{"title":"Pedagogy","description":"","products":[{"product_id":"आनंद-आणि-निरामय-स्वास्थ्याचे-मानसशास्त्र","title":"आनंद आणि निरामय स्वास्थ्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशोपन हॉवर सारख्या टोकाच्या निराशावादी तत्त्वज्ञानापासून ते अनेक वैश्विक तत्त्वज्ञानाचे सार दर्शविते की “दु:खम सर्वम्” अर्थात ‘संसार-जीवन दु:खमय आहे.’ सिग्मड फ्राईड या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या मते, मानव सुख तत्त्वावर काम करतो. प्रत्येकाला जीवनात सुख-आनंद हवा असतो. दु:ख, दु:खाची कारण राहणारच, पण दु:खातही सुख शोधण्याची दृष्टी सकारात्मक मानसशास्त्रातून अभ्यासली जाते. स्थितीस्थापकत्त्व भाव अंगीकारुन फिनीक्स पक्षांसारखे उभे रहा! दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावादी वृत्ती आणि कणखरपणाच्या बळावर व्याधीवर मात करा! धैर्य आणि चिकाटीच्या बळावर कठिणतम निर्धारित ध्येय साध्य करा. प्रामाणिकपणा, सामंजस्य, उच्च नैतिक मूल्य अंगिकारुन जीवनात यशस्वी व्हा! भावनिक बुद्धिमत्ता साकारुन स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या भावना जाणून सहानुभूतीपूर्ण व्यवहार करा! कृतज्ञताभाव आणि क्षमाशील वृत्तीतून इतरांप्रतीचा राग, द्वेष भावना मनातून हद्दपार करा! विचारात नाविण्यपूर्णता, खुलेपणा आसू द्या! सौंदर्यदृष्टी दर्शवून फ्लो आणि सेव्हरिंग अनुभवातून जीवनात पुरेपूर आनंद मिळवा. जीवनात सकारात्मक भावनांचे प्राबल्य दिसू द्या. मनोसजगता सारख्या ध्यानतंत्राद्वारा कटू, दु:खद नकारात्मक विचारांकडे स्थितप्रज्ञवृत्तीने पाहण्यास शिकून मन:शांती मिळवा! यातूनच जीवन आनंदमय होईल आणि निरामय स्वास्थ्य लाभेल. हेच सकारात्मक मानसशास्त्राचे सार या आवृत्तीतून प्रस्तुत करण्याचा प्रयास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व लिखाण बामगार्डनर आणि मँरी क्रोथर्स च्या ‘सकारात्मक मानसशास्त्र’ तसेच स्नायडर आणि लोपेझचे ‘हँडबुक ऑफ पॉझिटिव्ह सायकालॉजी’ या पुस्तकांच्या आधारे केलेले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386672689381,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anand-Aani-Niramay-Swasthyache-Manasshastra_Dr-Chudaman-Badgujar_cnvt-1.jpg?v=1770718032"},{"product_id":"समायोजनाचे-मानसशास्त्र","title":"समायोजनाचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘समायोजनाचे मानसशास्त्र’ या पुस्तकात मनःस्तरावरील उलथापालथीचा आढावा घेताना नोंदविलेले दिसून येते. मानवाचे विज्ञानाच्या प्रगती बरोबर त्याच्या मानसिकतेचे उन्नय झाले नाही. विज्ञानाबरोबर गतिशील न राहता तो मानसिक दृष्ट्या स्थितीवादी राहिला. भौतिक प्रगतीच्या असोशीतून निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात मानवी मन तडफडत राहिले. भारतीय परिप्रेक्षात मानवी जीवनाचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते, की मानवाने वैज्ञानिक प्रगती बरोबर कर्मकांडाचा कमंडलू सोबत घेतल्यामुळे तो इतर देशातील मानवाच्या तुलनेत अधिक भ्रमिष्ट झाल्याचे दिसून येते. भारतात 1990 नंतर खुल्या बाजारपेठेमुळे यंत्रयुगाने बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत. यंत्राने मानवी मनाचा कब्जा घेऊन भावनिकतेला पर्यायाने नातेसंबंधाला तिलांजली दिलेली असताना, एकाकी झालेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत अनेक प्रश्नांच्या जंजाळात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मानवी वर्तनाच्या आणि मानसिकतेच्या प्रश्नावर मानवाच्या समायोजनावरील हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल. 21 वे शतक हे गुंतागुंतीचे आणि धावपळीचे असून यंत्राने आपल्या अजस्त्र बाहूत मानवी जीवन कवटाळून त्याचे वर्तन अंकित केल्याचे दिसून येते. या शतकातील मानवी वर्तनाचा त्याच्या मनाच्या स्थिती आणि गतीचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण समायोजनाचे मानसशास्त्र या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e21 व्या शतकातील