Welcome to Prashant Publications

Rs. 425.00
Availability: 10 left in stock

प्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास
- +

प्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर अलेक्झांडरने आक्रमण करून हिंदुस्थानचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला. पुढे शक, हुण, कुशाण, तुर्क आणि मोगल अशा अनेकांची आक्रमणे येथे झाली. 15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. प्रबोधनामुळे धर्मसत्तेचे जोखड झुगारून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुक्त समाजव्यवस्था निर्माण झाली. सर्वप्रथम वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी इ.स. 1498 मध्ये भारतात आला. त्यापाठोपाठ पाश्चात्य प्रवासी व व्यापार्याकरीता व्यापारी कंपन्यांचा ओघ सुरू झाला. या प्रयत्नात पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड इ. राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातील गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अखेर इंग्रजांना यश आले. इंग्रजांची राजवट अन्यायी, अत्याचारी, जुलूमी होती. इंग्रजांनी राज्य करण्यासाठी त्यांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्यात. इंग्रजी शिक्षणाचे द्वार भारतीयांना खुले केले. परिणामी भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळून भारत पारतंत्र्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतीयांनी आपापल्या परिने स्वातंत्र्यलढा सुरू केला. सामाजिक व राजकीय लढे देखील सुरू झाले. सरतेशेवटी ब्रिटीशांच्या जुलूमी सत्तेचा शेवट होऊन भारत स्वतंत्र झाला.