{"title":"Research","description":"","products":[{"product_id":"महाराष्ट्रातील-संत-आणि-समाजसुधारकांचा-इतिहास","title":"महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार Generic Open Elective Course सुरु केलेला आहे. यावर आधारित इतिहास विषयाअंतर्गत OE-1 विदर्भातील संत आणि समाजसुधारकांचा इतिहास, OE-2 महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारकांचा इतिहास हे कोर्स पदवीला प्रथम वर्षाकरीता तयार केलेले आहे. त्यानुसार मुख्यतः पदवीच्या (मानव्यविद्या, कॉमर्स, सायन्स इ. शाखा) प्रथम वर्षातील प्रथम सत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर पाठ्यपुस्तकाचे लेखन केले असले तरी प्रस्तुत विषय शिकविणाऱ्या प्राध्यापक बंधूंना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच समाज परिवर्तनाचा इतिहास जाणून घेण्याची मनिषा असलेल्या अभ्यासकांना देखील प्रस्तुत पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदर पुस्तक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये समाजसुधारकांचा अभ्यासक्रम शिकविल्या जातो. त्यामुळे त्यांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48386710307045,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtratil-and-Vidharbhatil-Samjsudharak_Prafull-Taley_cnvt-1.jpg?v=1770721010"},{"product_id":"research-innovative-basket-vol-1-2","title":"Research Innovative Basket (Vol. 1 \u0026 2)","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399731261669,"sku":null,"price":1190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Innovative-Basket_Prof-D-R-Patil_cnvt-1-198x300.jpg?v=1770877762"},{"product_id":"साहित्य-आणि-समाजशास्त्रीय-संशोधन","title":"साहित्य आणि समाजशास्त्रीय संशोधन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशास्त्र (विज्ञान), समाजशास्त्र व साहित्यादी कला, अशा विविध मानवीजीवनाशी निगडित विद्याशाखा अस्तित्वात असून त्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. कुठल्याही शाखेसाठी अमुक एक सर्वगामी व मूलगामी अशी संशोधन पद्धत निश्चित केलेली आढळून येत नाही, म्हणून काही विषयात झालेले संशोधनपर लेखन पाहिले, तर संशोधन हे एक शास्त्र असूनही अभ्यासकांमध्ये विरोधाभास आढळतो. तेव्हा काही संशोधनपर ग्रंथांचा समग्रतेने विचार करून संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी एक सुलभ सुटसुटीत असे ‘साहित्य व समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’चे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना एकाच पुस्तकात क्रमबद्ध, सूत्रबद्ध व परिपूर्ण अशी माहिती आढळून आलेली नाही. जसे- संशोधन पद्धती किती व कोणत्या? संशोधनाची संकल्पना व स्वरूप कसे? संशोधनाचे प्रकार नेमके किती व कोणते? व त्याचा क्रम कसा असावा?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य आणि समाजशास्त्रातील वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी मांडणी या ग्रंथात केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401088446693,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sahitya-Aani-Samajshastriy-Sanshodhan_-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770889939"},{"product_id":"संशोधन-पद्धती-आणि-बौद्धिक-संपदा","title":"संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनवीन अभ्यासक्रमावर आधारित संशोधन पद्धती व बौद्धिक संपदा हे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय? संशोधन कसे व का करावे? संशोधनाच्या पद्धती कोणत्या? याचे सविस्तर ज्ञान देण्यास उपयुक्त असून संशोधन करताना संशोधकाने कोणत्या नियमाचे पालन करावे? कोणत्या बाबी लक्षपूर्वक हाताळाव्या याचे सविस्तर ज्ञान बौद्धिक संपदा या प्रकरणाद्वारे करून देण्यास पूरक आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पीएच.डी. करताना संशोधनाबद्दल जे ज्ञान संशोधकांना आवश्यक असते. शोध प्रबंध तयार करताना कशाप्रकारे तयार करावा. प्रबंध तयार करताना आवश्यक घटक याची पूर्तता कशी करावी याविषयीचे ज्ञान, या सर्वांच्या पायऱ्या, याचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून होणार असून सदर पुस्तिका विद्यार्थ्यांना, संशोधकांना तसेच प्राध्यापकांकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401139466469,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Padhati-ani-Bodhik-Sampada_Jyoti-Hawre_cnvt-1-198x300.jpg?v=1770890300"},{"product_id":"advanced-cost-accounting-iv","title":"Advanced Cost Accounting – IV","description":"\u003cp\u003eWelcome to the advanced Accountancy paper at the Post Graduate Level, where our focus lies on fostering conceptual understanding and practical applicability of key accounting principles. This course builds upon the foundational knowledge acquired during undergraduate studies, aiming to equip students with the skills necessary for realworld application. The significance of this subject is continually magnified by factors such as economic liberalization, globalization, the free flow of capital, and the pursuit of enhanced corporate governance practices.