{"title":"Marathi","description":"","products":[{"product_id":"भाषिक-कौशल्य-विकास","title":"भाषिक कौशल्य विकास","description":"\u003cp\u003eभाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451575840997,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/dd.jpg?v=1771584199"},{"product_id":"प्रसारमाध्यमे-आणि-मराठी","title":"प्रसारमाध्यमे आणि मराठी","description":"\u003cp\u003e1990 नंतर आलेल्या ‘खाउजा’ धोरणामुळे परिवर्तन पावलेल्या परिस्थितीने ‘जग हीच एक बाजारपेठ’ बनली. काळ जसा झपाट्याने पुढे जाऊ लागला तसे जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये बदल जाणवू लागले. संगणक-इंटरनेटचे जाळे पसरले. गुगलवर माहितीचा साठा आला. दूरध्वनी ऐवजी मोबाईल आले. त्यांनी स्मार्ट रूप धारण केले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असे सोशल मीडियाचे एक जाळे पसरले. तंत्रज्ञान प्रगत, अद्ययावत झाले. पाहता पाहता या तंत्रज्ञानाने जगातील सर्व क्षेत्रावर पकड मजबूत केली. जग जवळ आणण्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली ती नवतंत्रज्ञानाचे बळ लाभलेली प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांच्या स्वरूप व वापरात होत गेलेल्या या बदलाबरोबरच त्याद्वारे अभिव्यक्त व सादर होणार्या कार्यक्रमांतही बदल होत गेले. या बदलांना अनुसरून जनमनावर गारुड करणार्या या प्रसारमाध्यम क्षेत्रात मोठी उलाढाल होऊ लागली. रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या. स्वाभाविकच, त्याबाबतचे तंत्र व कौशल्ये शिकवण्याची गरज निर्माण झाली. तंत्र व कौशल्ययुक्त कारागिरीला नवकल्पनायुक्त सर्जनशीलतेची, भाषिक कौशल्याची जोड लाभली तर; प्रसारमाध्यमांच्या विस्ताराबरोबरच सांस्कृतिक जीवन संपन्न करणार्या उज्वल भविष्याचेही चित्र उभे राहू शकते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458060169445,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prasarmadhyame-Aani-Marathi_Dr-Ujjwala-Bhor_cnvt-1.jpg?v=1771834059"},{"product_id":"मराठी-पेपर-क्र-2","title":"मराठी पेपर क्र. 2","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474625409253,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Setnet-Paper-No-2-1.jpg?v=1772105180"},{"product_id":"मराठी-पेपर-क्र-3","title":"मराठी पेपर क्र. 3","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474632257765,"sku":null,"price":625.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathi-Setnet-Paper-No-3-1.jpg?v=1772105490"},{"product_id":"बोलीभाषा-संशोधनाच्या-नव्या-दिशा","title":"बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474793705701,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/F-Boli-Bhasha-1.jpg?v=1772108836"},{"product_id":"लेखनकौशल्य-मुद्रितशोधन-व-सर्जनशील-लेखन","title":"लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474924286181,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lekhan-Kaushalya-Mudritshodhan-V-Sarjanshil-Lekhan_Dr-Sandip-Mali_cnvt-1-1.jpg?v=1772111009"},{"product_id":"साहित्यविचार-भारतीय-आणि-पाश्चात्त्य","title":"साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य) Sahityavichar (Bhartiya Aani Pachhatya)","description":"\u003cp\u003eसाहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477366452453,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahityavichar_cnvt-1.jpg?v=1772172773"},{"product_id":"भारताच्या-जडणघडणीत-पंडित-जवाहरलाल-नेहरुंचे-योगदान","title":"भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान","description":"\u003cp\u003eस्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यावर आधुनिक भारताच्या जडणघडणीचा ध्यास ज्या समाजसुधारक नेत्यांनी घेतला होता. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नवभारताची उभारणी लोकशाही मूल्याद्वारे आणि तिची वाटचाल आदर्श पध्दतीने करून भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्य्र, बेकारी, गरीबी, सामाजिक आणि आर्थिक विषमता, अज्ञान, गुलामीची मानसिकता, ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी आपल्या विचार आणि कार्याद्वारे यशस्वी मात केल्याचे दिसते.\u003cbr\u003eआपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी समाजावाद, अलिप्ततावाद, मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयकरण, मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता, शांतता याबरोबरच बहुलधर्मिय, बहुभाषिकतेला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. आज भारतीय लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकशाहीच्या वाटचालीचे आणि यशस्वीतेचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरुंनाच जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatacha Jadanghadnit Pandit Nehrunche Yogdan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478012539109,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartachya-Jadanghadnit-Pandit-Nehrunche-Yogdan_Dr-M-K-Waghmare_cnvt-1.jpg?v=1772197653"},{"product_id":"mahila-aani-kautumbik-hinsachar","title":"महिला आणि कौटुंबिक हिंसाचार","description":"\u003cp\u003eसमाजातील प्रत्येक जाती, धर्म तसेच आर्थिक आणि सामाजिक स्तरातील\u003cbr\u003eकुटूंबामध्ये स्त्रियांवर हिंसाचार होतो. मारहाण करणे, शारिरीक दुखापत करणे\u003cbr\u003eम्हणजेच हिंसाचार अशी आपल्याकडे समजुत आहे. परंतु महिलांवरील हिंसा\u003cbr\u003eकेवळ शारिरीक दुखापत किंवा मारहाणीपुरती मर्यादित नसून त्याबरोबरच मानसिक,\u003cbr\u003eभावनिक, शाब्दीक, लैंगिक, आर्थिक अशा प्रकारची हिंसा देखील केली जाते.\u003cbr\u003eकुटूंबाचा केंद्रबिंदू असलेली महिला आज घरगुती छळाच्या ओझ्याखाली दबलेली\u003cbr\u003eदिसून येते. पतीची व्यसनाधिनता, त्याने घातलेले निर्बंध, पितृसत्ताक पद्धतीमुळे\u003cbr\u003eआलेली अरेरावी, पुरूषप्रधान संस्कृतीमुळे दुखावलेला पुरूषी अहंकार आणि\u003cbr\u003eआपल्या समाजात अजुनही कमीपणा घेण्याची स्त्रियांची मानसिकता, स्त्रीयांची\u003cbr\u003eसहनशील वृत्ती हे सर्व घटक महिलांवर कौटुंबिक हिंसाचार वाढण्यास कारणीभूत\u003cbr\u003eआहेत. स्त्रियांना त्यांच्या ‘स्त्रित्वामुळे’ म्हणजे स्त्री असण्यामुळेच निकटवर्तिंयाकडून\u003cbr\u003eहोणाऱ्या अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक, भावनिक, शाब्दीक\u003cbr\u003eतसेच आर्थिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपल्या समाजात\u003cbr\u003eदिवसेंदिवस स्त्रीयांचे एकुण लोकसंख्येतील प्रमाण घटत चालले आहे. याशिवाय\u003cbr\u003eपरिव्यक्ता, घटस्फोटीत, संकटग्रस्त, हुंडाग्रस्त महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत\u003cbr\u003eआहे. परिणामी स्त्रीयांवर होणारा घरगुती हिंसाचाराची ‘सामाजिक समस्या’ म्हणून\u003cbr\u003eव्याप्ती वाढतेच आहे.\u003cbr\u003eसदर विषयावर आजवर फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे नवीन तथ्य,\u003cbr\u003eपैलू उजेडात आणणे गरजेचे आहे. ‘महिला आणि कौटूंबिक हिंसाचार’ या पुस्तकाने\u003cbr\u003eनवीन पैलू उजेडात येऊन महिलांच्या समस्यांची गुंतागुंत समाजासमोर परिपूर्णरित्या\u003cbr\u003eयेईल. संशोधन करू इच्छिणारे संशोधक, जिज्ञासू विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवी\u003cbr\u003eसंस्था, सामाजिक कार्यकर्ते, शासन अधिकारी, पोलीस यंत्रणा, समुपदेशक\u003cbr\u003eयांचेबरोबर सर्वसामान्य जनमानसाला देखील सदरील पुस्तकाचा उपयोग होईल\u003cbr\u003eयाची खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48533645230309,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/2_MahilaAaniKautumbikHinsachar-1.jpg?v=1773211069"},{"product_id":"बा-तथागत-ba-tathagata","title":"बा, तथागत ! (Ba, Tathagata !)","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown markdown-main-panel enable-updated-hr-color\" id=\"model-response-message-contentr_db3542982dad12f8\" aria-live=\"off\" aria-busy=\"false\" dir=\"ltr\"\u003e\n\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eत्यास्ना लिखाईनी सुरुवात दिखाले ग्ये त्ये, त्यास्ना नावे तीन पुस्तके दिखतंस त्यामझार 'एकविसाव्या शतकाकडे' हाऊ कवितास्ना संग्रह, अस्मादिक हाई आत्मकथन, 'अवी आणि मीना' हाई धाकला पोहंस्ससाठी लिखेल कादंबरी यान्हा बाजद त्यास्नी लिखाईनी लाईनच बदली जायेल दिखस. त्यान्हं कारण त्यास्नी तपस्या, त्यास्नं निरखर, त्यास्ना अभ्यास, त्यास्नं वाचन, यान्हा जोडमा त्यास्नं खुदनं आत्मपरिक्षण. मी लिखस कांबं? कोन्हगुंंत लिखसं? आन लिखो काय? नई लिखो. या सवालेस्नी त्यास्ना मनले खिदराई सोडं. हाई खिदरावं हामना पारग्य आन त्यास्ले सापडनी मानवतावादनी वाट. तसं दिखाले ग्ये त्ये त्यास्ना मझार एक भू भारी समीक्षक आन भू न्यायी संशोधक श्येज. यान्हबये लोकभासा, लोकपरंपरा, त्यामहातला त्यास्ना बारीकनिरिख अभ्यास हिरदे जायी बठस. खानदेशनी अहिरानी भासाले जो न्याव दिन्हा तो कोल्हेच इसरता येवाव नई. त्याबाजद ग्रामीण आन दलित साहित्यानी लिखाईबी नजरमा भराई अशीच व्हयेल शे. हाईच नई त्ये न्यारा न्यारा पेपरोसगुंंतनी लिखाईमहाबी त्या मव्हरेज रहायनात. आख्या महाराष्ट्रना आन महाराष्ट्रना भाहिरना इद्यापीठमझार त्यास्नी करतबगारी इद्वत्तानाबये आन लिखाईना बये दिनपरदिन जी वाढो लागी रहायनी त्यान्हा अभिमान श्यानासुरता ग्यानीध्यानीस्ले शंभर टक्का शे. आन रहाई हाऊ इस्वास शे.