मानवी जीवन कमालीचे अभावग्रस्त झाले आहे. या अभावग्रस्त दुनियेतील एकांतपणा माणसाला पोखरून टाकणारा आहे. मानव स्वांतसुखाय होण्यासाठी धडपडत आहे. भौतिक साधनांच्या आणि यांत्रिक वस्तूंच्या जंजाळात अडकून पडलेला मानव भौतिक सुविधा व यंत्र युगातून मिळालेल्या तंत्राशी खेळत हस्तिदंती मनोऱ्यातील आभासी जीवन जगतानाचे त्याचे कोरडेपण त्याच्या वाट्याला आले आहे. या सर्व मानवी वर्तन व्यवहाराचा, मनोसामाजिक स्तरावरील विविध पैलूंचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. एकूणच मानवी मनाला आत डोकवायला लाऊन तंत्र युगाच्या आभासी दुनियेत स्वान्तसुखाय झालेल्या माणसाला सभोवतालतेबरोबरच मानवी अस्तित्वाचा परिचय करून, त्याला कृतीप्रवण करणारे हे पुस्तक मानवी जीवन सुखावह करण्यात मोलाची भूमिका घेईल यात मुळीच शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401616109797,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samayojnache-Mansshastra_Dr-Santosh-Savadekar_cnvt-1-198x300.jpg?v=1770894130"},{"product_id":"वैकासिक-मानसशास्त्र-1","title":"वैकासिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eवैकासिक मानसशास्त्राची सुरवात ही पहिल्या महायुद्धाच्या काळात झाली. या काळातच बालकांचा आणि किशोरांचा मानसशास्त्रीय मनोव्यापारांचा अभ्यास केला गेला. उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांनी अर्भकांच्या वर्तनाचे वैकासिक स्वरूप मांडले. डार्विन यांच्या संशोधनातूनच बालकांच्या वृत्ताला शास्त्रीय स्थान प्राप्त झाले. समायोजनाच्या दृष्टीने सुरवातीला वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी वयाचा आणि विकासावस्थांचा अभ्यास केला. 19 व्या शतकाच्या शेवटी पाश्चात्य देशांमध्ये विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरवात झाली. मानसशास्त्रामध्ये हालिंगवर्थ, जीन पीयाजे, स्टॅन्ले हॉल, डार्विन, बुहलर, प्रेसी, कार्ल रॉजर्स, अब्राहम मॅस्लो, कोन्राड लॉरेन्झा, ब्रॉनफेन ब्रेनर, अलबर्ट बांडूरा, बी. एफ. स्किनर, जे.बी. वॉटसन, एरिक एरिक्सन, डॉ. सिग्मंड फ्रॉईड यासारख्या अनेकांनी दीर्घ परिश्रम करून आपापले महत्त्वपूर्ण संशोधन प्रसिद्ध केले. 1970 च्या दशकानंतर मानव विकासासंबंधी विचारप्रवाह अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांमध्ये दृढ झाला.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात जीवनकक्षा दृष्टीकोन, विकासाचे स्वरुप, विकासाचे सिद्धांत, जीवनकक्षा विकास, अनुवंश आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया, जन्मपूर्व विकासावस्थेचे घातक घटक आणि धोके, पुनरुत्पादनाची आव्हाने आणि निवड, जन्मपूर्व अवस्थेची गती आणि जन्मप्रक्रिया, नवजात अवस्थेचे मूल्यांकन, शैशावस्थेतील शारीरीक वाढ आणि विकास, कारक, वेदनिक, सांवेदनिक आणि बोधनिक विकास, अध्ययन, स्मृति आणि संकल्पना, भाषा विकास, शारीरिक बदल आणि बोधात्मक बदल, ‘स्व’, भावना आणि नैतिक विकास इ. विविध मुद्द्यांचे सर्वांगिण विवेचन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eVaikasik Manasshashtra\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451586392293,"sku":null,"price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasik-Manasshashtra_Dr-B-U-Pawar-Copy.jpg?v=1771584986"},{"product_id":"शैक्षणिक-मानसशास्त्र","title":"शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eशैक्षणिक मानसशास्त्र हा संदर्भग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड् पदवीच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच डी.टी.एड्, एम.एड्, एम.एस्.डब्ल्यू. (चडथ), मानसशास्त्र, समाजशास्त्र, बालकल्याण विभाग, बी.