{"title":"Marathi","description":"","products":[{"product_id":"भाषिक-कौशल्य-विकास","title":"भाषिक कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eभाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451575840997,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/dd.jpg?v=1771584199"},{"product_id":"प्रसारमाध्यमे-आणि-मराठी","title":"प्रसारमाध्यमे आणि मराठी","description":"\u003cp\u003e1990 नंतर आलेल्या ‘खाउजा’ धोरणामुळे परिवर्तन पावलेल्या परिस्थितीने ‘जग हीच एक बाजारपेठ’ बनली. काळ जसा झपाट्याने पुढे जाऊ लागला तसे जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये बदल जाणवू लागले. संगणक-इंटरनेटचे जाळे पसरले. गुगलवर माहितीचा साठा आला. दूरध्वनी ऐवजी मोबाईल आले. त्यांनी स्मार्ट रूप धारण केले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असे सोशल मीडियाचे एक जाळे पसरले. तंत्रज्ञान प्रगत, अद्ययावत झाले. पाहता पाहता या तंत्रज्ञानाने जगातील सर्व क्षेत्रावर पकड मजबूत केली. जग जवळ आणण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती नवतंत्रज्ञानाचे बळ लाभलेली प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांच्या स्वरूप व वापरात होत गेलेल्या या बदलाबरोबरच त्याद्वारे अभिव्यक्त व सादर होणार्या कार्यक्रमांतही बदल होत गेले. या बदलांना अनुसरून जनमनावर गारुड करणार्या या प्रसारमाध्यम क्षेत्रात मोठी उलाढाल होऊ लागली. रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या. स्वाभाविकच, त्याबाबतचे तंत्र व कौशल्ये शिकवण्याची गरज निर्माण झाली. तंत्र व कौशल्ययुक्त कारागिरीला नवकल्पनायुक्त सर्जनशीलतेची, भाषिक कौशल्याची जोड लाभली तर; प्रसारमाध्यमांच्या विस्ताराबरोबरच सांस्कृतिक जीवन संपन्न करणार्या उज्वल भविष्याचेही चित्र उभे राहू शकते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458060169445,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prasarmadhyame-Aani-Marathi_Dr-Ujjwala-Bhor_cnvt-1.jpg?v=1771834059"},{"product_id":"मराठी-पेपर-क्र-2","title":"मराठी पेपर क्र. 2","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474625409253,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Setnet-Paper-No-2-1.jpg?v=1772105180"},{"product_id":"मराठी-पेपर-क्र-3","title":"मराठी पेपर क्र. 3","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474632257765,"sku":null,"price":625.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Setnet-Paper-No-3-1.jpg?v=1772105490"},{"product_id":"बोलीभाषा-संशोधनाच्या-नव्या-दिशा","title":"बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474793705701,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/F-Boli-Bhasha-1.jpg?v=1772108836"},{"product_id":"लेखनकौशल्य-मुद्रितशोधन-व-सर्जनशील-लेखन","title":"लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474924286181,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lekhan-Kaushalya-Mudritshodhan-V-Sarjanshil-Lekhan_Dr-Sandip-Mali_cnvt-1-1.jpg?v=1772111009"},{"product_id":"साहित्यविचार-भारतीय-आणि-पाश्चात्त्य","title":"साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य) Sahityavichar (Bhartiya Aani Pachhatya)","description":"\u003cp\u003eसाहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477366452453,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahityavichar_cnvt-1.jpg?v=1772172773"},{"product_id":"भारताच्या-जडणघडणीत-पंडित-जवाहरलाल-नेहरुंचे-योगदान","title":"भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान","description":"\u003cp\u003eस्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यावर आधुनिक भारताच्या जडणघडणीचा ध्यास ज्या समाजसुधारक नेत्यांनी घेतला होता. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नवभारताची उभारणी लोकशाही मूल्याद्वारे आणि तिची वाटचाल आदर्श पध्दतीने करून भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्य्र, बेकारी, गरीबी, सामाजिक आणि आर्थिक विषमता, अज्ञान, गुलामीची मानसिकता, ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी आपल्या विचार आणि कार्याद्वारे यशस्वी मात केल्याचे दिसते.\u003cbr\u003eआपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी समाजावाद, अलिप्ततावाद, मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयकरण, मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता, शांतता याबरोबरच बहुलधर्मिय, बहुभाषिकतेला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. आज भारतीय लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकशाहीच्या वाटचालीचे आणि यशस्वीतेचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरुंनाच जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatacha Jadanghadnit Pandit Nehrunche Yogdan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478012539109,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartachya-Jadanghadnit-Pandit-Nehrunche-Yogdan_Dr-M-K-Waghmare_cnvt-1.jpg?v=1772197653"},{"product_id":"mahila-aani-kautumbik-hinsachar","title":"Mahila Aani Kautumbik Hinsachar","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48533645230309,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/2_MahilaAaniKautumbikHinsachar-1.jpg?v=1773211069"},{"product_id":"बा-तथागत-ba-tathagata","title":"बा, तथागत ! (Ba, Tathagata !)","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\" aria-busy=\"false\" aria-live=\"off\" id=\"model-response-message-contentr_db3542982dad12f8\" class=\"markdown markdown-main-panel enable-updated-hr-color\"\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eत्यास्ना लिखाईनी सुरुवात दिखाले ग्ये त्ये, त्यास्ना नावे तीन पुस्तके दिखतंस त्यामझार 'एकविसाव्या शतकाकडे' हाऊ कवितास्ना संग्रह, अस्मादिक हाई आत्मकथन, 'अवी आणि मीना' हाई धाकला पोहंस्ससाठी लिखेल कादंबरी यान्हा बाजद त्यास्नी लिखाईनी लाईनच बदली जायेल दिखस. त्यान्हं कारण त्यास्नी तपस्या, त्यास्नं निरखर, त्यास्ना अभ्यास, त्यास्नं वाचन, यान्हा जोडमा त्यास्नं खुदनं आत्मपरिक्षण. मी लिखस कांबं? कोन्हगुंंत लिखसं? आन लिखो काय? नई लिखो. या सवालेस्नी त्यास्ना मनले खिदराई सोडं. हाई खिदरावं हामना पारग्य आन त्यास्ले सापडनी मानवतावादनी वाट. तसं दिखाले ग्ये त्ये त्यास्ना मझार एक भू भारी समीक्षक आन भू न्यायी संशोधक श्येज. यान्हबये लोकभासा, लोकपरंपरा, त्यामहातला त्यास्ना बारीकनिरिख अभ्यास हिरदे जायी बठस. खानदेशनी अहिरानी भासाले जो न्याव दिन्हा तो कोल्हेच इसरता येवाव नई. त्याबाजद ग्रामीण आन दलित साहित्यानी लिखाईबी नजरमा भराई अशीच व्हयेल शे. हाईच नई त्ये न्यारा न्यारा पेपरोसगुंंतनी लिखाईमहाबी त्या मव्हरेज रहायनात. आख्या महाराष्ट्रना आन महाराष्ट्रना भाहिरना इद्यापीठमझार त्यास्नी करतबगारी इद्वत्तानाबये आन लिखाईना बये दिनपरदिन जी वाढो लागी रहायनी त्यान्हा अभिमान श्यानासुरता ग्यानीध्यानीस्ले शंभर टक्का शे. आन रहाई हाऊ इस्वास शे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e▪ प्रस्तावना................................................................१५\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e▪▪ मुलाखत................................................................४१\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003e१. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"3\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : विवेकशील मानव निर्माणाचा पथदर्शी ग्रंथ..........६७\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"4\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4,0,0\"\u003eडॉ. नरेंद्र बापूजी खैरनार\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003e२. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"5\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : मूल्यनिष्ठ भाषांतर....................................७६\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"6\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6,0,0\"\u003eडॉ. फुला बागुल\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7\"\u003e३. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"7\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : मानवतावदी जीवन तत्वज्ञान सांगणारा इवेकी काव्यसंग्रह.............................................................८१\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"8\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8,0,0\"\u003eडॉ. सदाशिव सूर्यवंशी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9\"\u003e४. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"9\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : आपल्या बोलीतील बुद्धतत्त्वज्ञान.....................८९\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"10\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10,0,0\"\u003eडॉ. रमेश सूर्यवंशी, कन्नड\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11\"\u003e५. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"11\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : अहिरानी तत्वज्ञानाचा झरा.........................९४\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"12\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"12,0,0\"\u003eबापू हटकर\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"13\"\u003e६. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"13\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : अहिरानीचा अनमोल दागिना.......................१०३\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"14\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"14,0,0\"\u003eनानाभाऊ माळी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"15\"\u003e७. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"15\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : सामाजिक जागृतीचे महाकाव्य......................११२\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"16\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16,0,0\"\u003eडॉ. प्रकाश शेवाळे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17\"\u003e८. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"17\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : पहिलाच अहिरानी अफाट अनुवाद..............११९\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"18\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18,0,0\"\u003eरमेश धनगर\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19\"\u003e९. \"\u003cb data-index-in-node=\"4\" data-path-to-node=\"19\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : भाषिक अंगाने बहरलेले पहिले अहिरानी विशाल काव्य........................................१२७\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"20\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20,0,0\"\u003eडॉ. विजय शिरसाठ\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21\"\u003e१०. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"21\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : समीक्षणाच्या नजरेतून...............................१३४\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"22\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22,0,0\"\u003eप्राचार्य श्री. देवदत्त दौलतराव बोरसे \u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e११. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"2\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : कवितानी लिखायवर दोन शब्दो....................१४०\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"3\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3,0,0\"\u003eरमेश आप्पा बोरसे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e१२. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"4\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : आंधळेमचा डोळस अनुवाद..........................१४४\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"5\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5,0,0\"\u003eसुभाष वामन अहिरे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003e१३. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"6\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : गोंधळातून बाहेर येण्याचं महाद्वार....................१४८\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"7\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"7,0,0\"\u003eआनंदा लोटन पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"8\"\u003e१४. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"8\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : महात्मा गौतम बुद्धांचं तत्वज्ञान अहिरानीतून प्रथमच...................................................१५३\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"9\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"9,0,0\"\u003eप्रा. सौ. रत्नाताई पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"10\"\u003e१५. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"10\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : भाषांतरित महाकाव्य अहिरानी बोलीचे सौंदर्य वाढविणारे......................................................१६३\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"11\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"11,0,0\"\u003eप्रा. डॉ. माधव कौतिक कदम\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"12\"\u003e१६. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"12\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : मानवतावादाचा नवा हुंकार.........................१६९\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"13\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"13,0,0\"\u003eकैलास पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"14\"\u003e१७. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"14\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : न्यामी कविताना न्यामी अनुवाद....................१७९\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"15\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"15,0,0\"\u003eबापू पिंगळे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"16\"\u003e१८. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"16\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : मानवी मूल्यांची प्रज्ञा............................१८३\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"17\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"17,0,0\"\u003eमहेश सूर्यवंशी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"18\"\u003e१९. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"18\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : पहिलं खंडकाव्य....................................१९३\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"19\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"19,0,0\"\u003eप्रा. भगवान पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"20\"\u003e२०. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"20\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : अहिरानीना इतिहासानं पान..........................२०२\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"21\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"21,0,0\"\u003eप्रकाश पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"22\"\u003e२१. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"22\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : माणसाच्या माणूसपणाचा विचार करणारी कविता .२०८\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"23\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"23,0,0\"\u003eखेमराज धनराज पाटील\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"24\"\u003e२२. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"24\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : खरंखातीनं मानवी हयातीनं जगानं नित्थय शास्त्र उकायीस्नी देल बुद्ध आणि तेस्ना धम्मनी थरी..........२१७\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"25\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"25,0,0\"\u003eडॉ. वाल्मीक हिरामण अहिरे\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-path-to-node=\"26\"\u003e२३. \"\u003cb data-index-in-node=\"5\" data-path-to-node=\"26\"\u003eबा, तथागता!\u003c\/b\u003e\" : मनुष्याला मनुष्य बनविणे या शिक्षणाचा प्रयोग या गौतम बुद्धांच्या व्यक्तिरेखेचे प्रतिबिंब!......................२३१\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"27\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27,0,0\"\u003eश्रीमती लतिकाताई चौधरी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cb data-index-in-node=\"0\" data-path-to-node=\"24\"\u003e\u003c\/b\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c!----\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584530395365,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BaTathagataa-1.jpg?v=1773822367"},{"product_id":"उपयोजित-मराठी-2","title":"उपयोजित मराठी","description":"\u003cp\u003eआधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा उपयोग वाढविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख, भाषा अभिव्यक्ती कौशल्ये, वाचन-लेखन-श्रवण-संवाद क्षमता, तसेच सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587279401189,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/UpyojitMarathi_SachinPatil-1.jpg?v=1773906108"},{"product_id":"लेखन-कौशल्य","title":"लेखन कौशल्य","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"0\"\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/b\u003e राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रथम वर्ष मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून द्वितीय सत्रासाठी \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"294\"\u003e'लेखन कौशल्ये'\u003c\/b\u003e या पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eसदर पुस्तकात \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"13\"\u003eइतिवृत्त लेखन कौशल्य, इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, अहवाल लेखन, अहवालाचे प्रकार, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, अहवाल लेखनाचे तंत्र, भाषण लेखन, भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र, भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, लेखन कौशल्याचे उपयोजनात - इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, भाषण लेखन, कौशल्यांचे उपयोजन\u003c\/b\u003e या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587790942437,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LekhanKaushaley_SachinPatil-1.jpg?v=1773918526"},{"product_id":"व्यावहारिक-कौशल्य-1","title":"व्यावहारिक कौशल्य","description":"\u003cp\u003eउपयोजित मराठीचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. नवसमाज माध्यमांनी भाषेच्या उपयोजनाला व्यापक आयाम दिला. एवढेच नव्हे तर भाषिक कौशल्याचे उपयोजन करून नवे रोजगार निर्माण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासही हेच अपेक्षित आहे. निव्वळ भाषेचा उपयोग करून रोजगार निर्मिती करता येते किंवा रोजगार प्राप्त करता येतो हे उपयोजित मराठीने सिद्ध केलेले आहे. भविष्यात भाषेचे कोणते कौशल्य हस्तगत केले तर आपण यशस्वी होऊ शकतो हे ओळखून मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाची रचना केली. यात मुलाखत लेखन, ग्रंथ परीक्षण, संपादन, स्तंभलेखन, जाहिरात लेखन, निवेदन, संहिता लेखन, बातमी लेखन इत्यादी घटक नेमून अभ्यास मंडळाने आधुनिक जीवनाची नस ओळखली यात काही शंका नाही. तसा विचार केला तर वरील घटक हे अभ्यासक्रमात समाविष्ट होतेच आणि काळानुसार त्याचे स्वरूपही ठरलेले होते. आता काळ बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जग अस्तित्वात आलेले आहे. झपाट्याने यंत्रात तंत्रात क्रांती होत आहे. माध्यमांचे स्वरूप बदलल्याने वरील घटकांच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. वरील घटक लेखनाचे तंत्रही बदललेले आहे. हा बदल लक्षात घेऊनच सदर पुस्तकातील अभ्यास घटकांची रचना केलेली आहे. त्यामुळे वाचक, अभ्यासकांसाठी हे पुस्तक नवीन आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587866505445,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VyavharikKaushalya-1.jpg?v=1773921297"},{"product_id":"खान्देश-काव्यप्रबोधन-समीक्षा","title":"खान्देश काव्यप्रबोधन समीक्षा","description":"\u003cp\u003e'कविता' हा चिंतनशील वाड्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कवीच्या खाजगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तिक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातीत असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतीके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाड्मय प्रकाराचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलीकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा 'टेक्नोसॅव्ही' होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खाजगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरिता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592120185061,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KandeshKavyaprabodh_KBCNMU-1.jpg?v=1774003841"},{"product_id":"कर्मयोगशास्त्र-लोकमान्य-टिळक-लिखीत-श्रीमद्भगवद्गीता-रहस्य-खंड-1-सारांश","title":"कर्मयोगशास्त्र (लोकमान्य टिळक लिखीत श्रीमद्भगवद्गीता रहस्य खंड 1 - सारांश)","description":"\u003cp\u003eलोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे चिकित्सक, जिज्ञासू, विद्वान, विवेकी, धाडसी आणि समर्पित संशोधक असल्याचे श्रीमद्भगवद्गीता रहस्य खंड-1 व खंड-2 अभ्यासल्यावर लक्षात येते. हा अभ्यास करतांना अभ्यासकाने दुराग्रह व पुर्वग्रह बाजूला ठेवावेत, ज्ञानमुलक आणि भक्तिप्रधान असावे, निष्काम कर्मयोग साधण्यासाठीचे शुद्ध अंत:करण अभ्यासकात असावे. असे असले तरच श्रीमद्भगवद्गीता रहस्यामागील रहस्य उलगडू शकते. सांप्रदायिक टिकाकारांनी कर्मयोग गौण ठरवून गीतेची जी तात्पर्ये वर्णिली ती यथार्थ नसून ‘ज्ञानभक्तियुक्त कर्मयोग’ हेच गीतेचे तात्पर्य असल्याचे लोकमान्य टिळकांनी सिद्ध केले आहे. ज्ञानाशिवाय होणाऱ्या श्रौत-स्मार्त इत्यादी तांत्रिक क्रेियेने बुध्दिमान मनुष्याचे समाधान होत नाही; आणि उपनिषदांत सांगितलेला धर्म केवळ ज्ञानमय असल्यामुळे सामान्य लोकांस त्याचे आकलन होणे कठीण असते; शिवाय सन्यासमार्ग लोकसंग्रहास विरुद्ध असल्याचे दिसते. म्हणून बुद्धि (ज्ञान), प्रेम (भक्ति) व कर्तृत्व या सर्वांचा योग्य मेळ घालून मोक्षाला अंतर न पडता ज्याने लोकव्यवहारही सुरळीत चालेल असा ज्ञानमुलक, भक्तिप्रधान व आमरणान्त निष्काम कर्मयोग धर्म भगवंतांने गीतेत उपदेशिला आहे.\u003cbr\u003eलो. टिळक कठोर कर्मयेागी होते म्हणून त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य (खंड 1) व टिका (खंड 2) लिहल्या. त्यांनाच त्यांनी कर्मयोगशास्त्र असे नाव दिले. एकच कर्म करण्याचे अनेक योग, साधने किंवा मार्ग असतात. यापैकी पराकाष्ठेचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल की नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते व ते का उत्पन्न होतात, जो मार्ग आपण चांगला समजतो तो चांगला का किंवा ज्यास वाईट म्हणतो तो वाईट का आणि हा चांगले वाईटपणा कोणी व कोणत्या धोरणाने ठरवावा, इत्यादी गोष्टी ज्या शास्त्राच्या आधारे निश्चित करता येतात त्यास ‘कर्मयोगशास्त्र’ किंवा ‘योगशास्त्र’ म्हणतात. श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र खंड 1 च्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय लेखक लोकमान्य टिळकांचे आहे. या ग्रंथातील आध्यात्मिक ज्ञान जनसामान्यांपर्यंत संक्षिप्त स्वरुपात पोहचवण्यासाठी केलेला हा प्रायोगिक प्रयत्न आहे. समाजात मुल्यांची रुजवन करण्याच्या शुद्ध हेतूने विद्यार्थी व अभ्यासक या नात्याने मनापासून, विवेकनिष्ठपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48763668365541,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/karmyogshastracoverpage-1.jpg?v=1775713943"},{"product_id":"प्रज्ञावंत-प्रतिभा-आणि-सर्जनशीलतेचा-आविष्कार","title":"प्रज्ञावंत - प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही तर ते संवादासाठी आहे. तुमच्या अनुभवांनी ते पूर्ण होईल, तुमच्या प्रतिप्रश्नांमुळे ते जिवंत राहील, आणि तुमच्या प्रयोगांनी त्याचा अर्थ बदलत जाईल.\u003cbr\u003eया पुस्तकात आपण प्रतिभेची मानसशास्त्रीय व्याख्या, प्रतिभा ओळखण्याची प्रक्रिया, सर्जनशीलतेची वाढ घडवणारे घटक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांची भूमिका, प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व घडवणारी विचारसरणी यांचा सरळ व अनुभवाधारित उलगडा करणार आहोत. हे पुस्तक उपदेश नव्हे, प्रेरणा आहे. हे तत्त्वज्ञान नव्हे तर अनुभवातून संचित झालेले वास्तव आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक केवळ प्रतिभावंतांसाठी नाही, तर प्रतिभा शोधणाऱ्यांसाठी आहे. या पुस्तकाचे अंतिम उद्दिष्ट आहे की “प्रत्येक मनुष्य प्रतिभावंत बनू शकतो, जर तो स्वतःला ओळखण्याचे साहस करेल.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश फक्त प्रज्ञावंत घडण्याची प्रक्रिया हे सांगणे नाही. उद्देश आहे, प्रज्ञावंत कसा घडतो, आणि त्याचे समाजासाठी काय योगदान असते याचा मागोवा घेणे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचकाला स्वतःला ओळखण्याच्या आणि विस्तारण्याच्या दिशेने आमंत्रण आहे - जिथे निरीक्षण हे साधन आहे, अनुभव ही प्रयोगशाळा आहे, अपयश हे शिक्षक आहे आणि जीवन हेच विद्यापीठ आहे. \u003cbr\u003eही प्रस्तावना माझी वैयक्तिक भावना नसून, प्रत्येक साध्या व्यक्तीतून महानतेचा अंकुर जागवण्याचा प्रयत्न आहे. जर वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, विचार पेटला, किंवा एखादा नवीन प्रयोग सुरू झाला, तर या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाल्याचे मला पुरेपूर समाधान देईल. माझी खात्री आहे की, हे पुस्तक तुमच्या विचारांना दिशा देईल, प्रश्न निर्माण करेल आणि तुमच्या अंतर्मनातील सुप्त प्रतिभेला जागृत करण्यास मदत करेल. चला तर, आत्मान्वेषणाच्या या प्रवासाला सुरुवात करूया: प्रतिभेपासून सर्जनशीलतेकडे, आणि सर्जनशीलतेपासून प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्वाकडे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49461644165349,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradnyavant_pratibhaaanisarjanshiltechaavishkar_L.A.Patil-1.jpg?v=1780297441"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/marathi.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}