\u003c\/p\u003e\n\u003cul data-path-to-node=\"22\"\u003e\n\u003cli style=\"list-style-type: none;\"\u003e\n\u003cul data-path-to-node=\"27\"\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp data-path-to-node=\"27,0,0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cb data-path-to-node=\"24\" data-index-in-node=\"0\"\u003e\u003c\/b\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c!----\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48584530395365,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BaTathagataa-1.jpg?v=1773822367"},{"product_id":"उपयोजित-मराठी-2","title":"उपयोजित मराठी","description":"\u003cp\u003eआधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता, कला आणि साहित्य या सर्व क्षेत्रांत मराठी भाषेचा उपयोग वाढविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची ओळख, भाषा अभिव्यक्ती कौशल्ये, वाचन-लेखन-श्रवण-संवाद क्षमता, तसेच सांस्कृतिक व नैतिक मूल्यांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587279401189,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/UpyojitMarathi_SachinPatil-1.jpg?v=1773906108"},{"product_id":"लेखन-कौशल्य","title":"लेखन कौशल्य","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"0\"\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/b\u003e राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुनर्रचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली आहे. प्रथम वर्ष मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून द्वितीय सत्रासाठी \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"294\"\u003e'लेखन कौशल्ये'\u003c\/b\u003e या पेपरचा समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eसदर पुस्तकात \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"13\"\u003eइतिवृत्त लेखन कौशल्य, इतिवृत्त लेखन, सभेचे आयोजन, इतिवृत्ताचे प्रकार, इतिवृत्त लिहिताना घ्यावयाची काळजी, अहवाल लेखन, अहवालाचे प्रकार, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, अहवाल लेखनाचे तंत्र, भाषण लेखन, भाषण लेखनाचे स्वरूप व तंत्र, भाषण लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे, लेखन कौशल्याचे उपयोजनात - इतिवृत्त लेखन, अहवाल लेखन, भाषण लेखन, कौशल्यांचे उपयोजन\u003c\/b\u003e या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587790942437,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/LekhanKaushaley_SachinPatil-1.jpg?v=1773918526"},{"product_id":"व्यावहारिक-कौशल्य-1","title":"व्यावहारिक कौशल्य","description":"\u003cp\u003eउपयोजित मराठीचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. नवसमाज माध्यमांनी भाषेच्या उपयोजनाला व्यापक आयाम दिला. एवढेच नव्हे तर भाषिक कौशल्याचे उपयोजन करून नवे रोजगार निर्माण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासही हेच अपेक्षित आहे. निव्वळ भाषेचा उपयोग करून रोजगार निर्मिती करता येते किंवा रोजगार प्राप्त करता येतो हे उपयोजित मराठीने सिद्ध केलेले आहे. भविष्यात भाषेचे कोणते कौशल्य हस्तगत केले तर आपण यशस्वी होऊ शकतो हे ओळखून मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाची रचना केली. यात मुलाखत लेखन, ग्रंथ परीक्षण, संपादन, स्तंभलेखन, जाहिरात लेखन, निवेदन, संहिता लेखन, बातमी लेखन इत्यादी घटक नेमून अभ्यास मंडळाने आधुनिक जीवनाची नस ओळखली यात काही शंका नाही. तसा विचार केला तर वरील घटक हे अभ्यासक्रमात समाविष्ट होतेच आणि काळानुसार त्याचे स्वरूपही ठरलेले होते. आता काळ बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जग अस्तित्वात आलेले आहे. झपाट्याने यंत्रात तंत्रात क्रांती होत आहे. माध्यमांचे स्वरूप बदलल्याने वरील घटकांच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. वरील घटक लेखनाचे तंत्रही बदललेले आहे. हा बदल लक्षात घेऊनच सदर पुस्तकातील अभ्यास घटकांची रचना केलेली आहे. त्यामुळे वाचक, अभ्यासकांसाठी हे पुस्तक नवीन आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587866505445,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VyavharikKaushalya-1.jpg?v=1773921297"},{"product_id":"खान्देश-काव्यप्रबोधन-समीक्षा","title":"खान्देश काव्यप्रबोधन समीक्षा","description":"\u003cp\u003e'कविता' हा चिंतनशील वाड्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कवीच्या खाजगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तिक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातीत असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतीके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाड्मय प्रकाराचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलीकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा 'टेक्नोसॅव्ही' होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खाजगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरिता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592120185061,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KandeshKavyaprabodh_KBCNMU-1.jpg?v=1774003841"},{"product_id":"कर्मयोगशास्त्र-लोकमान्य-टिळक-लिखीत-श्रीमद्भगवद्गीता-रहस्य-खंड-1-सारांश","title":"कर्मयोगशास्त्र (लोकमान्य टिळक लिखीत श्रीमद्भगवद्गीता रहस्य खंड 1 - सारांश)","description":"\u003cp\u003eलोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे चिकित्सक, जिज्ञासू, विद्वान, विवेकी, धाडसी आणि समर्पित संशोधक असल्याचे श्रीमद्भगवद्गीता रहस्य खंड-1 व खंड-2 अभ्यासल्यावर लक्षात येते. हा अभ्यास करतांना अभ्यासकाने दुराग्रह व पुर्वग्रह बाजूला ठेवावेत, ज्ञानमुलक आणि भक्तिप्रधान असावे, निष्काम कर्मयोग साधण्यासाठीचे शुद्ध अंत:करण अभ्यासकात असावे. असे असले तरच श्रीमद्भगवद्गीता रहस्यामागील रहस्य उलगडू शकते. सांप्रदायिक टिकाकारांनी कर्मयोग गौण ठरवून गीतेची जी तात्पर्ये वर्णिली ती यथार्थ नसून ‘ज्ञानभक्तियुक्त कर्मयोग’ हेच गीतेचे तात्पर्य असल्याचे लोकमान्य टिळकांनी सिद्ध केले आहे. ज्ञानाशिवाय होणाऱ्या श्रौत-स्मार्त इत्यादी तांत्रिक क्रेियेने बुध्दिमान मनुष्याचे समाधान होत नाही; आणि उपनिषदांत सांगितलेला धर्म केवळ ज्ञानमय असल्यामुळे सामान्य लोकांस त्याचे आकलन होणे कठीण असते; शिवाय सन्यासमार्ग लोकसंग्रहास विरुद्ध असल्याचे दिसते. म्हणून बुद्धि (ज्ञान), प्रेम (भक्ति) व कर्तृत्व या सर्वांचा योग्य मेळ घालून मोक्षाला अंतर न पडता ज्याने लोकव्यवहारही सुरळीत चालेल असा ज्ञानमुलक, भक्तिप्रधान व आमरणान्त निष्काम कर्मयोग धर्म भगवंतांने गीतेत उपदेशिला आहे.\u003cbr\u003eलो. टिळक कठोर कर्मयेागी होते म्हणून त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य (खंड 1) व टिका (खंड 2) लिहल्या. त्यांनाच त्यांनी कर्मयोगशास्त्र असे नाव दिले. एकच कर्म करण्याचे अनेक योग, साधने किंवा मार्ग असतात. यापैकी पराकाष्ठेचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल की नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते व ते का उत्पन्न होतात, जो मार्ग आपण चांगला समजतो तो चांगला का किंवा ज्यास वाईट म्हणतो तो वाईट का आणि हा चांगले वाईटपणा कोणी व कोणत्या धोरणाने ठरवावा, इत्यादी गोष्टी ज्या शास्त्राच्या आधारे निश्चित करता येतात त्यास ‘कर्मयोगशास्त्र’ किंवा ‘योगशास्त्र’ म्हणतात. श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र खंड 1 च्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय लेखक लोकमान्य टिळकांचे आहे. या ग्रंथातील आध्यात्मिक ज्ञान जनसामान्यांपर्यंत संक्षिप्त स्वरुपात पोहचवण्यासाठी केलेला हा प्रायोगिक प्रयत्न आहे. समाजात मुल्यांची रुजवन करण्याच्या शुद्ध हेतूने विद्यार्थी व अभ्यासक या नात्याने मनापासून, विवेकनिष्ठपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48763668365541,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/karmyogshastracoverpage-1.jpg?v=1775713943"},{"product_id":"प्रज्ञावंत-प्रतिभा-आणि-सर्जनशीलतेचा-आविष्कार","title":"प्रज्ञावंत - प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ वाचनासाठी नाही तर ते संवादासाठी आहे. तुमच्या अनुभवांनी ते पूर्ण होईल, तुमच्या प्रतिप्रश्नांमुळे ते जिवंत राहील, आणि तुमच्या प्रयोगांनी त्याचा अर्थ बदलत जाईल.