Your cart is empty now.
लेखकाने पहिल्याच प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे उदाहरण दिलेले आहे. वॉरन बफे रोज संध्याकाळी सहा वाजेनंतर आपला संपूर्ण वेळ कुटुंबीयांसोबत घालवतात, स्वतः नातवंडांना शिकवितात, कुटुंबीयांसोबत वेळ घालत असताना व्यत्यय येऊ नये म्हणून आपला मोबाईल बंद करून ठेवतात, जेवणानंतर पत्नीसोबत फिरायला जातात. नेमकं हेच पोलिसांना
काळजातील पोलीस महासंचालक | 7
शक्य होत नाही. घरी वेळ देता येत नसल्याने त्यांना कौटुंबिक मूल्य देता येत नाही, परिवारासोबत जेवण करता येत नाही, त्यांच्यासोबत फिरायला जाता येत नाही, त्यांचा अभ्यास घेता येत नाही, ही खंत लेखक व्यक्त करतो. पण संजय पांडेंसारखा पोलीस महासंचालक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात, पोलीस महासंचालक कार्यालयाने कोणती कामे केली, कोणत्या कामाला यश आले, कोणते प्रस्ताव शासनाला पाठवले, कोणते मंजूर झाले, कोणती कामे करावयाची आहेत याची इत्यंभूत माहिती फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस दलाला देतात. एखाद्या कामाबद्दल अपयश आलं तर सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणायला सुद्धा ते मागेपुढे पाहत नाही, त्यांच्या कार्याने, त्यांच्या वाणीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या काळजालाच स्पर्श करतात. म्हणूनच माझ्यासारखा सर्वसाधारण पोलीस कर्मचाऱ्याने हातात लेखणी घेतली आणि जन्म झाला ‘काळजातील पोलीस महासंचालक’ या शीर्षकाचा/पुस्तकाचा. असे लेखक म्हणतो.
एकंदरीत पुस्तकाची भाषा शैली, प्रकरणाची नावे, पुस्तकाचे शीर्षक हे सारच काळजाला स्पर्श करतं. नक्कीच हे पुस्तक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल