{"title":"Political Science","description":"","products":[{"product_id":"राज्यशास्त्राचा-परिचय","title":"राज्यशास्त्राचा परिचय (Introduction to Political Science)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘राज्यशास्त्राचा परिचय’ या पुस्तकामध्ये पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये, राज्यशास्त्राची व्याप्ती महत्त्व, राज्यशास्त्राचे पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोन, राज्य व राज्याचा विकास, राज्याचे घटक, राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत, सार्वभौमसत्ता, सार्वभौमसत्तेचा एकतावादी व अनेकतावादी सिद्धांत, स्वातंत्र्य व समता संकल्पना, स्वातंत्र्यासाठी आवश्यक अटी. स्वातंत्र्य व समतेचे प्रकार इत्यादी गोष्टी सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला असून अभ्यासक्रमाच्या अनुरूप व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391436959973,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastracha-Parichay_Dr-Arun-Wanarase_cnvt-1-198x300.jpg?v=1770794430"},{"product_id":"राज्यशास्त्र-आणि-भारतीय-राजकीय-व्यवस्था","title":"राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391882866917,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajyashastra-Aani-Bharatiya-Vyavastha_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770798413"},{"product_id":"राजकीय-पत्रकारिता-1","title":"राजकीय पत्रकारिता","description":"\u003cp\u003eआधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eRajkiya Patrakarita\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48457896755429,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Patrakarita_Dr-Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1771827870"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन","title":"महाराष्ट्र प्रशासन (Maharashtra Administration)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474166722789,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1-1.jpg?v=1772092867"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477806559461,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra-1.jpg?v=1772190902"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र-1","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477814751461,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra_Mahendra_cnvt-1.jpg?v=1772190971"},{"product_id":"राजकारणातील-आधुनिक-संकल्पना-आणि-विचार","title":"राजकारणातील आधुनिक संकल्पना आणि विचार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815144677,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Aadhunik-Rajkiy-Sankalpna-Aani-Vichar_Dr-Shriram-Yerankar_cnvt-1.jpg?v=1772191081"},{"product_id":"निवडणूक-व्यवस्थापन","title":"निवडणूक व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eनिवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गांने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गांने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. 1990 ते 1996 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्गांना दूर केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणाम त्यांचे व राजकीय पक्षांचे वारंवार खटके उडाले. सद्यकाळात राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आचारसंहिता व सुधारणांना मान्यता प्रदान केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात निवडणूक व्यवस्थापनाशी निगडित सर्व संकल्पनांचा यथायोग्य आढावा घेवून निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व घटकांचा साकल्याने विचार केलेला आहे. पुस्तकातील एकूण चार प्रकरणात अनुक्रमे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटक, निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारासाठी संबंधित माहिती आणि निवडणुकीसंबंधित मतदान प्रक्रिया आणि राजकीय सहभाग इ. माहितीचा समावेश असून प्रस्तुत पुस्तकलेखनातून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815308517,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Nivadnuk-Vyavsthapan_Mahendra-Patil_cnvt-1.jpg?v=1772191154"},{"product_id":"भारतीय-प्रशासन-आणि-राजकारण","title":"भारतीय प्रशासन आणि राजकारण","description":"\u003cp\u003e‘भारतीय शासन आणि राजकारण’ हा ग्रंथ युजीसी पॅटर्नचा अवलंब करुन तयार करण्यात आला आहे. दिवसेंदिवस भारतीय प्रशासनात व राजकारणात अनेक बदल होत असून होणारे बदल सर्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. सदरील पुस्तक यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी साधी व सरळ आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा समावेश करून त्याबाबत सखोल व सर्वांगिण चर्चा ठिकठिकाणी केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात एकूण 40 प्रकरणांचा समावेश असून ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समिती निर्मिती, भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने, भारतीय घटनेचा सरनामा, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, मागदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार, भारताचे राष्ट्रपती, केंद्रसरकार, उपराष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान, पंतप्रधानाचे कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ, भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, समितीय पद्धती, केंद्रिय मंत्री, सचिवालय, घटक राज्याचे विधीमंडळ\/कार्यकारी मंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्याचे मंत्रीमंडळ, मंत्रीमंडळाचे सचिवालय, घटक राज्यविधी मंडळ विधानसभा, विधान परिषद, भारतातील न्याय व्यवस्था-सर्वोच्च न्यायालय, दुग्ध व्यवसाय, दुय्यम न्यायालये, घटनादुरुस्ती, भारतातील, निर्वाचन आयोग, राष्ट्रीय एकात्मता, राजकिय पक्ष, भारतातील दबाव गट, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा\/ महान्यायवादी\/महाधिक्ता, भारतीय राजकारभारातील मुख्य प्रश्न\/समस्या-जाती\/जातीयवाद, धर्माधर्मवाद, भाषा\/ भाषावाद, प्रादेशिकता, दहशतवाद इत्यादी प्रकरणांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477906206949,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartiy-Prashasan-Ani-Rajkaran_WB-Patil_cnvt-1.jpg?v=1772193608"},{"product_id":"स्थानिक-स्वराज्य-संस्था-1","title":"स्थानिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eभारतात स्थानिक स्वराज्य संस्था अतिप्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या दिसून येतात; त्यात कालानुक्रमे, दिवसेंदिवस बदल व परिवर्तन होत गेले. त्यामुळे त्यांचा विकास होत गेला. तसेच ब्रिटीश काळातही बरेचसे परिवर्तन झाल्याचे दिसून येते. लॉर्ड रिपन भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर त्यांनी स्थानिक संस्थांबाबतीत जनतेच्या कल्याणाचे अनेक निर्णय घेऊन त्यात आमुलाग्र बदल घडवून आणले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात एकूण 20 प्रकरणांचा आढावा घेण्यात आलेला आहे; त्यात प्रामुख्याने भारतातील स्थानिक स्वराज्य, स्वशासनाची उत्क्रांती, उगम-विकास इतिहास, महाराष्ट्रातील नागरी स्वशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, स्थानिक स्वशासन, लोकशाही विकेंद्रीकरण, नागरीकरण, स्थानिक स्वशासनाची वैशिष्ट्ये, घटनात्मक, सामूहिक विकास, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत, प्रशासकिय अधिकारी आणि राजकीय अधिकारी यांच्यातील फरक, स्थानिक स्वशासनातील दोष, नगरपालिकांच्या निवडणूका, वित्तिय व्यवस्था, नियंत्रण समस्या, भारतातील शहरीकरण आणि त्यांच्या समस्या, भारतातील प्रमुख महानगरपालिका व मूल्यमापन या प्रकरणांचा मुद्देसूद आढावा घेण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरहू ग्रंथ युजीसी पॅटर्नप्रमाणे असून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परिक्षांना अत्यंत उपयोगी आहे. तेव्हा प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477906403557,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SthanikSwarajyaSanstha-1.jpg?v=1775302184"},{"product_id":"महाराष्ट्र-प्रशासन-1","title":"महाराष्ट्र प्रशासन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसदर ग्रंथात महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय स्थिती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी, महाराष्ट्र राज्य प्रशासनाची वैशिष्ट्ये, घटकराज्यांचे विधिमंडळ, न्याय व्यवस्था, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, संविधानात्मक व वैधानिक मंडळे, कल्याणकारी प्रशासन, राज्य नियोजन, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, दबाव गट, पंचायत राज, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी. त्यात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, महिला चळवळ, सहकार चळवळ, विद्यार्थी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ आदी असून त्यांचा परामर्श घेतला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, त्यांचे संघटन, कार्य याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र निर्मितीपूर्वीच्या सामाजिक, राजकीय स्थितीचा मागोवा घेऊन अद्ययावत स्थितीची सविस्तर माहिती यथायोग्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच सध्याच्या स्थितीतील महाराष्ट्र शासन, त्याचे संघटन व कार्य यांचा तपशील देण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477920952549,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtra-Prashasan-1.jpg?v=1772194236"},{"product_id":"संशोधन-पद्धती","title":"संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477931634917,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-2022_Dr-V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772194609"},{"product_id":"भारतीय-संविधान-व-शासन","title":"भारतीय संविधान व शासन","description":"\u003cp\u003e‘भारतीय संविधान व शासन’ हा अभ्यास विषय स्वांतत्र्योत्तर कालखंडापासून विशेष महत्वाचा मानला जातो. हे अध्ययन क्षेत्र केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जातात. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून “भारतीय संविधान व शासन’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना समकालीन सामान्य ज्ञान संबंधीचे प्रश्ने, राज्यशास्त्रातील दैनंदिन घडामोडीकरिता हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी ठरेल यात शंका नाही. हा प्रस्तुत ग्रंथ जरी पदवी स्तरावर तयार करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लाभदायक ठरू शकेल, अशी मांडणी यामध्ये करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477937991909,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatiy-Sanvidhan-Shasan_cnvt-1.jpg?v=1772195311"},{"product_id":"राजकीय-सिद्धांत-2","title":"राजकीय सिद्धांत","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477956210917,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Siddhant_cnvt-1.jpg?v=1772196476"},{"product_id":"भारताच्या-जडणघडणीत-पंडित-जवाहरलाल-नेहरुंचे-योगदान","title":"भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरुंचे योगदान","description":"\u003cp\u003eस्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यावर आधुनिक भारताच्या जडणघडणीचा ध्यास ज्या समाजसुधारक नेत्यांनी घेतला होता. त्यात पंडीत जवाहरलाल नेहरुंचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नवभारताची उभारणी लोकशाही मूल्याद्वारे आणि तिची वाटचाल आदर्श पध्दतीने करून भारताच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या होत्या. दारिद्य्र, बेकारी, गरीबी, सामाजिक आणि आर्थिक विषमता, अज्ञान, गुलामीची मानसिकता, ब्रिटीशांनी केलेले आर्थिक शोषण यावर पंडीत जवाहरलाल नेहरुंनी आपल्या विचार आणि कार्याद्वारे यशस्वी मात केल्याचे दिसते.\u003cbr\u003eआपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी समाजावाद, अलिप्ततावाद, मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयकरण, मिश्र अर्थव्यवस्था, राष्ट्रीयीकरण याद्वारे भारताची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची प्रतिष्ठा, सामाजिक सुरक्षा, समता, धर्मनिरपेक्षता, बंधुता, शांतता याबरोबरच बहुलधर्मिय, बहुभाषिकतेला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. आज भारतीय लोकशाहीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या लोकशाहीच्या वाटचालीचे आणि यशस्वीतेचे श्रेय पंडीत जवाहरलाल नेहरुंनाच जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eBharatacha Jadanghadnit Pandit Nehrunche Yogdan\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48478012539109,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bhartachya-Jadanghadnit-Pandit-Nehrunche-Yogdan_Dr-M-K-Waghmare_cnvt-1.jpg?v=1772197653"},{"product_id":"constitution-of-india","title":"Constitution of India","description":"\u003cp\u003eThis book may be known with different names like Indian Constitution, Introduction to Indian constitution, Indian government and Politics, Indian Political System, India Constitution: Government and Political System, Constitution of India etc has its special importance or value.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592176677093,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ConstitutionofIndia_Tunte_Wanarase-1.jpg?v=1774009330"},{"product_id":"भारतातील-राजकीय-पक्ष-व्यवस्था-आणि-दबाव-गट-political-party-system-and-pressure-groups-in-india","title":"भारतातील राजकीय पक्ष व्यवस्था आणि दबाव गट (Political Party System and Pressure Groups in India)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात राजकीय पक्षांचा परिचय, राजकीय पक्षाचा अर्थ आणि व्याख्या राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये राजकीय पक्ष व्यवस्थेचे प्रकार, राजकीय पक्षाची कार्य, भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून मान्यता, लोकशाहीत राजकीय पक्षांचे महत्व, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांची नावे आणि चिन्हे, भारतातील प्रादेशिक राजकीय पक्ष, प्रादेशिक राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, प्रादेशिक राजकीय पक्षाची भूमिका, भारतीय राजकारणावर प्रादेशिक राजकीय पक्षांचा प्रभाव, प्रादेशिक पक्ष आणि आघाडीचे राजकारण, पक्ष व्यवस्था आणि निवडणूक सुधारणा, भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1950 ते 1990), भारतीय पक्ष व्यवस्थेचे बदलते स्वरूप (1990 ते 2014) आघाडीचे युग आणि युती-राजकारणाचा उदय, निवडणूक सुधारणा, राजकीय पक्षांशी संबंधित आदर्श आचारसंहिता, दबाव गट, दबाव गटाचा अर्थ आणि प्रकार, दबाव गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धती, लोकशाहीत दबाव गटांची भूमिका, दबाव गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक, भारतीय राजकारणातील दबाव गट, कामगार संघटना, शेतकरी संघटना, विद्यार्थी चळवळ, व्यावसायिक आणि औद्योगिक गट, FICCI, ASSOCHAM, CII,  स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाची भूमिका, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर दबाव गटांचा प्रभाव इत्यादी घटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617145008357,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartatilRajkiyPakshVyavsthaaaniDabavGat_Wanarse-1.jpg?v=1774603923"},{"product_id":"भारतीय-राजकीय-विचारवंत-indian-political-thinkers","title":"भारतीय राजकीय विचारवंत (Indian Political Thinkers)","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकीय विचारवंत’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजकीय विचारवंतांच्या विचारांमुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय रचनेत अनेक फेरबदल होऊन आलेले आहेत. राजकीय विचारवंतांच्या तत्वज्ञानात शासनकर्त्यांची भूमिका, दृष्टीकोन, तसेच सामाजिक आर्थिक राजकीय समस्यांविषयी त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट येतो. राजकीय विचारवंतांचे विचार समाजाचा व राज्याचा विकास समजून घेण्यासाठी दृष्टीकोन महत्वपुर्ण असतात. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात महात्मा बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, डॉ. बी. आर. आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू या भारतीय राजकीय विचारवंतांच्या विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या मर्यादा लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात या सर्व राजकीय विचारवंतांच्या विचारांचे सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                      \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617156608229,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkiyVicharvant_Wanarse-1.jpg?v=1774605139"},{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्थेतील-अलीकडील-प्रवाह","title":"भारतीय राजकीय व्यवस्थेतील अलीकडील प्रवाह","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाह’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राजकारणात सध्या अनेक महत्त्वाचे प्रवाह कार्यरत आहेत, जे देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम करत आहेत. यामध्ये आरक्षण, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षा तसेच भारतातील राजकीय नेतृत्व यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. या प्रवाहांचा अभ्यास करणे हे समकालीन भारतीय राजकारणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय राजकारणाच्या गुंतागुंतीच्या प्रवाहांना समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाहाचा परिचय आणि\u003cbr\u003eस्वरूप, मिडिया आणि नागरी समाजाची भूमिका, लोकशाही संस्थांसमोरील आव्हाने राजकीय सुधारणा आणि निवडणूक नवकल्पना, भारतातील आरक्षणाचे राजकारण, आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूी, आरक्षणाच्या संविधानातील तरतुदी, मंडल आयोग आणि परिणाम, आरक्षणाचे सध्याचे वादविवाद, राष्ट्रवादाची संकल्पना,\u003cbr\u003eभारतीय राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादाचे प्रकार, राष्ट्रवादाचा धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय ओळखीवर परिणाम, सांप्रदायिकतेची संकल्पना आणि सांप्रदायिकतेची कारणे, सांप्रदायिक दंगली व त्यांचा राजकीय परिणाम, सांप्रदायिकतेबाबत राज्य आणि राजकीय पक्षांची भूमिका, दहशतवादाचा अर्थ आणि भारतातील प्रकार,\u003cbr\u003eभारतातील दहशतवादाची कारणे, दहशतवादाचा संघराज्यवादावर आणि मानवी हक्कांवर प्रभाव, दहशतवाद विरोधी कायदे : णअझअ, छखअ अधिनियम, भारतातील राजकीय नेतृत्व, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्वाचे प्रकार, युवक आणि महिला नेतृत्वाची भूमिका, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्वाची सार्वजनिक प्रतिमा इत्यादी\u003cbr\u003eघटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617242558693,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkiyVyavsthetilAlikadilPravah1-1.jpg?v=1774605450"},{"product_id":"indian-constitution-fundamental-principles-and-nature","title":"Indian Constitution Fundamental Principles and Nature","description":"\u003cp\u003eThis book may be known with different names like Indian Constitution, Introduction to Indian constitution, Indian government and Politics, Indian Political System, India Constitution: Government and Political System, etc. has its special importance or value. The main reason behind is, in the post-independence period when the present area of studies was taking its shape (in the Indian Context),\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632904843493,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/IndianConstitutonCoverfinal-1.jpg?v=1774948559"},{"product_id":"महाराष्ट्रातील-स्थनिक-स्वराज्य-संस्था","title":"महाराष्ट्रातील स्थनिक स्वराज्य संस्था","description":"\u003cp\u003eहे पुस्तक तयार करताना विविध संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन त्याचा संदर्भ पुस्तकाच्या शेवटी देण्यात आला आहे. सर्व अभ्यासक तथा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी प्राचार्य, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल, तसेच आमच्या राजेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षा सौ. शारदाताई गणेशराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय नेताजीराव पवार साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय प्रा. डॉ. कैलासराव पवार साहेब आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, माझे मार्गदर्शक डॉ. श्रीराम येरणकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. हे पुस्तक तयार करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, सहकारी मित्र-परिवार, मार्गदर्शक आणि अभ्यासक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48645101486309,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaharastratilSthanikSwarajyaSanstha_-1_3965f138-5f3f-471d-9cac-8ac276a639c2.jpg?v=1775030793"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/political-science.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}