Your cart is empty now.
समावेशक शिक्षण हे पुस्तक विद्यार्थी मित्र व समस्त वाचकांच्या हाती
देतांना अतिशय आनंद होत आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे मूल
सर्वसामान्य शाळेत सामावून घेणे म्हणजेच सर्व समावेशक शिक्षण होय. या प्रकारच्या
शाळांसंबधीचा विचार मानसशास्त्रज्ञ नव्याने करू लागले आहेत. बी.एड, एम.एड
स्तरावर हा विषय काही विद्यापीठांमध्ये ऐच्छिक विषय तर काही विद्यापीठांत अनिवार्य
विषय म्हणून शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून या विषयावरील
ग्रंथाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सर्वसमावेशक शिक्षणात कर्णबधिर,
अंध, मानसिक अपंगत्व, मेंदूचा पक्षाघात, अध्ययन अक्षमता, अस्थिव्यंग, स्वमग्नता
या प्रकारचे अपंगत्वाचे प्रकार समाविष्ट होतात. या सर्व प्रकारच्या अपंगत्वाविषयीचे
सखोल ज्ञान व त्यावर शिक्षणातील संधी विद्यार्थ्यांना माहित होणे गरजेचे आहे. हे
पुस्तक बी.एड, एम.एड, एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना याशिवाय शिक्षणक्षेत्रात
काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल असे लेखिकांना प्रामाणिकपणे
वाटते.
या पुस्तकात पहिल्या प्रकरणात समावेशक शिक्षणाची संकल्पना, वैशिष्ट्ये,
उद्दिष्टे व व्याप्ती तसेच विशेष शिक्षण, एकात्म शिक्षण व समावेशक शिक्षण यातील
फरक अचूक स्पष्ट केलेला आहे