतला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, त्यांचे संघटन, कार्य याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र निर्मितीपूर्वीच्या सामाजिक, राजकीय स्थितीचा मागोवा घेऊन अद्ययावत स्थितीची सविस्तर माहिती यथायोग्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या स्थितीतील महाराष्ट्र शासन, त्याचे संघटन व कार्य यांचा तपशील देण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477920952549,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1.jpg?v=1772194236"},{"product_id":"संशोधन-पद्धती","title":"संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477931634917,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-2022_Dr-V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772194609"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"ग्रंथालय-आणि-माहितीशास्त्र-कौशल्य","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्य (भाग - १)","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eसदर पुस्तकात दोन घटकांचा समावेश असून प्रथम घटकात लेखकांनी डिजिटल शैक्षणिक संसाधनांतर्गत डेटाबेस, ग्रंथालयातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शैक्षणिक माहितीचे डिजिटल स्त्रोत, मुक्त शैक्षणिक संसाधने यावर सखोल माहिती दिलेली आहे. याशिवाय \"शिक्षण व संशोधनासाठी ग्रंथालय कौशल्ये\" या प्रकरणांतर्गत माहिती साक्षरता, चिकित्सक विचार, संशोधन कौशल्ये, डिजिटल साक्षरता या विविध ग्रंथालयीन कौशल्यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"3\"\u003e\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003eविद्यार्थ्यांना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये भाग-१ या पेपरचा अभ्यास करताना सदर पुस्तक निश्चितच अतिशय उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584837988581,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GranthalayAaniMahitishastraKaushalye_Brijwasi-1.jpg?v=1773833309"},{"product_id":"ग्रंथालय-आणि-माहितीशास्त्र-प्रणाली-भाग-१","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली भाग - १","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Open Elective (OE) मध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाचा समावेश करण्यात आला असून या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा इतिहास, ग्रंथालयांचे कार्य, ग्रंथालयातील सेवा आणि सुविधा यांची माहिती प्राप्त करण्यास मदत होईल. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात असलेले विविध पैलू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे लेखन व संशोधन कार्य करण्यास उपयुक्त ठरू शकेल. शैक्षणिक संदर्भासाठी, ऐतिहासिक पुराव्यासाठी, आधुनिक माहितीच्या शोधासाठी, मनोरंजनासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथालयाचा वापर किती महत्त्वाचा आहे हे देखील विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. सोशल मीडिया आणि इंटरनेट वरून माहिती प्राप्त करण्याऐवजी प्रत्यक्ष अधिकृत माहितीचे स्त्रोत कसे हाताळावे याची देखील समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. ग्रंथालय आपल्या वाचकांसाठी कोणकोणत्या सेवा उपलब्ध करून देतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता येईल. ग्रंथालय व्यवस्थापन ही एक शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती असून यामध्ये विविध तत्वांचा आणि मूल्यांचा वापर करून वाचकांना उच्च दर्जाचे संसाधने आणि सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सर्व बाबींची माहिती या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584865349861,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GranthalayAaniMahitishastraPranali_Brijwasi-1.jpg?v=1773835786"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/library.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}