\u003cbr\u003eIn this book, we delve into the crucial aspects of Cost Accounting from a corporate standpoint and introduce emerging methodologies tailored to address the evolving business landscape. It is written in accordance with the New Education Policy (NEP).\u003cbr\u003eThe book comprises six units, each focusing on a different aspect of accounting. Unit 1 begins with Non-Integrated Cost Accounts, providing an elementary study and disclosure requirements of select Accounting Standards. The subsequent unit navigates through Integrated Accounts \/ Integral Accounts. Unit 3 unfolds the complexities of Reconciliation of Profits under Cost Accounts and under Financial Account, followed by Unit 4’s exploration of Cost Information Systems and Reporting. The fifth unit illuminates Uniform Costing and Inter-firm Comparison, while the final unit acquaints students with an Introduction to Cost Accounting Record Rules and Cost Audit, specifically the Companies (Cost Records and Audit) Rules, 2014. We trust that both students and educators will find this book immensely beneficial. While every effort has been made to ensure accuracy and clarity, we acknowledge the possibility of inadvertent errors. We extend our heartfelt gratitude to our families for their unwavering support and encouragement throughout this endeavor. Special thanks to Prashant Publications, Director Rangrao Patil, and the entire team for their expedited and meticulous publication process. We invite readers to share their valuable views, suggestions, and feedback with us.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48421552750821,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Advanced-Cost-Accounting-IV_Dr-Arvind-K-Raut-1-768x1012.jpg?v=1771224008"},{"product_id":"महाराष्ट्राचा-भूगोल","title":"महाराष्ट्राचा भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल हा विषय तसा गतिमान असून तो निरीक्षण, अवलोकन आणि कृतीशील सर्वेक्षणावर अवलंबून असतो. म्हणून असे म्हटले जाते भूगोल हा विषय पायाने डोक्यापेक्षा अधिक समजतो, उघड्या डोळ्यांनी केलेली निरीक्षणे अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी शिकवतात. भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे ज्ञान आवश्यक असते किंबहूना भूगोलाच्या अभ्यासाचा पाया मजबूत करायचा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याची इत्यंभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राचा भूगोल या ग्रंथात महाराष्ट्राचे प्रशासकीय स्वरूप, महाराष्ट्राची भौगोलिक रचना, महाराष्ट्राचे हवामान, नदीप्रणाली, महाराष्ट्रातील विविध साधनसंपदा या उपघटकांचा अभ्यास पहिल्या विभागात तर महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील लोकसंख्या व वस्ती, महाराष्ट्रातील ग्रामीण विकास व महाराष्ट्रातील पर्यटन या उपघटकांचा समावेश दुसर्या विभागात करण्यात आला आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना सदरील ‘महाराष्ट्राचा भूगोल’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458271588581,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtracha-Bhugol_Dr-Vasudev-Salunke_cnvt-1.jpg?v=1771844554"},{"product_id":"वातावरण","title":"वातावरण","description":"\u003cp\u003eपृथ्वीच्या पृष्ठभागावर, वातावरणात आणि पृथ्वीच्या अंतरंगात जे काही सामावलेले आहे त्या सगळ्यांचा समावेश पर्यावरणात होतो. यामध्ये जमीन, हवा, पाणी निरनिराळ्या वायूराशी, सर्व वनस्पती, सर्व सजीव, खनिजे, नैसर्गिक वायू, खनिजतेल इत्यादींचा समावेश होता. पर्यावरणातील सजीव घटकांपैकी मानव हा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरणामध्ये प्राणवायुशिवाय अन्यही घटक आहेत. हवेमध्ये सुमारे 80 टक्के नत्रवायु असून बाकी उरलेल्या 20 टक्केमध्ये प्राणवायु सुद्धा आहे.