\u003cbr\u003eया पुस्तकात आपण प्रतिभेची मानसशास्त्रीय व्याख्या, प्रतिभा ओळखण्याची प्रक्रिया, सर्जनशीलतेची वाढ घडवणारे घटक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांची भूमिका, प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व घडवणारी विचारसरणी यांचा सरळ व अनुभवाधारित उलगडा करणार आहोत. हे पुस्तक उपदेश नव्हे, प्रेरणा आहे. हे तत्त्वज्ञान नव्हे तर अनुभवातून संचित झालेले वास्तव आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक केवळ प्रतिभावंतांसाठी नाही, तर प्रतिभा शोधणाऱ्यांसाठी आहे. या पुस्तकाचे अंतिम उद्दिष्ट आहे की “प्रत्येक मनुष्य प्रतिभावंत बनू शकतो, जर तो स्वतःला ओळखण्याचे साहस करेल.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश फक्त प्रज्ञावंत घडण्याची प्रक्रिया हे सांगणे नाही. उद्देश आहे, प्रज्ञावंत कसा घडतो, आणि त्याचे समाजासाठी काय योगदान असते याचा मागोवा घेणे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचकाला स्वतःला ओळखण्याच्या आणि विस्तारण्याच्या दिशेने आमंत्रण आहे - जिथे निरीक्षण हे साधन आहे, अनुभव ही प्रयोगशाळा आहे, अपयश हे शिक्षक आहे आणि जीवन हेच विद्यापीठ आहे. \u003cbr\u003eही प्रस्तावना माझी वैयक्तिक भावना नसून, प्रत्येक साध्या व्यक्तीतून महानतेचा अंकुर जागवण्याचा प्रयत्न आहे. जर वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, विचार पेटला, किंवा एखादा नवीन प्रयोग सुरू झाला, तर या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाल्याचे मला पुरेपूर समाधान देईल. माझी खात्री आहे की, हे पुस्तक तुमच्या विचारांना दिशा देईल, प्रश्न निर्माण करेल आणि तुमच्या अंतर्मनातील सुप्त प्रतिभेला जागृत करण्यास मदत करेल. चला तर, आत्मान्वेषणाच्या या प्रवासाला सुरुवात करूया: प्रतिभेपासून सर्जनशीलतेकडे, आणि सर्जनशीलतेपासून प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्वाकडे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49461644165349,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradnyavant_pratibhaaanisarjanshiltechaavishkar_L.A.Patil-1.jpg?v=1780297441"},{"product_id":"ग्रंथवेडे-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर","title":"ग्रंथवेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकाची एकूण आठ प्रकरण असून पहिल्या प्रकरणात डॉ. आंबेडकर यांच्या बालवयापासून ते शिक्षण घेत असतांना पर्यतच्या आठवणी आहेत. दुसऱ्या प्रकरणात पुस्तक प्रेमाविषयीच्या कौंटबिक आठवणी तर तिसऱ्या प्रकरणात डॉ. आंबेडकर आणि पुस्तके यामधील अनुबंध स्पष्ट करण्यात आला आहे. चवथे प्रकरण ग्रंथालयासी डॉ. आंबेडकरांचा संबंध सांगणारे आहे. पाचव्या प्रकरणात पुस्तकांच्या दुकानाशी डॉ. आंबेडकरांचा संबंध कसा होता याविषयीची माहिती आलेली आहे. तसेच ग्रंथाविषयी डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या मतांची नोंद सहाव्या प्रकरणात आलेली आहे. सातवे प्रकरण डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथविषयक आठवणीवर आधारित असून ग्रंथविषयक छोट्या आठवणीचा संग्रह आठव्या प्रकरणात आढळतो.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49542383730917,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GranthwedeAmbedkar_Ingole-1.jpg?v=1781611886"},{"product_id":"महात्मा-फुल्यांच्या-विचारातील-नवसमाज","title":"महात्मा फुल्यांच्या विचारातील नवसमाज","description":"\u003cp\u003eमहाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ वाचून मी अतिशय प्रभावित झालो. माझ्या विचारामध्ये विलक्षण परिवर्तन झाले. कारण महात्मा जोतीराव फुलेंनी त्या काळात केलेले कार्य आणि मांडलेले विचार किती महत्त्वपूर्ण होते. याची जाणीव झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्ध उभारलेले क्रांतीकार्य तत्कालीन आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीमध्ये परिवर्तन करण्याकरिता प्रेरणादायी ठरले व आधुनिक पुरोगामी इतिहासामध्ये महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. यातूनच पुरोगामी विचाराला चालना देणारा एक नवीन वर्ग निर्माण झाला.\u003cbr\u003eमहात्मा जोतीरावांच्या विचाराचा व त्यांच्या क्रांतीकार्याचा प्रभाव भारतीय दलित, पीडित, शोषित, शेतकरी आणि स्त्री वर्ग यांच्या जीवनांवर परिणामकारक ठरला. प्रस्थापित समाज व्यवस्थेने हजारो वर्षापासून शूद्र आणि स्त्री वर्गाला अज्ञानाच्या रूढी, प्रथा, परंपरा आणि धार्मिक कर्मकांडामध्ये गुरफटून ठेवले होते. त्यामुळे त्यांचा विकास घडून येत नव्हता. हे जोतीरावांनी हेरले आणि या सर्व अन्यायी प्रथापरंपरावर घनाघाती हल्ला चढविला व शोषित, वंचित व परंपरेने नाकारलेल्या दुर्लक्षीत घटकाला त्यांचे निसर्गनिर्मित हक्क मिळवून दिले, या सामाजिक परिवर्तनासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व बुद्धीप्रामाण्यवादाच्या तत्त्वावर आधारित नवसमाज उभा करण्याचा प्रयत्न जोतीरावांनी आपल्या अथक परिश्रमातून केला म्हणून त्यांच्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो.\u003cbr\u003eमहात्मा जोतीराव फुल्यांनी आपल्या कृतीतून व विचारातून नव्या आधुनिक विचारांचा नवसमाज घडविण्याचे केलेले मौलिक कार्य माझ्या प्रस्तुत ग्रथातून मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49913612632293,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MahatmaFulyanchyaVicharathilNavsamaj_KusumendraSontakke-1.jpg?v=1782811652"},{"product_id":"हिन्दी-का-साहित्य-इतिहास","title":"हिन्दी का साहित्य इतिहास","description":"\u003cp\u003eहिंदी साहित्य भारतीय संस्कृति, समाज और जनजीवन का सशक्त दर्पण है| इसकी समृद्ध परंपरा में आदिकाल से लेकर आधुनिक काल तक मानव जीवन के विविध पक्षों, सामाजिक परिवर्तनों, धार्मिक आंदोलनों, सांस्कृतिक मूल्यों तथा साहित्यिक प्रवृत्तियों का व्यापक चित्रण मिलता है| प्रस्तुत पुस्तक “हिंदी साहित्य का इतिहास” विद्यार्थियों, अध्यापकों तथा हिंदी साहित्य के अध्येताओं के लिए एक उपयोगी एवं मार्गदर्शक ग्रंथ के प्राक्कथन\u003cbr\u003eहिंदी साहित्य भारतीय संस्कृति, समाज और जनजीवन का सशक्त दर्पण है| इसकी समृद्ध परंपरा में आदिकाल से लेकर आधुनिक काल तक मानव जीवन के विविध पक्षों, सामाजिक परिवर्तनों, धार्मिक आंदोलनों, सांस्कृतिक मूल्यों तथा साहित्यिक प्रवृत्तियों का व्यापक चित्रण मिलता है| प्रस्तुत पुस्तक “हिंदी साहित्य का इतिहास” विद्यार्थियों, अध्यापकों तथा हिंदी साहित्य के अध्येताओं के लिए एक उपयोगी एवं मार्गदर्शक ग्रंथ के रूप में तैयार की गई है|\u003cbr\u003eइस पुस्तक में हिंदी साहित्य के विकासक्रम को कालानुक्रमिक रूप से प्रस्तुत किया गया है| आदिकाल, भक्तिकाल, रीतिकाल तथा आधुनिक काल की प्रमुख साहित्यिक धाराओं, कवियों, लेखकों, ग्रंथों एवं साहित्यिक विशेषताओं का सरल, सुबोध तथा व्यवस्थित विवेचन किया गया है| साथ ही हिंदी गद्य एवं पद्य साहित्य के विकास, भाषा-परिवर्तन, साहित्यिक आंदोलनों तथा विभिन्न युगों की सामाजिक एवं सांस्कृतिक पृष्ठभूमि को भी समाहित किया गया है|\u003cbr\u003eपुस्तक की विशेषता यह है कि इसमें विषयवस्तु को विद्यार्थियों की आवश्यकताओं के अनुरूप सरल भाषा में प्रस्तुत किया गया है, जिससे प्रतियोगी परीक्षाओं, विश्वविद्यालयीन अध्ययन तथा स्वाध्याय करने वाले पाठकों को विशेष लाभ प्राप्त होगा| प्रत्येक प्रकरण में आवश्यक तथ्यों, साहित्यिक अवधारणाओं तथा प्रमुख साहित्यकारों के योगदान को सम्यक्रूप से समाहित करने का प्रयास किया गया है| यह पुस्तक हिंदी साहित्य के इतिहास को समझने, उसकी विभिन्न धाराओं का अध्ययन करने तथा साहित्यिक दृष्टि के विकास में सहायक सिद्ध होगी| \u003cbr\u003eहिन्दी साहित्य का इतिहास | 11\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49913729810661,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/HindiSahityaKaItihas_AacharyaRamchandraShukla-1.jpg?v=1782812259"},{"product_id":"साहित्य-विचार-1","title":"साहित्य विचार","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे सोप्या, नेमक्या\u003cbr\u003eआणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. साहित्यातील रस या\u003cbr\u003eप्रकरणामध्ये भारतीय रसविचार, भरतमुनींचे रससूत्र, रससिद्धांत, रससंख्या आणि\u003cbr\u003eरसविघ्ने यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शैलीविचार या घटकात\u003cbr\u003eआशय, लेखक आणि साहित्यप्रकार यांनुसार शैलीचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले\u003cbr\u003eआहे.