एड् पूर्व परीक्षा अभियोग्यता चाचणी (ढअढ), सर्व विषयाच्या सेट आणि नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी तसेच हा विषय अध्यापन करणाऱ्या सर्व क्षेत्रातील शिक्षकांना व अभ्यासकांना या संदर्भग्रंथाचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003eशैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचा उपयोग अध्ययनार्थी व अध्यापक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भग्रंथाचे लेखन करताना मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पद्धती, तत्त्वे यांचा प्रत्यक्ष वापर कसा करावयाचा याचे उपयोजन अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालकांच्या विकास अवस्था व त्यावर परिणाम करणारे घटक, व्यक्तिभेद निर्माण होण्याची कारणे-उपाय, अध्यापनाची परिणामकारकता, विशेष शिक्षण घेणारी मुले, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, सृजनशीलता, विचार, कल्पना, संकल्पना व समस्या निराकरण, ज्ञानरचनावाद, संकल्पना चित्रण व मनोचित्रण याचा प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनात वापर, मेंदू आधारित अध्ययन, प्रश्नावलीच्या साह्याने उजव्या व डाव्या मेंदूचे प्राबल्य ओळखणे, ताण व्यवस्थापन, अध्ययनार्थीची विविधता, राजकीय सामाजिक व सांस्कृतिक मितींचे बालकावर होणारे परिणाम आणि त्यांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवन जगत असताना होणारा उपयोग अत्यंत मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48468463714533,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Manasshastra_Prof-V-B-Adsare_cnvt-1.jpg?v=1771939353"},{"product_id":"वैकासिक-मानसशास्त्र-2","title":"वैकासिक मानसशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470919282917,"sku":null,"price":165.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vaikasik-manasshastra-1.jpg?v=1772020990"},{"product_id":"प्रगत-सामाजिक-मानसशास्त्र","title":"प्रगत सामाजिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसामाजिक मानसशास्त्राचा विकास सावकाश होत गेला. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोच्या मते, व्यक्तीच्या विचारांवर व वर्तनावर त्याच्या समाजाचा प्रभाव पडतो. शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्य त्याच्या जन्मजात प्रवृत्ती बदलू शकतो. थॉमस मूर यांनी सामाजिकरणाचे महत्त्व प्रतिपादित केले. कार्ल मार्क्स यांनी समूहाचे अस्तित्व मूलभूत मानले व समाजरचनेचा माणसाच्या स्वभावाशी, अभिवृत्तींशी आणि वर्तनाशी संबंध लावला. 1908 ते 1924 च्या दरम्यान सामाजिक मानसशास्त्र हे स्वतंत्र विज्ञानशाखा म्हणून उदयास आले. 1908 मध्ये विल्यम मॅकडुगल यांनी सामाजिक मानसशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. त्यात मनुष्याच्या जन्मजात प्रवृत्तींवर, सहजप्रवृत्तींवर त्याचे सामाजिक वर्तन अवलंबून असते असे मत मांडले. 1950 ते 1970 च्या दरम्यान फेस्टिंजर, केली, ड्युश, थिबट, शॅक्टर यांनी सामाजिक मानसशास्त्रात उल्लेखनीय कार्य केले. 1960 च्या दशकात सामाजिक आंतरक्रियेच्या जवळपास सर्वच बाजूंवर म्हणजे आंतरव्यक्तिक आकर्षण, आरोपण, सामाजिक संवेदन, आज्ञापालन, अनुसरिता, आक्रमकता इत्यादी बाबींवर संशोधन करण्यात आले. 1980 च्या दशकात सामाजिक मानसशास्त्रात बोधात्मक दृष्टिकोनाचा अभाव व मानसशास्त्रीय तत्वांचे उपायोजन करण्याचा प्रभाव याबाबत उत्कर्ष झाला. व्यक्तीच्या वर्तनाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470920823013,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pragat-Samajik-Manas-1.jpg?v=1772021247"},{"product_id":"आधुनिक-उपयोजित-मानसशास्त्र-आणि-मानवी-जीवन","title":"आधुनिक उपयोजित मानसशास्त्र आणि मानवी जीवन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या काळात मानसशास्त्राचे स्वरूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे कार्य वाढलेले आहे असे म्हणता येईल. मानवी वर्तनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा निर्माण झालेल्या आहेत. या शाखाद्वारे मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते. वाढते औद्योगिकरण आणि तंत्रज्ञान यामुळे मानवी व पर्यावरणीय समस्याही वाढलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न