Your cart is empty now.
संघटनात्मक वर्तणूक हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. कॉम.
भाग-2 वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत सीबीसीएस प्रणालीवर
आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जुन 2022 पासून सुरू करण्यात आलेल्या
अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्य पुस्तक आपल्या हाती देताना
आनंद होत आहे.
प्रस्तुत पुस्तकात संघटनात्मक वर्तणूकीचा आढावा, व्यक्तिगत वर्तणूक, समूह
गतिमानता आणि समूह वर्तणूक, अभिप्रेरणा आणि नेतृत्व, सत्ता, राजनीति आणि
संघर्ष, संघटनात्मक बदल आणि संघटनात्मक विकास इत्यादी मूलभूत संकल्पना
स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण
देण्यात आलेले आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना
उपयुक्त ठरेल, अशी खात्री आम्हाला वाटते. तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि
संबंधित शिक्षकांना देखील उपयुक्त होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले
आहे.