\u003cbr\u003e’साहित्य : आनंद आणि आस्वाद’ या विभागात साहित्यास्वादाची संकल्पना,\u003cbr\u003eकाव्यानंद, कवीच्या निर्मितीचा आनंद, रसिकाच्या आस्वादाचा आनंद आणि\u003cbr\u003eसाहित्य अभिरुची यांचा विचार मांडण्यात आला आहे. ’साहित्य आणि समाज’\u003cbr\u003eया घटकात समाजाची संकल्पना, साहित्य व समाज यांचे परस्परसंबंध आणि\u003cbr\u003eसाहित्याद्वारे व्यक्त होणारी जीवनमूल्ये यांचे विवेचन केले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी\u003cbr\u003eआणि मराठी साहित्याच्या मूलभूत संकल्पना आत्मसात करण्यासाठी हे पुस्तक\u003cbr\u003eउपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51093916647653,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SahityaVichar_SachinPatil-1.jpg?v=1785324152"},{"product_id":"‌-सूड‌-एक-आकलन","title":"‌‘सूड‌’ - एक आकलन","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू झाला आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुर्नरचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आला. तृतीय वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून पाचवे सत्रासाठी वाङ्मय प्रकार - कांदबरी (सूड - बाबुराव बागूल) याचा समावेश करण्यात आलेला आहे. \u003cbr\u003eकांदबरी हा वाङ्मय प्रकार जीवन प्रवाह बरोबर चालणारा, बदलत जाणारा साहित्य प्रकार आहे. त्यामुळेच कांदबरीचा अनेक दिशांनी आपणास अभ्यास करता येतो. कांदबरीच्या घडणीमध्ये जीवनविषयक जाणिवांचा सहभाग स्पष्ट होतो. त्यामुळेच कांदबरी हा वाङ्मय प्रकार सर्वात महत्वाचा प्रमुख वाङ्मय प्रकार मान्य झाला आहे. कांदबरीची लोकप्रियेतेची अनेक कारणे आहेत. ती म्हणजे कांदबरीने कविता, कथा, नाटक चरित्र, आत्मचरित्र विविध आदी या सर्व वाङ्मय प्रकाराची आणि वाङ्मय वाचकांची एकात्मता साधलेली आहे. त्यातून कांदबरीने आपले स्थान निश्चित केले आहे. कादंबरी वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करताना लेखकाची जीवनदृष्टी महत्वाची मानली जाते, या जीवनदृष्टीच्या व्यापकतेवर, सखोलपणावर आणि मौलीकतेवर कादंबरीचे महत्व अवलंबून असते. लेखक कादंबरीत काही व्यक्तीच्या द्वारा जीवनाचे आपले निरीक्षण व आकलन प्रकट करीत असतो. समाजजीवनाचे दीर्घकालिन जीवनचित्रण करण्याकडे कादंबरीकार प्रयत्न करीत असतो. साहित्यातील एक समृद्ध दालन म्हणजे मराठी कादंबरीचे विश्व होय.\u003cbr\u003eबाबुराव बागूलांनी ‘मरण स्वस्त होत आहे, जेव्हा मी जात चोरली आहे ‘सूड’ इत्यादी कथा, कविता, कांदबऱ्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव जीवनाचा वेध घेतला आहे. त्याच्या लिखाणाची गुणात्मक उंची व मूल्ये हि आजच्या साहित्यात सर्वोच्च आहेत. त्यापूर्वी साहित्यातील दलित साहित्य प्रवाहाचे ते शिल्पकारही ठरतात. मराठी साहित्यातील आपल्या वैशिष्ट्येपूर्ण नवप्रवाहातल्या धगधगत्या विचारांनी वेगळा चिंतनशील प्रवाह निर्माण करणारे नवे आक्रमक सर्जनशील साहित्य जगाला ओळख करून देणारे बाबुराव बागूल श्रेष्ठ लेखक ठरले आहेत. लेखक विचारवंत, साहित्यिक, समिक्षक असे त्यांना गौरविण्यात आले आहे. बाबुराव बागूल यांची ‘सूड’ कादंबरी मार्च 1970 मध्ये प्रकाशित झाली असून कथा, कांदबरीचा एक दुसरा नमुना आहे. ‘सूड’ हि कांदबरी वाड्मयातील \u003cbr\u003eएक अंत्यत परिणामकारक जहाल अशी कांदबरी आहे. निरागस, निष्पाप, कोवळ्या जानकीच्या शारीरिक शोषणाची व त्यातून निर्माण झालेल्या सुडाच्या प्रवासाची तसेच अत्याचारामुळे पिळलेल्या जानकीच्या उध्वस्त मनाची व आत्मशोधाची एक कहाणी आहे. कांदबरीत शोषित, उपेक्षित झोपडपट्टीतील फुथपाथ वरील भणंग जनजीवनाचे चित्रण करणारे लेखक म्हणून त्याची ओळख होते. प्रभावी व विद्रोही भाषाशैली जीवन प्रसंग चित्रण, कारुण्य आणि क्रूरता रेखाटन हे त्याच्या लेखनाचे विशेष गुण होते. त्यांनी लिहिलेल्या कथा व कांदबरीत गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांच व वेदनांचे वर्णन करणारे आहेत. स्रीप्रधान लेखन हा देखिल त्याच्या लिखाणाचा महत्वाचा भाग आहे. ‘सूड’ कांदबरीने बाबूराव बागूल यांनी तीच्यावर ओढवलेल्या प्रसंगाच चित्रण केलेलं आहे. या कांदबरीतील स्री व्यक्तिरेखा हे समाजातील स्रीयांच्या शोषित पीडित स्रीच्या सामाजिक स्थितीचे चित्रण करणारे आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129745699045,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sud-EkAkalan_Bagale-1.jpg?v=1787224507"},{"product_id":"भाषा-विज्ञान-आणि-खानदेशातील-बोली-bhashavdnyan-ani-khandeshatil-boli","title":"भाषा विज्ञान आणि खानदेशातील बोली (Bhashavdnyan ani Khandeshatil Boli)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eनवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वर्णनात्मक भाषा विज्ञान व खानदेशातील बोली संदर्भातील अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. \u003cbr\u003eमानवी संस्कृतीच्या समृद्ध आणि प्रदीर्घ इतिहासात सर्वात मौलिक आणि क्रांतिकारक शोध कोणता असेल, तर तो म्हणजे ‘भाषा’. भाषा ही केवळ माणसाच्या विचारांच्या देवाणघेवाणीचे माध्यम नसून, ती मानवी संवेदना, संस्कृती, लोकपरंपरा आणि समाजमन व्यक्त करणारे जिवंत व्यासपीठ आहे. निसर्गाने मानवाला दिलेली ही एक अलौकिक देणगी आहे. मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या सार्थ ध्वनींच्या आधारे मानवाने संवादाची एक अद्भूत आणि प्रभावी व्यवस्था उभी केली. हीच व्यवस्था सामाजिक व्यवहाराचा, विचारांच्या प्रकटीकरणाचा आणि मानवी ज्ञानाच्या पिढ्यानपिढ्या जतन व संवर्धनाचा मुख्य पाया बनली. भाषा ही प्रवाही, सजीव आणि सातत्याने बदलणारी असते. तिच्या या परिवर्तनाचा, अंतरंगाचा, ध्वनीरचनेचा, रूपरचनेचा आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंधांचा वस्तुनिष्ठ व शास्त्रीय अभ्यास म्हणजेच ‘भाषाविज्ञान’ होय. भाषाविज्ञानाचा अभ्यास म्हणजे केवळ व्याकरणाचे कोरडे नियम शिकणे नव्हे; तर भाषेची जैविक रचना, तिची मानवी मेंदू आणि समाजाशी असलेली नाते सांगणारी जडणघडण समजून घेणे होय. हाच आधुनिक भाषावैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा आणि भाषेच्या सूक्ष्म घटकांचा परिचय सुलभ व रंजक रीतीने व्हावा, या उद्देशाने ‘भाषाविज्ञान आणि खानदेशातील बोली’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.\u003cbr\u003eखानदेश हा लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि समृद्ध बोलीपरंपरेचा एक ऐतिहासिक आणि संपन्न भूभाग आहे. तापी, गिरणा, पांझरा,बोरी आणि अनेर या पवित्र नद्यांच्या खोऱ्यात फुललेली खानदेशी संस्कृती आणि तिची लोकबोली ‘अहिराणी’ ही मराठी भाषेचे एक अमूल्य भूषण आहे. अहिराणीसोबतच खानदेशातील भौगोलिक व सामाजिक पटलावर ‘भिल्ल बोली’, ‘गुर्जरी’ आणि ‘तावडी’ या बोलींचे स्वतंत्र आणि वैभवशाली अस्तित्व आहे. बोलीभाषा ही नेहमीच प्रमाणाभाषेची जननी राहिली आहे; ती लोकजीवनाचा उबदार स्पर्श आणि मातीचा गंध घेऊन जगणारी असते. प्रस्तुत ग्रंथात भाषा विज्ञानाच्या सैद्धांतिक \u003cbr\u003eचौकटीसोबतच खानदेशातील या प्रमुख बोलींच्या ध्वनीविषयक, रूपविषयक आणि भाषावैज्ञानिक वैशिष्ट्यांचा सखोल आणि वस्तुनिष्ठ अभ्यास समाविष्ट केला आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथ. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमावर आधारित आहे. या विवेचनात मर्यादित हेतू न ठेवता सर्वसमावेशक असे विश्लेषण घटक निहाय केले आहे म्हणून हा ग्रंथ केवळ पदवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी मर्यादित नसून, मराठी भाषेचे प्राध्यापक, संशोधक, बोलीभाषांचे अभ्यासक आणि मराठी साहित्याच्या प्रेमींसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आम्हाला वाटतो. भाषाविज्ञानासारखा काहीसा क्लिष्ट आणि तांत्रिक वाटणारा विषय सोप्या मराठीत, उदाहरणांसह आणि आकृत्यांच्या साहाय्याने सुबोध कसा करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129751269605,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhashaVidnyanaanikhandeshatilboli-1.jpg?v=1787225021"},{"product_id":"निवडक-मराठी-विज्ञानकथा-स्वरूप-व-मूल्यमापन","title":"निवडक  मराठी विज्ञानकथा :  स्वरूप व मूल्यमापन","description":"\u003cp\u003e21 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मराठी विज्ञान कथेने कोणते वळण घेतले आहे?\u003cbr\u003eक्षणोक्षणी विस्तारत जाणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाने विज्ञान कथाकारांसमोर कोणती नवी आव्हाने उभी केली आहेत?\u003cbr\u003eविज्ञानकथा या पदबंधातील एक पद म्हणजे ‘कथा’ झाकोळून जाते आहे का? की त्यातल्या विज्ञानाने कलापक्षावर मात केली आहे?\u003cbr\u003eविज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवन झपाटून टाकले होते आणि आहे. या झपाटलेपणाचा वेग किती? ते कोणत्या एककाने मोजायचे? विज्ञानकथाकारांना कथाकार आणि विज्ञान व्यासंगी या भूमिका सक्षमपणे पेलण्यासाठी आणखी काय करायला हवे?