Welcome to Prashant Publications

Rs. 395.00
Availability: 10 left in stock

कोणताही समाज हा साहित्यावर टिकतो, तो केवळ पूजा-पाठ आणि कर्मकांड यांच्यावर टिकत नसतो. साहित्य हा समाजाचा मूळ पाया असतो. तो दृढ करण्याचे महत्वाचे कार्य मध्ययुगीन काळात दुर्गांनी केले. हेमाद्रिचा चर्तुवर्ग...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महाराष्ट्रातील किल्ले सांस्कृतिक योगदान
- +

कोणताही समाज हा साहित्यावर टिकतो, तो केवळ पूजा-पाठ आणि कर्मकांड यांच्यावर टिकत नसतो. साहित्य हा समाजाचा मूळ पाया असतो. तो दृढ करण्याचे महत्वाचे कार्य मध्ययुगीन काळात दुर्गांनी केले. हेमाद्रिचा चर्तुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ दौलताबादच्या किल्ल्यात लिहिला गेला. जैनांचा पहिला ज्ञानकोश याच दुर्गावर कलानिधी वैद्यनाथ यांनी तयार केला. इ.स.1493 च्या सुमारास जैन महाकवी जिनदास आणि पुण्यसागर यांनी हरिवंश पुराणाची रचना केली. हा ग्रंथ 67 अध्यायांचा असून त्यात अकरा हजार ओव्या आहेत. या ग्रंथातून जैन परंपरेत श्रीकृष्णाची असलेली व्यक्तीरेखा महाराष्ट्राला समजू शकेल. केशव याने वैद्यकशास्त्रावर तर त्याचा पुत्र बोपदेव याने व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यावर तीन, भागवत तत्त्व विशद करण्यासाठी तीन आणि तिथी निर्णयावर एक इतक्या ग्रंथ रचना स्वत: केल्या. बागलाणची राजधानी मुल्हेर किल्ल्यावर इ.स.1610 मध्ये कवी मधुकर याने कथा कल्पतरू हा ग्रंथ पूर्ण केला. तो मुल्हेरचा उल्लेख वाटिकानगर, मयुराचल असा करतो. त्याच्या ग्रंथातून तत्कालिन बागलाणच्या राजाच्या व मुल्हेर किल्ल्याच्या वैभवाची व समृद्धीची कल्पना येते. पन्हाळा येथे पंडित रामचंद्र अमात्य यांनी मराठा राजनीतीवरील आपला प्रसिद्ध ग्रंथ आज्ञापत्र हा लिहिला. लोकमान्य टिळकांनी सिंहगडावर आर्क्टिक होम इन द वेदाज आणि गीतारहस्य या दोन प्रसिद्ध ग्रंथांच्या मुद्रण प्रती येथेच तयार केल्या. गोपाल नायक, शारंगदेव, कवी नरेंद्र यांच्या कला दुर्गातच विकसित झाल्या म्हणून दुर्ग हे साहित्य आणि कलेचे सृजनदाते होते असे म्हटले पाहिजे.