उपयोजित मानसशास्त्रज्ञ करतात. उपयोजित मानसशास्त्राचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, सैद्धांतिक व उपयोजित मानसशास्त्रीय संशोधन आणि मानसशास्त्रीय सेवा यांच्या दिर्घकाळ योगदानामुळेच आज उपयोजित मानसशास्त्राचे क्षेत्र खुप विस्तृत झालेले आहे. मानसशास्त्राचा प्रचंड आवाका लक्षात घेता सर्व समस्यांचा एकत्रित अभ्यास करणे कठीण झालेले आहे. म्हणूनच उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखा उदयास आलेल्या आहे. सदर पुस्तकात उपयोजित मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, प्रायोगिक व अप्रायोगिक आणि प्रदत्त संकलनाची तंत्रे, मुलाखत, निरीक्षण, सर्वेक्षण, मानसशास्त्रीय चाचण्या, व्यक्तीवृत्त याचप्रमाणे मानसशास्त्राच्या विविध शाखांचाही यथायोग्य परामर्श घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470927802597,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Modern-Applied-Psychology_cnvt-1.jpg?v=1772022128"},{"product_id":"आधुनिक-सामाजिक-मानसशास्त्र","title":"आधुनिक सामाजिक मानसशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473902121189,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Samajajik-Manasshastra-1.jpg?v=1772088532"},{"product_id":"मानसशास्त्रातील-मूलभूत-तत्वे-आणि-संकल्पना","title":"मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना","description":"\u003cp\u003eशैक्षणिक वर्ष 2022-23 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानसशास्त्र अभ्यास मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार ह्या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेषत्वाने ज्या नवीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. आदींचा सविस्तरपणे उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे बदल हा विश्वाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून सातत्याने प्रवाही राहणे नवनवीन बाबींचा स्वीकार करणे ह्या विचारसरणीला अनुसरुन या पुस्तकात संशोधनातून प्राप्त माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा त्रुटी आपल्या निदर्शनास आल्यास मला अधिकारवाणीने लेखी किंवा तोंडी स्वरूपात दिल्यास त्यांचे मी स्वागतच करेन यामध्ये जे काही चांगले योग्य निर्माण झाले, याचे सर्व श्रेय वाचकांचेच असेल.\u003cbr\u003eविद्यार्थीकेंद्रीत पुस्तक होणे महत्त्वाचे आहे त्या दृष्टीने पुस्तकाची भाषा सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भारतीय मानसशास्त्रातील अभ्यासकांच्या द्वारे प्राप्त माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये किती यशस्वी झालो हे वाचकांनीच ठरवावे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477506535653,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastratil-Mulbhut-Tatve-Aani-Sankalpna_Prof-R-U-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772178405"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-शोध-सारांश","title":"शैक्षणिक संशोधन शोध सारांश","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477754097893,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-2020_cnvt-1.jpg?v=1772189092"},{"product_id":"संशोधन-पद्धती","title":"संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477931634917,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-2022_Dr-V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772194609"},{"product_id":"सकारात्मक-मानसशास्त्र-1","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479674990821,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sakaratma-Manasshastra-Labhane14_cnvt-1.jpg?v=1772253382"},{"product_id":"बौद्धिक-संपदा-हक्क-स्वरुप-आणि-समस्या","title":"बौद्धिक संपदा हक्क स्वरुप आणि समस्या","description":"\u003cp\u003eमनुष्य हा