\u003cbr\u003eहे व यांसारखे काही प्रश्न विज्ञान साहित्याच्या समीक्षेत निर्णायक आहेत. \u003cbr\u003eमराठीतील विज्ञान कथेची समीक्षा कशी करावी? \u003cbr\u003eतिच्या मूल्यमापनाचे निकष काय याचा वस्तुपाठ मी माझ्या या आधीच्या “मराठी विज्ञान साहित्य - स्वरूप आणि समीक्षा” या ग्रंथातून सुबोध जावडेकरांच्या विज्ञान कथेच्या साहाय्याने दिला आहेच. \u003cbr\u003eविज्ञानकथेचे दोन प्रमुख पक्ष म्हणजे त्यातले विज्ञान सिद्धांतन आणि दुसरा म्हणजे त्यातले कथातत्त्व अर्थात वाङ्मयीन बाजू. \u003cbr\u003eया दोन्हींची छाननी, मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे अपेक्षित असते. कथेतले विज्ञान सिद्ध आहे का? \u003cbr\u003eकल्पित आहे का? की दोन्हींचे मिश्रण आहे? की छद्म आहे याचा निर्णय वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी घ्यावा. \u003cbr\u003eविज्ञानकथा आधी कथा असली पाहिजे. तिची वाङ्मयीन बाजू उणी पडता कामा नये. विज्ञानकथा मुळात मानवाचीच कथा असते असे म्हटले जाते. विज्ञानाचे चांगले वाईट परिणाम मानवी जीवनावर कसे झाले? विज्ञान कथा उघडपणे अथवा सुप्तपणे कोणता बोध देते? वैज्ञानिक दृष्टी रुजविण्यात ती कितपत यशस्वी होते? यांसारख्या निकषांवर विज्ञान कथेची समीक्षा झाली पाहिजे. \u003cbr\u003eही समीक्षा प्रचलित मराठी समीक्षेसारखी शब्दबोजड, शब्दबंबाळ, संकल्पना बोजड असता कामा नये. विज्ञानकथेतले ‘कथ्य’ आणि विज्ञान ‘तथ्य’ वस्तुनिष्ठपणे \u003cbr\u003eशोधून त्याचे मूल्यमापन समीक्षकाने केले पाहिजे. कथेची सामर्थ्य स्थळे आणि दोष स्थळे (मर्यादा स्थळे) समीक्षकाने उलगडून दाखविली पाहिजेत. कथेत काही तांत्रिक दोष, विज्ञान सिद्धांतातील अपूर्णता, अथवा असत्यता, मांडणीतील प्रमाद, आशयाच्या उणिवा केवळ दाखवून उपयोगाचे नाही. हे दोष का घडले?\u003cbr\u003eते कोणत्या उपायांनी टाळता आले असते हे सांगणे देखील विज्ञान समीक्षकाचेच कार्य आहे. \u003cbr\u003eसाहजिकच त्यासाठी पुरेशा विज्ञान व्यासंगाची जशी गरज आहे तशी साहित्याच्या व्यासंगाची देखील तेवढीच, सम प्रमाणात गरज आहे. \u003cbr\u003eविज्ञान कथा जशी विज्ञानापेक्षा मानवाची कथा असते असे म्हटले जाते. याच धर्तीवर असेही म्हणता येईल की, विज्ञान साहित्याची, विज्ञानकथेची समीक्षा ही विज्ञानासोबतच वाङ्मयाची देखील समीक्षा असते. \u003cbr\u003eबहुसंख्य समीक्षकांना विज्ञानकथेतील वाड्मयीन बाजूचे मूल्यमापन करता येणे फारसे अवघड नसते. \u003cbr\u003eपण विज्ञानकथेतील विज्ञान सिद्धांताचे स्वरूप, त्याचे मूळ, त्याचा कल, विज्ञान सिद्धांत सोपे करून मांडण्याची त्या त्या लेखकाची स्वतंत्र शैली, कथेतल्या विज्ञानाची रुक्ष अथवा प्रासादिक व रंजक मांडणी, कथेतले वास्तव विज्ञान संपून कल्पित विज्ञान कुठे सुरू झाले? विज्ञान सिद्धांत जर वास्तव अथवा सिद्ध असतील तर त्यांचे उपयोजन दैनंदिन जीवनात कसे होऊ शकेल याचे दिग्दर्शन, विज्ञान सिद्धांतांचे मानवी जीवनावरील संभाव्य चांगले वाईट परिणाम कोणते?\u003cbr\u003eनित्य बदलणाऱ्या, नवी झेप घेणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाचे सर्व विभ्रम आकलित होण्याचे सामर्थ्य विज्ञानकथाकाराकडे आहे काय?\u003cbr\u003eया व यांसारख्या अनेक गोष्टी विज्ञानसाहित्याची समीक्षा करणाऱ्या समीक्षकाने तपासून घ्यायला हव्यात. ही तपासणी क्षमता या समीक्षकाकडेअसणे गरजेचे आहे. \u003cbr\u003eथोडक्यात विज्ञान समीक्षकाची विज्ञान जाणीव, विज्ञानव्यासंग देखील लुळा असता कामा नये. \u003cbr\u003eम्हणून विज्ञानसाहित्याचा समीक्षक हा प्रचलित मराठी साहित्य समीक्षकापेक्षा वेगळा असतो. \u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथातून प्रातिनिधिक अशा चार विज्ञान कथांची समीक्षा केली आहे. \u003cbr\u003eथर्डमॅन - डॉ. संजय ढोले; बीजांकुर - डॉ. रंजन गर्गे; डम्पी - चंद्रकांत घाटाळ; कार्डिओ -77 - सुनिल विभूते अशा या चार कथा विज्ञानकथा आहेत. \u003cbr\u003eप्रत्येक कथेचे विज्ञानप्रांत परस्पर भिन्न आहेत. अनुक्रमे टाईम मशीन; सरोगेट मदर; स्पेस सायन्स; मेडीकल सायन्स अशी ही भिन्नता असली तरी मानवी \u003cbr\u003eजीवनावरील प्रभावाचे चित्रण हा एकच हेतू या निर्मिती मागे आहे. \u003cbr\u003eया चारही कथा प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी चारही लेखकांनी संमती दिली त्यांचे व त्यांच्या प्रकाशकांचे अनुक्रमे मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे; स्पॅन पब्लिकेशन, औरंगाबाद; डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई; राजहंस प्रकाशन, पुणे यांचे मनःपूर्वक आभार! तसेच प्रशांत पब्लिकेशन्सचेही आभार!\u003cbr\u003eपैकी प्रा. विभूते, डॉ. गर्गे, डॉ. ढोले हे विज्ञानाचे शिक्षक आहेत. डॉ. ढोले तर संशोधकही आहेत. \u003cbr\u003eया चारही कथांचे हे विज्ञानसाहित्याच्या समीक्षेचे निकष लावून केलेले मूल्यमापन आहे. \u003cbr\u003eमराठी विज्ञान कथेची समीक्षा कशी करावी? ती कशी असावी? याचे काही एक दिग्दर्शन विज्ञान साहित्याची समीक्षा करू पाहणाऱ्या नव्या पिढीच्या तरुण समीक्षकांना व्हावे ही अपेक्षा आहे आणि त्याच्यापूर्तीतच या ग्रंथाचे सार्थक ही आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129759133925,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/NivdakMarathiVidnyankatha_SwarupvaMulyamapan_Dr.FulaBagul-1.jpg?v=1787225857"},{"product_id":"जंगलाचं-देणं-एक-आकलन","title":"जंगलाचं देणं  एक आकलन","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वाङ्मय प्रकार ललित साहित्य अंतर्गत ‘जंगलाचं देणं’ अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. \u003cbr\u003eनिसर्ग आणि मानवी जीवन यांचा अनुबंध तसा युगानुयुगांचा, पण आधुनिकतेच्या प्रवाहात आपण निसर्गापासून दुरावत गेलो. अशा वेळी निसर्गाशी तुटलेला हा धागा पुन्हा जोडण्याचे आणि अरण्यातील गूढ, समृद्ध जग उलगडून दाखवण्याचे अद्भूत कार्य मारुती चित्तमपल्ली यांच्या लेखनाने केले आहे. ‘जंगलाचे देणं’ हे केवळ एक पुस्तक नसून, निसर्गाने मानवी संस्कृतीला दिलेली एक अमूल्य भेट आहे.\u003cbr\u003eया साहित्यावर समीक्षात्मक लेखन करताना निसर्गभ्रमणाचा अनुभव घेता येतो. जंगलातील पशू-पक्षी, झाडे-झुडपे, कीटक आणि वन्यजीवांच्या विश्वाशी एकरूप होऊन त्यांनी मांडलेले निरीक्षण केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवत नाही, तर त्यात एक हळवा, संवेदनक्षम साहित्यिकही जाणवतो. त्यांच्या या पुस्तकातून जंगलाची भाषा, तिथली शांतता आणि त्या शांततेतील गूढ नाद समजून घेता आला.\u003cbr\u003eया माध्यमातून चित्तमपल्ली यांच्या निसर्गप्रेमी दृष्टीचा, त्यांच्या समृद्ध शब्दकळांचा आणि जंगलाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. वन्यजीवांचे जीवन त्यांनी ज्या तन्मयतेने टिपली त्याची जाणीव करून होते . परंतु या अभ्यासाने वाचकांचा निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणला. चित्तमपल्लींचे हे लेखन वाचकांमध्ये निसर्गाबद्दल केवळ कुतूहल निर्माण करत नाही, तर एक नैतिक जबाबदारी आणि पर्यावरणाविषयीची जाणीवही निर्माण करते. ‘जंगलाचे देणं’ या साहित्यकृतीचा वेध घेताना निसर्गाप्रती कृतज्ञतेची ही भावना अधिक होते. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52895220596965,"sku":"9789377761677","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Janglachden_Pathak-1.jpg?v=1789643488"},{"product_id":"वर्णनात्मक-भाषाविज्ञान-आणि-प्रात्यक्षिक","title":"वर्णनात्मक भाषाविज्ञान आणि प्रात्यक्षिक","description":"\u003cp\u003eवर्णनात्मक भाषाविज्ञान ही भाषा विज्ञानाची एक शाखा. भाषा लवचिक, परिवर्तनशील, सांस्कृतिक आणि सामाजिक असल्याने भाषेचे स्वरूप आणि कार्य पद्धतीचे वर्णन करणारे, भाषेच्या संरचनेचे, ध्वनींचे, रूपांचे आणि वाक्यांच्या रचनेचे विश्लेषण करणारे हे शास्त्र आहे. कोणत्याही भाषेचा अभ्यास तिच्या मूळ स्वरूपात करून भाषेतील नियम, व्याकरण, शब्दसंग्रह, उच्चार आणि भाषेच्या विशिष्ट स्थितीचे विश्लेषण, यांचा अभ्यास यात केला जातो. भाषेची संरचना समजून भाषेतील विविध घटकांमधील संबंध शोधण्याचे कार्यही वर्णनात्मक भाषाविज्ञान करते.\u003cbr\u003eभाषा व्यवहार पूर्ततेसाठी दोन घटक महत्त्वाचे. बोलणारा व ऐकणारा. हे दोन्ही घटक एकाच क्रियेची दोन अंगे. बोलणाऱ्याने वागेंद्रियाच्याद्वारे आपल्या मनातील विचार, भावना प्रकट करण्यासाठी सार्थ ध्वनीचे उच्चारण केले आणि ऐकणाऱ्याने त्यातील आशय ग्रहण केला म्हणजे भाषा कार्य पूर्ण. भाषा ही संकेताधिष्ठीत संदेशन प्रक्रिया. ध्वनी, शब्द, वाक्य आणि अर्थ मिश्रित संघटनसुद्धा. परंपरेने चालत आलेला सामाजिक वारसा असलेला ध्वनीचा सार्थ समूह असलेली शारीरिक व मानसिक क्रियांच्या संयोगातून सिध्द होणारी परिवर्तनशील चिन्हांकीत तशीच ध्वनीरूप मौखिक व्यवस्था ही आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार विविध घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. वागेंद्रियाची रचना व कार्य, अवयवांचे उच्चारण, ध्वनींची निर्मिती प्रक्रिया, उच्चारण अवयवांनुसार वर्षांचे गट, तिच्या अभ्यासाच्या पद्धती, तिची कार्यप्रणाली, तिचा इतिहास, दोन भाषेतील वेगळेपण आणि साम्य, त्यांच्या रचनेतील, अर्थातील वेगळेपण आणि साम्य, अनेक भाषातज्ञ याची मत मतांतरे, स्वनांचे वर्गीकरण व स्वन-स्वनीम-स्वनांतर, स्वनिम निश्चितीचे तत्वे, विनियोगोचे प्रकार व मराठीची स्वनिम व्यवस्था, रूप-रूपिम - रुपिकांतरे रूपा-रूपातील संबंध, रूपिम विनियोगाचे प्रकार, रूप अर्थ संबंध, वाक्याचे घटक, प्रकार आणि वाक्याची संरचना, वाक्याविन्यास, अर्थविन्यास, अर्थः अर्थातील संबंध अनेकार्थता, अर्थविन्यासातील अर्थाची प्रतिती देणारे महत्त्वपूर्ण घटकांचे विवेचन आणि त्यावरील प्रात्यक्षिकांचे नमुने दिले आहेत. या मजकूरांची शीर्षक अनुक्रमणिकेच्या दर्पणात आपल्याला दिसतीलच. या विवेचनाचा भाषेचे अभ्यासक, अध्यापक आणि विद्यार्थी यांना उपयोजन करता येईल. तसेच वर्णनात्मक भाषाविज्ञान अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित प्रात्यक्षिक कार्याचा प्रथमच समावेश या ग्रंथात केला आहे. त्यासाठी प्रश्न संचांचा समावेश करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कौशल्य व भाषिक उपयोजन क्षमता विकसित होणार आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906766860517,"sku":"9789377762070","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VarnanatmakBhashavidnyan_joshi-1.jpg?v=1789815934"},{"product_id":"मध्ययुगीन-मराठी-वाङ्मयाचा-स्थूल-इतिहास-प्रारंभ-ते-इ-स-1818","title":"मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा स्थूल इतिहास प्रारंभ ते इ.