Your cart is empty now.
निवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गांने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गांने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. 1990 ते 1996 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्गांना दूर केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणाम त्यांचे व राजकीय पक्षांचे वारंवार खटके उडाले. सद्यकाळात राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आचारसंहिता व सुधारणांना मान्यता प्रदान केलेली आहे.
सदरील पुस्तकात निवडणूक व्यवस्थापनाशी निगडित सर्व संकल्पनांचा यथायोग्य आढावा घेवून निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व घटकांचा साकल्याने विचार केलेला आहे. पुस्तकातील एकूण चार प्रकरणात अनुक्रमे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटक, निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारासाठी संबंधित माहिती आणि निवडणुकीसंबंधित मतदान प्रक्रिया आणि राजकीय सहभाग इ. माहितीचा समावेश असून प्रस्तुत पुस्तकलेखनातून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल यात शंका नाही.