बुध्दीजीवी प्राणी आहे. परमेश्वराने मानवाला बुध्दीची देणगी देऊन सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ ठरविले आहे. मनुष्य हा बुध्दीचा वापर करुन नवनवीन संशोधनाद्वारे आपले जीवनमान दिवसेंदिवस अत्याधिक सुकर बनवित आहे. मानवी समूहात काही लोक सर्जनशील वृत्तीचे असतात. त्याच्या ठायी सर्जनशीलता असते. या सर्जनशीलतेतूनच नवनवीन शोध लावून ते या शोधांचा संपूर्ण मानव जातीला उपभोग घेण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. परंतु असे शोध लावण्यात त्यांनी आपली बुध्दी, वेळ, श्रम आणि पैसा खर्ची घातला असतो. त्यामुळे अशा शोधकर्त्यांना त्यांच्या कार्याच्या श्रेयाबरोबरच योग्य तो आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या शोधाचा दुरुपयोग होता कामा नये या विचारातून बौध्दिक संपदा हक्क ही संकल्पना उदयास आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबौध्दिक संपदा हक्क हा औद्योगिक आणि साहित्य, कला विषयक मानवी मनाच्या निर्मितीवरील विविध हक्कांचा समुच्चय आहे. त्यात पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक संकल्पचित्र, भौगोलिक विशेषतादर्शक चिन्ह, सुक्ष्म जीव-जंतूंसाठी पेटंट, रोपांच्या नवीन जाती\/नमुन्यांना संरक्षण आणि परंपरागत ज्ञानभांडारास संरक्षण इत्यादी अनेक वेगवेगळ्या हक्कांचा समावेश आहे. नवे संशोधन, नवी उत्पादने आणि नव्या प्रणाली यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळत असते. त्या द़ृष्टिने बौध्दिक संपदेचे देशाच्या आर्थिक विकासातील महत्व लक्षात येत असले तरी बौध्दिक संपदा हक्कांविषयीच्या काही समस्या निर्माण होतात. प्रस्तुत ग्रंथात बौध्दिक संपदा म्हणजे काय? बौध्दिक संपदा हक्काचा इतिहास, बौध्दिक संपदा हक्काची गरज किंवा आवश्यकता, बौध्दिक संपदा हक्काचे स्वरूप आणि बौध्दिक संपदा हक्कांच्या समस्या यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479680397541,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Intellectual-Property-Rights_Nature-and-Problems_Marathi_cnvt-1.jpg?v=1772253439"},{"product_id":"आधुनिक-सामान्य-मानसशास्त्र","title":"आधुनिक सामान्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मानसशास्त्राचे आजचे स्वरुप हे अत्यंत शास्त्रीय दिसून येते. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी जर्मनीतील लाईपझिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा (1879) स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भात अनेक पैलूंची माहिती मानसशास्त्रातील संशोधनामुळे आपल्याला मिळत आहे; ती माहिती शास्त्रशुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील पुस्तकाचे प्रयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रात जे वेगाने बदल होत आहे त्यांचीही दखल घेतली गेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, मानसशास्त्राचे वाचक तसेच सर्वांना निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479683281125,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Samanya-Manas-Shastra_cnvt-1.jpg?v=1772254110"},{"product_id":"औद्योगिक-मानसशास्त्र","title":"औद्योगिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eरशियामध्ये 1920 पासून औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. औद्योगिक परिस्थितीमध्ये कर्मचार्याचे स्वास्थ कसे चांगले राहू शकते या दृष्टीने प्रयत्न केल्या गेले. कर्मचार्याचा एकंदरीत विकास साधला जावा, त्यातही व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी मध्यवर्ती संस्थेतर्फे कार्य केल्या गेले. भारतात 1919 मध्ये औद्योगिक मानसशास्त्राला सुरवात झालेली दिसून येते. या संदर्भाने याच वर्षात मानसशास्त्र विभागाला सुरूवात केल्या गेली. सद्यस्थितीत वाढत्या कामाबरोबर वाढणारा ताण औद्योगिक मानसशास्त्रामधील संशोधनाचा विषय झालेला आहे. कर्मचार्याच्या प्रेरणा वाढलेल्या आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीकोनातून औद्योगिक मानसशास्त्र उद्योगाच्या एकूण समस्याचे निराकरण करणारे शास्त्र ठरते तसेच उपयोजनात्मक साधन ठरत असल्याचे दिसून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसद्यस्थितीत उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्याचबरोबर त्या उद्योगामध्ये स्थित व्यक्तीत चिंता, ताणतणाव, नैराश्य, संघर्ष, वैफल्य इत्यादीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. यावर उपाय करायचा असेल तर उद्योगामधील प्रत्येक घटकाचा मानवी मनाला, वर्तणुकीला केंद्रस्थानी ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणूनच या पुस्तकाचा उद्योगामधील कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक मार्गदर्शक इत्यादींना याचा फायदा होणारच आहे तसेच उद्योग क्षेत्रात ङ्गकरियरफ करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना तर हे पुस्तक महत्वाचे मार्गदर्शकच ठरणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात औद्योगिक मानसशास्त्र, कार्य मुल्यांकन, कर्मचारी निवड, कर्मचारी प्रशिक्षण, नेतृत्व, प्रेरणा, मनोधैर्य, कार्य समाधान, कार्य ताण, व्यवस्थापन विकास, आंतरवैयक्तीक संबंध, उपभोक्ता वर्तन, जाहिरात, अपघात आणि नियंत्रण, औद्योगिक संघटना या घटकांचा परामर्श घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479684788453,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Industrial-Psychology_cnvt-1.jpg?v=1772254267"},{"product_id":"मानसशास्त्राची-मूलतत्त्वे-1","title":"मानसशास्त्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसद्य:स्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, आसक्ती वाढत आहे. त्यामुळे सुख, समाधान मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे, मानसिक समस्या वाढत आहे त्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो, यासाठी सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ हा विषय सद्यास्थितीत महत्वाचा, वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479684985061,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manasshastrachi-Multattve_Prof-D-R-Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254342"},{"product_id":"अपसामान्य-मनोविकृती-मानसशास्त्र","title":"अपसामान्य । मनोविकृती मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवसेंदिवस शारीरिक आजारासोबत मानसिक आजार सुद्धा वाढत आहे. या मानसिक आजाराला अपसामान्य विकृती किंवा मानसिक विकृती असे म्हणतात. सामान्य माणसापेक्षा एखादा व्यक्ती वेगळे वर्तन करायला लागल्यास त्याला आपण सर्रासपणे ‘मॅड’ या संकल्पनेत टाकतो. परंतु खरे पाहता कोणत्या प्रकारचा मानसिक आजार त्या व्यक्तीला जडलेला आहे याची साधी माहिती सुद्धा आपल्याला नसते. विद्यार्थी, शिक्षकांना हे पुस्तक मोलाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये वावरणार्या प्रत्येकच व्यक्तीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण मानसिक समस्या प्रत्येक घरात तसेच प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमाने मानसिक विकृती समजणे, ओळखणे सोपे जाईल यातून मानसिक विकृतीची कारणे माहिती झाल्याने ती उद्भवूच नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करता येतील. या पुस्तकामध्ये कारणासोबतच उपचार सुद्धा प्रत्येकच मानसिक विकृतीवर स्पष्ट केलेले आहे, त्यातून मानसिक विकृतीला दूर ठेवणे सहज शक्य होईल म्हणूनच या पुस्तकाचा ‘ठेवा’ हा प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठीच अमूल्य असाच ठरणार हे नक्कीच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686295781,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Apsamanya-Manasshastra_Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254793"},{"product_id":"सकारात्मक-मानसशास्त्र-2","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686426853,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sakaratmak-Manasashatra-1.jpg?v=1772254871"},{"product_id":"प्रगत-शैक्षणिक-मानसशास्त्र","title":"प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eशिक्षणाचे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. शिक्षण प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती यांच्यात प्रगती करणे, सुधारणा करणे, समस्या सोडविणे ही शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आहेत. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. मानसशास्त्र हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. त्यातील सिद्धांत, तत्त्वे, उपपत्ती म्हणजे शास्त्रशुद्ध व वस्तुनिष्ठ संशोधनाचे फलित आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार मानवात व्यक्तिभिन्नता असते. शरीरयष्टी, रंग, उंची, वजन, स्वभाव वैशिष्ट्ये, अभिरुची, अभिवृत्ती, अभियोग्यता, बुद्धिमत्ता अशा अनंत बाबतीत कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. म्हणूनच मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिविकासाच्या विशिष्ट अवस्था मानल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाची व्याप्ती, सखोलता आणि वेगळेपणा विचारात घेतल्यास प्रस्तुत पुस्तक केवळ बी.एड्., एम.एड्., एम.फिल. साठीच उपयुक्त नाही तर नेट, सेट व शिक्षण क्षेत्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479686656229,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pragat-Education-1.jpg?v=1772254927"},{"product_id":"मार्गदर्शन-आणि-समुपदेशन-1","title":"मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687966949,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Margadarshan-Samupdeshan_cnvt-1.jpg?v=1772255140"},{"product_id":"समावेशक-शिक्षण-विशेष-गरजा-असलेल्या-बालकांसाठी","title":"समावेशक शिक्षण विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी","description":"\u003cp\u003eसमावेशक शिक्षण हे पुस्तक विद्यार्थी मित्र व समस्त वाचकांच्या हाती\u003cbr\u003eदेतांना अतिशय आनंद होत आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे मूल\u003cbr\u003eसर्वसामान्य शाळेत सामावून घेणे म्हणजेच सर्व समावेशक शिक्षण होय. या प्रकारच्या\u003cbr\u003eशाळांसंबधीचा विचार मानसशास्त्रज्ञ नव्याने करू लागले आहेत. बी.एड, एम.एड\u003cbr\u003eस्तरावर हा विषय काही विद्यापीठांमध्ये ऐच्छिक विषय तर काही विद्यापीठांत अनिवार्य\u003cbr\u003eविषय म्हणून शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून या विषयावरील\u003cbr\u003eग्रंथाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सर्वसमावेशक शिक्षणात कर्णबधिर,\u003cbr\u003eअंध, मानसिक अपंगत्व, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षमता, अस्थिव्यंग, स्वमग्नता\u003cbr\u003eया प्रकारचे अपंगत्वाचे प्रकार समाविष्ट होतात. या सर्व प्रकारच्या अपंगत्वाविषयीचे\u003cbr\u003eसखोल ज्ञान व त्यावर शिक्षणातील संधी विद्यार्थ्यांना माहित होणे गरजेचे आहे. हे\u003cbr\u003eपुस्तक बी.एड, एम.एड, एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना याशिवाय शिक्षणक्षेत्रात\u003cbr\u003eकाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल असे लेखिकांना प्रामाणिकपणे\u003cbr\u003eवाटते.\u003cbr\u003eया पुस्तकात पहिल्या प्रकरणात समावेशक शिक्षणाची संकल्पना, वैशिष्ट्ये,\u003cbr\u003eउद्दिष्टे व व्याप्ती तसेच विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण व समावेशक शिक्षण यातील\u003cbr\u003eफरक अचूक स्पष्ट केलेला आहे\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479688032485,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samaveshak-Shikshan-Nemade_cnvt-1.jpg?v=1772255204"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/pedagogy.oembed?page=3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}