स.1818","description":"\u003cp\u003eया वाङ्मयाने महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीची निर्मिती केली. लोकभाषेला प्रतिष्ठा दिली, भक्तीला मानवतेची जोड दिली, साहित्याला सामाजिक आशय दिला आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक प्रवाहांना अभिव्यक्तीचे स्थान दिले. म्हणूनच मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नाही; तो मराठी समाजाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा शोध आहे.\u003cbr\u003eआजच्या बदलत्या काळात या वाङ्मयाचा अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण आधुनिकतेच्या प्रवाहातही मानवता, समता, नैतिकता, सामाजिक बांधिलकी, लोकसंस्कृती आणि सहअस्तित्व यांसारखी मूल्ये समाजासाठी तितकीच आवश्यक आहेत. मध्ययुगीन संतांनी आणि साहित्यिकांनी आपल्या काळाच्या मर्यादांमध्ये राहून या मूल्यांचा शोध घेतला. त्यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास वर्तमानाशी संवाद साधण्याची संधी देतो.\u003cbr\u003eया पुस्तकाचा मुख्य उद्देश वाचकांना, अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा सुसंगत परिचय करून देणे हा आहे. साहित्यकृतींकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची क्षमता विकसित व्हावी आणि मराठी साहित्यपरंपरेविषयी अभिमानासोबतच अभ्यासू आणि विवेकशील दृष्टिकोन निर्माण व्हावा, हीच या ग्रंथामागील अपेक्षा आहे.\u003cbr\u003eमध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या या प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेचा अभ्यास करताना आपल्याला मराठी भाषेच्या सामर्थ्याची, साहित्याच्या सामाजिक भूमिकेची आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जाणीव होईल, असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906820600037,"sku":"9789377761929","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Madhyayuginmarathivangmayachasthulitihas_AtulDeshmukh-1.jpg?v=1789816738"},{"product_id":"आधुनिक-साहित्य-प्रकार-कादंबरी-शिवराय-आणि-संविधान","title":"आधुनिक साहित्य प्रकार कादंबरी : शिवराय आणि संविधान","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार दरवर्षी एका वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये व अभ्यासपद्धतीमध्ये बदल होत आहेत. यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये तृतीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत. त्याच बदलाचा भाग म्हणून पण व्यापक उद्देश ठेवून मराठी विषयातील दुय्यम विषय म्हणून आधुनिक मराठी साहित्यप्रकार कादंबरीचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर साहित्यकृती म्हणून लेखक राहुल रासवे यांची ‘शिवराय आणि संविधान’ ही मैत्री पब्लिकेशन पुणे यांनी 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीच्या सुवर्णपर्वावर प्रकाशित केलेली कादंबरी निहित केलेली आहे. अभ्यासक्रमामध्ये या घटकांचा समावेश करण्याचा विद्यापीठाचा आणि एकूणच अभ्यासमंडळाचा हेतू आपल्याला स्पष्ट दिसतो. तो म्हणजे कादंबरी हा साहित्यप्रकार विद्यार्थ्यांना पातळीवर स्पष्टपणे समजावा किंवा अवगत व्हावा व त्याचबरोबर मूळ साहित्यकृती कादंबरी म्हणून कशी अभ्यासली जाते, ती कशी असावी, तिचे विश्लेषण विविध अंगाने कसे करता येते हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमामध्ये कादंबरी या साहित्यकृतीचा समावेश केला जातो.\u003cbr\u003eयेथे देखील साहित्यकृती म्हणून एका कादंबरीचा समावेश केलेला आहे. पण विशेषत्वाने एक बाब येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे प्रत्यक्ष कादंबरी हा साहित्यप्रकार अभ्यासण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली कादंबरी ही अतिशय आगळीवेगळी आणि विशिष्ट हेतू ठेवून समाविष्ट केलेली कादंबरी आहे. ती म्हणजे ‘शिवराय आणि संविधान’. या कादंबरीचे शीर्षक विचारात घेतल्यास आपल्याला अगदी स्पष्टपणे लक्षात येते की, संविधान ही पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारताची राज्यघटना आहे. तर शिवराय आणि त्यांचे स्वराज्य ही चारशे वर्षांपूर्वी मध्ययुगीन कालखंडातील राजे महाराजे, राज्यकर्ते व शासनकर्ते अशी परिस्थिती असणाऱ्या कालखंडातील अभूतपूर्व घटना आहे. शिवरायांचे स्वराज्य आणि विसाव्या शतकात परकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतासाठी निर्माण केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या दोन्ही गोष्टी वरवर पाहता पूर्णतः वेगवेगळ्या वाटणाऱ्या आहेत. त्यांचे विचार, त्यातील आचार, मूल्ये, तत्वे ही कोणत्याही अर्थाने एकमेकांशी जोडणार नाहीत असे सहज वाटते. याचे कारण आपण भारतीयांनी \u003cbr\u003eथोरपुरुषांना, महानायकांना देखील जातीपातीत विभागलेले आहेत. धर्माधर्मामध्ये वाटणी केलेली आहे. काही विशिष्ट व्यक्तींना, विशिष्ट जातीशी किंवा धर्माशी जोडण्याच्या घोडचुका आपण भारतीय सदोदितपणे करत आलेलो आहोत आणि आजही त्या करत आहोत. मात्र लेखक राहुल रासवे यांनी अभ्यासकांची नव्हे तर अगदी सामान्य वाचकांची सुद्धा या कादंबरीच्या माध्यमातून स्पष्टपणे कान उघडणे केलेली आहेत. ती देखील अतिशय सहज, साध्या, सरळ, सोप्या भाषेत आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद, तंटे, बखेडे निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण ही या राष्ट्रांची सर्वात मोठी संपत्ती आहे. परंतु या संपत्तीलाच आपण कोण आहोत याची अजिबात जाणीव नाही. ही जाणीव निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी, जिज्ञासा वृत्ती निर्माण करण्यासाठी, आपले आदर्श शोधावे यासाठीची जागरूकता निर्माण करण्यासाठी या समवयस्क तरुणाने लेखक म्हणून ही कादंबरी आपल्यासमोर मांडलेली आहे. \u003cbr\u003eया कादंबरीचा हेतू देखील तितकाच उदार आहे. नवतरुणांना आदर्श मॉडेल म्हणजे काय? आणि आपले आदर्श मॉडेल कोणते आहेत? त्यासाठी आपण काय वाचले पाहिजे? काय शोधले पाहिजे? याबाबत ते पूर्णतः दिशाहीन आहेत. यासाठी योग्य ते मार्गदर्शन या कादंबरीच्या रूपाने लेखकाने केलेले आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील चेअरमन आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी देखील या कादंबरीची एकमुखाने निवड केलेली आहे ती अतिशय सार्थ आहे. कारण 21व्या शतकात शिकत असणाऱ्या या तरुणांना आपण कोण आहोत? आपण काय केले पाहिजे? काय वाचले पाहिजे? कोणते आदर्श आपल्यासमोर असावेत? यासारख्या नानाविध प्रश्नांची अजिबात जाणीव नाही. ती जाणीव जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नरत व्हावेत. हा महत्त्वाचा हेतू या कादंबरीच्या निवडीमागे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत कादंबरीच्या निवडीचा हेतू संदर्भग्रंथाच्या वाचनाअंती स्पष्ट होईलच. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67597743718629,"sku":"9789377762629","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikSahityaPrakarShivraiaaniSanvidhan_GitanjaliChine-1.jpg?v=1790847332"},{"product_id":"छत्रपती-संभाजी-महाराज-इ-स-16-जानेवारी-1681-11-मार्च-1690","title":"छत्रपती  संभाजी महाराज (इ.स.16 जानेवारी 1681-11 मार्च 1689)","description":"\u003cp\u003eशैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने भारत सरकारने इ.स. 2020 पासून नविन शैक्षणिक धोरण (NEP) लागू केलेले आहे. त्याची अं लबजावणी भारतातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून होण्यास प्रारंभ झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठां ध्ये नविन शैक्षणिक धोरणाची अं लबजावणी होऊन पदवी व पदव्युत्तर कला शाखेतील इतिहास विषयाचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात येवून लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठां धील इतिहास विषयाचा पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये ‘मराठ्यांचा इतिहास’ हा पेपर अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेला आहे. त्या विषयाच्या अंतर्गत ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध व छत्रपती संभाजी महाराज’ हा घटक आवर्जून शिकविला जातो. महाराष्ट्रातील कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, या विद्यापिठाने शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बी.ए. द्वितीय वर्ष इतिहास विषयाचा अभ्यासक्रम पुनर्रचित केलेला असून. ‘मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)’ हा पेपर लागू केलेला आहे. प्रस्तुत ग्रथांचे लिखाण त्या पेपरच्या अतंर्गत करण्यात आलेले आहे. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध आणि छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी विद्यार्थ्यांना अगदी मुद्देसूद आणि सहज, सोप्या भाषेत व विस्तृतपणे माहिती व्हावी म्हणून सदर ग्रंथाच्या लिखाणाचे प्रयोजन केलेले आहे. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पूत्र होते. इ.स. 1680 ते 1689 अशी त्यांची राजकिय कारकिर्द. म्हणजेच त्यांनी छत्रपती म्हणून एकूण नऊ वर्षे राज्यकारभार केला. या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामगिरी अव्दितीय अशी होती. त्यांना आप्तस्वकीय व परकिय अशा दोघांनाही एकाचवेळी तोंड द्यावे लागले होते. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्यक्ष औरंगजेब बादशाहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत आलेला होता. याशिवाय इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी या परकिय सागरी सत्ताही मराठ्यांचा प्रदेशाला वारंवार त्रास देत होत्या. त्यांचाही बंदोबस्त करण्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर होती. संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द सुरु झाली तेव्हा सगळीच परिस्थिती प्रतिकुल होती असे आढळते. तरीही अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले राज्य व संस्कृती टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ह्या स्वराज्य संस्कृती रक्षणार्थच त्यांना आपल्या प्राणांची आहूती द्यावी लागली. औरंगजेब बादशाहाने त्यांचा क्रूर असा वध केला. पण त्यांच्या वधामुळे सगळा महाराष्ट्र पेटून उठला. आपल्या राजाच्या वधाचा बदला आपण घेतला पाहीजे ही जाणीव \u003cbr\u003eमहाराष्ट्रातील सामान्य जनतेला झाली त्यासाठी सगळे महाराष्ट्रीयन एक झाले. त्यांच्या हौताम्याने स्वांतत्र्ययुद्धाचे होमकुंड प्रज्वलित झाले आणि असंख्य मराठे आपल्या प्राणांची आहूती देण्यास सज्ज झाले. या स्वांतत्र्ययुद्धात औरंगजेबाला शेवटी मृत्यू आला; पण त्याला मराठ्यांचे राज्य जिंकता आले नाही. एवढी उर्मी मराठ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांमुळे निर्माण झाली होती. नऊ वर्षांच्या अल्पकारकिर्दीत केलेल्या कामगिरीचा संक्षिप्त इतिहास विद्यार्थ्यांपुढे आणण्याचा अल्पसा प्रयत्न या ग्रंथाच्या रूपाने करण्यात आलेला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603643760869,"sku":"9789377766313","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ChhatrapatiSambhajiMaharaj_Somkunwar-1_bea94061-5323-470a-8d17-54085eccf55b.jpg?v=1790941185"},{"product_id":"स्वर-कवितेचे-या-पुन्हा-दीप-उजळू-या-swar-kaviteche-ya-punha-deep-ujalu-ya","title":"स्वर कवितेचे (या पुन्हा दीप उजळू या...!) Swar Kaviteche (Ya Punha Deep Ujalu Ya...!)","description":"\u003cp\u003eभारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे “मेरी इक्यावन कविताएं” हे राष्ट्रीय काव्यविचार व्यक्त करणारे काव्यसंग्रहाचे मराठी अनुवाद करताना अत्यंत मनस्वी आनंद आणि राष्ट्रभक्तिपर अभिमानाची भावना मनात दाटून येते.\u003cbr\u003eअटलजींच्या लेखणीने सतत तेवत ठेवलेला राष्ट्रीय जागृतीचा स्फुल्लिंग, त्यांच्या कवितांमधून प्रकटलेला राष्ट्रनिष्ठ विचार आणि तत्त्वज्ञान हे आपल्यासाठी एक अनमोल वैचारिक वारसा आहे. हा अमूल्य राष्ट्रीय ठेवा मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय भाषांमधून अधिक व्यापक स्तरावर प्रचारित करण्यासाठी जे जे सहकार्य लाभले त्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.\u003cbr\u003eया कार्यामागे प्रेरणा ठरलेले देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या राष्ट्रसमर्पित विचारसरणीने आणि कवितांमधील विचारमूल्यांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या आस्थेने या अनुवाद कार्यास वैचारिक पाठबळ मिळाले हेच या उपक्रमाचे खरे प्रेरणास्थान ठरले आहे.\u003cbr\u003eजागतिक काव्यविश्वामध्ये भारतीय संस्कृती, विचारधारा आणि तत्त्वज्ञान यांचा मेरुदंड असलेल्या या काव्यांचा मराठी अनुवाद हा पुढील पिढ्यांपर्यंत राष्ट्रीय वैचारिक वारसा संक्रमित करण्याचा एक विनम्र प्रयत्न आहे.\u003cbr\u003eदेश, राष्ट्रधर्म आणि साहित्यविचारावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना हा अनुवादित काव्यग्रंथ ‘या पुन्हा दीप उजळूया...!’ अशा मर्मस्पर्शी शीर्षकासह सादर करीत आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603701891301,"sku":"9788198865069","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SwarKaviteche_Atalaji_HaridasAkhare-1.jpg?v=1790941387"},{"product_id":"भारतातील-किल्ले-आणि-स्वातंत्र्य-चळवळीतील-योगदान-इ-स-1818-1947","title":"भारतातील किल्ले आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदान (इ.स. 1818  1947)","description":"\u003cp\u003eशहाजी राजांनी कर्नाटकातील अनेक प्रदेशात त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यात चित्रदुर्ग हा किल्ला महत्त्वाचा होय. मराठ्यांनी हा दुर्ग आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. तेथील पाळागारांची मदत घेवून शत्रूंचा पराभव केला. ओनाके ओव्हा या स्त्रीची कथा अंगावर शहारे आणणारी होती. तिचे पती जेवायला गेले आणि त्याचवेळी गुप्तमार्गाने टिपूच्या लष्कराचे किल्ल्यावर आक्रमण होवू लागले. त्यावेळी या स्त्रीने मुसळ हातात घेवून एकेका सैन्याला स्वर्गात कसे पाठविले याची ही कहानी, स्त्री जन्मा तुझी अदभूत कहानी या नावाने अभिमानास्पद आहे. एक शूर स्त्री किती पराक्रम गाजवून दुर्गाचे रक्षण करू शकते हे वाचले म्हणजे विस्मय होतो. उदगीर संत बाबांच्या नावाने उदगीरचा किल्ला ओळखला जातो. येथे घडणाऱ्या कथा आणि या दुर्गाने स्वातंत्र्य रक्षणासाठी केलेला संघर्ष मनाला चटका लावून जातो. या दुर्गातील किल्लेदार हातमखान याची औरंगजेब बादशहा जेव्हा तोरणा दुर्गावर बदली करतो तेव्हा त्याने औरंगजेबाला लिहिलेले पत्र उपलब्ध आहे. त्यांत तो म्हणतो की. तोरणा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा किल्ला. या पृथ्वीवरील डोंगर या किल्ल्याच्या पासंगालाही उतरू शकणार नाहीत, येथे राहतात भुते, राक्षस आणि सैतानी वृत्तीचे काफर. येथील वाऱ्यात शिलाखंड तरंगत असल्यासारखे वाटतात. अशा रौद्रता आणि राकटपणा असलेल्या किल्लयात मला रहावे लागत आहे अतएव या क्षुद्र माणसावर परमेश्वराने कृपा करावी असे तो पत्रात म्हणतो. या पत्रावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बळकट आणि जिंकण्यास कठिण होते ते आपणास दिसते.\u003cbr\u003eदुर्गांची ही अस्मिता सर्वांना कळो याच भावनेने हा ग्रंथ वाचकांनी वाचावा आणि त्यावर अधिक संशोधन व्हावे हीच या प्रसंगी अपेक्षा. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603713196261,"sku":"9789377760366","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BharatatilKilhe_GBShaha-1.jpg?v=1790942216"},{"product_id":"खानदेशातील-निवडक-आधुनिक-कवींच्या-कवितेचा-चिकित्सक-अभ्यास-khandeshatil-nivadak-aadhunik-kavinchya-kavitecha-chikitsak-abhyas","title":"खानदेशातील निवडक आधुनिक कवींच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास (Khandeshatil Nivadak Aadhunik Kavinchya Kavitecha Chikitsak Abhyas)","description":"\u003cp\u003e-\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67603793772773,"sku":"9789393727435","price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KhandeshatilNivadakAadhunikKavincyaKavitechaChikitsakAbhyas_Dr.DnyansagarSuryawanshi_Dharngaon-1_69929527-95a0-47b9-b154-5b91502e0d90.jpg?v=1790943096"},{"product_id":"मध्ययुगीन-मराठी-गद्य-आणि-लीळाचरित्र-एकाक","title":"मध्ययुगीन मराठी गद्य आणि  लीळाचरित्र एकाक","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रस्तावना\u003cbr\u003eमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारकडून मिळालेला आहे. मराठी भाषेची पूर्वपीठिका ही अभिजात भाषेला आवश्यक असलेल्या कालखंडापर्यंत जाऊन शोधता येऊ शकते, हे आता निश्चित झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केव्हा व्यवहारात आली, याविषयीचे वाद आता संपुष्टात आलेले आहे. परंतु या मराठी साहित्याची ग्रंथ निर्मिती ही महानुभाव पंथाच्या उदयानंतर सुरु झाली हे निर्विवाद सत्य आहे. महानुभाव पंथामध्ये साहित्य निर्मिती ही फक्त भक्ती कारणे निर्माण झालेली आहे. मराठी भाषेत साहित्य निर्माण करावे आणि त्याला विशिष्ट दर्जा प्राप्त करून द्यावा असा कुठलाही हेतू हा या साहित्य निर्मितीच्या मागे नाही. मराठी भाषेतील जे साहित्य महानुभाव पंथात निर्माण झाले, ते महानुभाव पंथातील आराध्य असलेले पंचकृष्णांची ‘भक्ती’ या प्रेरणेने. हीच भक्ती प्रेरणा महानुभाव ग्रंथ निर्मितीसाठी सर्वाधिक महत्त्वाची राहिलेली आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की या पंचकृष्णांची भक्तीच हे या महानुभाव साहित्याच्या निर्मिती मागे कार्यरत होती. श्रुती आणि स्मृती या दोन भक्तीप्रकाराच्या हेतूनेच गेल्या सातशे आठशे वर्षांपासून महानुभाव साहित्यामध्ये सातत्याने ग्रंथांची निर्मिती सुरू आहे. महानुभाव साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्वीपासूनच पूर्वग्रह दूषित असाच होता आणि काही अंशी तो आताही असल्याचे सहज जाणवते. \u003cbr\u003eश्रीचक्रधर स्वामींच्या ‘लीळा’ स्मरणातून सुरू झालेला हा ग्रंथ निर्मितीचा प्रवास मराठी साहित्याला मार्गदर्शक असाच ठरलेला आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये साहित्याच्या जवळपास सर्वच प्रकाराची निर्मिती झाली. खरंतर कुठल्याही भाषेमध्ये ज्या वेळेला साहित्याची निर्मिती सुरू होते, तेव्हा ते साहित्य अगदी बाल्यावस्थेत असते. मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेले महानुभाव साहित्य हे सुरुवातीपासूनच प्रगल्भ स्वरूपाचे होते. मध्ययुगीन साहित्यामध्ये निर्माण झालेले सर्व साहित्यप्रकार हे कुठल्याच अंगाने बाल्यावस्थेत असल्याचे जाणवत नाही. हीच खरी मध्ययुगीन मराठी साहित्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याच दर्जेदार साहित्याने नंतरच्या कालखंडामध्ये साहित्य निर्मितीसाठी एक पायंडा घालून दिला. मध्ययुगीन कालखंडातील साहित्य हे भक्तीच्या प्रेरणेने प्रेरित असले तरी, उत्तरार्धामध्ये मात्र ही भक्ती प्रेरणा, सामाजिक इच्छा आणि जाणीवाचे स्वरूप घेताना दिसून येते. हा बदल साहित्यामध्ये साधारणपणे 200 ते 300 वर्षांमध्ये झालेला दिसून येतो. या 200  ते 300 वर्षांच्या कालखंडामध्ये भक्ती प्रवाहातून निर्माण झालेला साहित्य प्रवाह अधिक ृंगारित होत गेला. समाजप्रबोधन, समाजाला वळण लावणे, समाजामध्ये भक्तीची गोडी निर्माण करणे हा विचारही सोबत सोबत सुरु होताच. भक्तीची प्रेरणा ही या कालखंडात कमी का असेना पण होतीच. मध्ययुगीन कालखंडाचा या प्रस्तावनेत विचार न करता त्याविषयीच्या विवेचनामध्ये या सगळ्या बाबी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर लीळाचरित्र ‘एकाक’(एकांक) हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट व्हावा यासाठी माझा अनेक वर्षापासूनचा प्रयत्न होता. एम.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये लीळाचरित्र, एकाक, मादंबेचे धवळे, नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर, सूत्रपाठ यासारख्या महानुभाव साहित्याचा परिचय झालेला होता. एकीकडे जिथे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि दुसरीकडे या मराठी साहित्याची गंगोत्री कुठे आहे? याचा शोध जर विद्यार्थ्यांना घेता आला नाही; तर अभिजात भाषेच्या दर्जाला विशेष महत्त्व राहणार नाही. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614146527461,"sku":"9789377762759","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lilacharitrya_Aujekar-1.jpg?v=1791200956"},{"product_id":"मराठी-व्याकरण","title":"मराठी व्याकरण","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे मूलभूत ते प्रगत ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि सुबोध पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. अनेकदा व्याकरण हा विषय विद्यार्थ्यांना कठीण आणि कंटाळवाणा वाटतो. परंतु योग्य उदाहरणे, सराव आणि सुसंगत स्पष्टीकरण यांच्या साहाय्याने तो विषय सोपा आणिसुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी, मराठी भाषेची गोडी वाढविणे, तिचा शुद्ध आणि प्रभावी वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषिककौशल्य विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. \u003cbr\u003eमराठी भाषा ही प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्य आणि विविध सांस्कृतिक पैलूंनी परिपूर्ण अशी भाषा आहे. संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या भाषेचा अचूक, शुद्ध आणि प्रभावी वापर करण्यासाठी व्याकरणाची भक्कम पायाभरणी असणे गरजेचे आहे. व्याकरण हे केवळ नियमांचे बंधन नसून, ते भाषेला योग्य दिशा देणारे आणि तिच्या सौंदर्यात भर घालणारे साधन आहे.\u003cbr\u003eया पुस्तकाची निर्मिती करताना महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आणि जिज्ञासेला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे. उच्च शिक्षणाच्या पायरीवर वावरत असताना विद्यार्थ्यांची भाषिक सुसज्जता प्रगल्भ असणे आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरजबनली आहे. केवळ परीक्षाभिमुख 4 | प्रशांत पब्लिकेशन्स \u003cbr\u003eदृष्टिकोनातून नव्हे, तर मराठी भाषेच्या उपजत सौंदर्याचा, तिच्या उपपत्तीचा आणि व्युत्पत्तीचा सूक्ष्म मागोवा घेण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. ते करत असताना विद्यार्थ्यांच्या गरजा, त्यांची समज आणि अभ्यासक्रम यांचा सखोल विचार करण्यात आला आहे. व्याकरण विषय अनेकदा कठीण, कोरडा आणि क्लिष्ट वाटतो परंतु तो सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडल्यास विद्यार्थ्यांना तो अधिक रुचकर वाटू शकतो. या उद्देशाने या पुस्तकात प्रत्येक संकल्पना स्पष्ट, सोप्या आणि उदाहरणांसह दिली आहे. \u003cbr\u003eया पुस्तकात मराठी व्याकरणातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. शब्दांचे प्रकार, शब्दरचना, वाक्यरचना, लिंग, वचन, विभक्ती, काळ, अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, तसेच लेखनकौशल्याशी संबंधित घटक यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार आणि अभ्यासक्रमाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614243422437,"sku":"9789377762636","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MarathiVyakran_Rupnar-1.jpg?v=1791205453"},{"product_id":"खोप्यातील-परीस","title":"खोप्यातील परीस","description":"\u003cp\u003eमानवी स्वभाव व जीवनाचा सखोल अर्थ भगवान पाटलांनी त्यांच्या\u003cbr\u003eशक्तीनुसार आकलन केला. पण कथेच्या चौकटीत तो अभिव्यक्त करतांना\u003cbr\u003eतंत्राचे सामर्थ्य काही ठिकाणी कमी पडले. माणसांचे माणूसपण शब्दात सिद्ध\u003cbr\u003eकरताना त्यांचे अंतरंग व स्वभावदर्शन कलात्मक झाले तरच कथेचे कथापण\u003cbr\u003eअधिक प्रभावी ठरते. पाटलांच्या चिंतन सूत्रांनी कथेचा नायक महत्वपूर्ण\u003cbr\u003eमानून पण त्यावर मात करून प्रभाव सिद्ध केला. म्हणून ही कथा ग्रामीण\u003cbr\u003eकथा असली तरी ती मूलतः चिंतन कथा आहे. अर्थात ग्रामीण कथेला\u003cbr\u003eभगवान पाटलांच्या कथेच्या रूपाने चिंतन कथेचे नवे परिमाण प्राप्त झालेय.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647632343269,"sku":"9789377762933","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KhopyatilParis_BhagwanPatil-1.jpg?v=1791627083"},{"product_id":"व्यावसायिक-कौशल्ये-professional-skills","title":"व्यावसायिक कौशल्ये  (Professional Skills)","description":"\u003cp\u003eप्रकाशन व्यवसाय आणि सृजनशील लेखन या दोन घटकांवर हा अभ्यासक्रम आधारलेला असून भाषासाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही दोन्ही घटके केवळ अभ्यासच नव्हे तर, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी उपयोगाची आहे. लेखक, वाचक, साहित्य चळवळ आणि ग्रंथप्रसारांमध्ये प्रकाशन व्यवसायाने भरीव योगदान दिलेले आहे. ज्ञान आणि अभ्यासाच्या क्षेत्रात प्रकाशन व्यवहार नसता तर, मानवी ज्ञान हे संकुचित वर्तुळात बंदिस्त असते. ज्ञानाचा व्यापक अवकाश निर्माण करण्यामध्ये प्रकाशन व्यवसायाने मोलाची भूमिका बजावलेली आहे. आज हा व्यवहार व्यवसाय म्हणून व्यापक झालेला आहे. माध्यम मुद्रित असो किंवा डिजिटल पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वृद्धिंगत होत आहे. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये भाषाभ्यासाच्या माध्यमातून व्यवसायाची बीजे रूजली जावी आणि या कौशल्यावर आधारीत रोजगार त्यांना प्राप्त व्हावा याकरीता प्रकाशन व्यवहाराचे मूलतंत्र सदर पुस्तकात सविस्तरपणे मांडलेले आहे. किंबहुना प्रकाशन व्यवसायाची बाराखडीच येथे मांडलेली आहे.\u003cbr\u003eआजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांचा स्फोट झालेला असून सातत्याने नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती लोकांमध्ये वाढलेली आहे. लोकांच्या या उत्सुकतेचे क्षमण करण्याची क्षमता ही सृजनशील लेखन करणारा व्यक्तीच करू शकतो. सृजनशील लेखन म्हणजे नाविन्यपूर्ण लेखन. हे लेखन फक्त व्यक्तीच निर्माण करू शकतो. कल्पनाविलास आणि विचारशक्ती असली की सृजनशील लेखन जन्माला येते. विविध प्रसारमाध्यमांमध्ये सृजनशील लेखन करणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे म्हणून मग, सृजनशील लेखनाची मूलतत्त्वे नेमकी कशी आहेत याचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647662620901,"sku":"9789377762155","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayikkaushalye_Ghorpade-1.jpg?v=1791628211"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/marathi.oembed?page=4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}