परंतु पर्यावरणाच्या केंद्रस्थानी स्वत:ची स्थिती कायम ठेवून मानवाने नैसर्गिक संतुलन बिघडविण्यास सुरूवात केलेली स्पष्ट दिसून येते. पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत्या स्वरूपाचे आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात वातावरण परिचय, हवा-हवामान, वातावरणाचे घटक, संघटन, सूर्यप्रकाश आणि तापमान, सौरऊर्जा, तापमान वितरण, वायुभार आणि वारे, ऋतुमानानुसार परिवर्तन, भारपट्टे, वर्गीकरण, आर्द्रता आणि हवामानशास्त्रांचा उपयोगाचा समावेश झालेला दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eVatavaran\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460570951909,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vatavaran_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1771917833"},{"product_id":"जलावरण","title":"जलावरण","description":"\u003cp\u003eजगामध्ये मानवी वस्तीस्थाने जलाभोवतीच आहेत. सागर आणि महासागर नैसर्गिक संपत्तीचे मोठे, अक्षय भांडार आहे. संपूर्ण सागर जलाचे चक्र, पृथ्वीची उत्पत्ती, खंडपरिवहन इत्यादी सर्व बाबी विचारात घेतल्या तर पृथ्वीवरील महासागराचे अस्तित्व न संपणारे आहे. सागर विज्ञानातूनच सागरासंबंधी यथायोग्य माहिती प्राप्त होते. सागर विज्ञानामुळेच पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये सागर विज्ञानाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 17 व्या शतकामध्ये सागर विज्ञानाची वैज्ञानिक स्तरावर अभ्यासाला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सागरा संदर्भातील सर्वच बाबीवर लक्ष देवून संशोधन झाले. सागराचे आर्थिक महत्व स्पष्ट झाले. जलभागातील तापमान, प्रदूषण, वादळ-वारे, पाऊस इत्यादी सर्वांचा सजीवांच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात सागरीय भूमी स्वरूपे, सागरजल गुणधर्म, सागरजलाच्या हालचाली, सामुद्रिक निक्षेप आणि प्रवाळ बेटांचा अभ्यासाचा यथायोग्य समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eJalavaran\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48460611191013,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jalavaran_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1771918642"},{"product_id":"कोविड-19-भारतासमोरील-आव्हाने-आणि-संधी","title":"कोविड-19 : भारतासमोरील आव्हाने आणि संधी","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48463151366373,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Covid-19-Marathi_Dr-C-D-Wani_cnvt-1.jpg?v=1771919489"},{"product_id":"20-व्या-शतकातील-महाराष्ट्राचा-इतिहास","title":"20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास (History of Maharashtra in the 20th Century (S-4))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविसावे शतक हे रौद्र शतक मानले जाते. या शतकात दोन महायुद्धे होवून मानव किती क्रूर होवू शकतो हे जगाला दिसले. जगात मोठ्या प्रमाणात मानवी आणि भौतिक संपत्तीची हानी झाली. हिंदुस्थानात गर्व्हनर जनरल लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून येथे राष्ट्रवाद निर्माण केला. लाल, बाल आणि पाल यांची त्यांतून निर्मिती होवून स्वराज्याची मागणी होवू लागली. त्यानंतर गांधीयुग उदयाला आले. स्वातंत्र्याची पहाट घेवून आले. पण त्यावर फाळणीचे धुके पसरले. भाषावार प्रांताची भारतात मागणी झाली. त्यातून नवीन प्रांतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा दुर्दैवाने द्वैभाषिक राज्य गुजरातच्या जोडीने निर्माण झाले. गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना हे द्वैभाषिक मान्य नव्हते. त्यातून मुंबई कोणाची ही समस्या निर्माण झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवून या राज्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधले. त्यातून नागरीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. सहकाराच्या मार्गाने या राज्याची प्रगति झाली. साखर, कापूस या उत्पादनांनी यश गाठले. याचा प्रारंभीचा पाया महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी घातला. औद्योगिक प्रगतीमुळे कामगारांचे प्रश्न निर्माण झाले. ब्राह्मणेत्तर चळवळीबरोबर शेतकऱ्यांची चळवळ आणि दलित चळवळ ह्या चळवळी महाराष्ट्रात झाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादचा निजाम संघराज्यात सामील होत नव्हता. रझाकार चळवळीने त्याच्या राज्यात धुमाकूळ घातला. त्याला जमिनीवर आणण्याचे कार्य पोलिस कारवाईने केले. अशा अनेक घटनांचा आढावा या ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470962733285,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/20-vya-Shatakatil-Maharashtracha-Itihas_Dr-G-B-Shaha_cnvt-1.jpg?v=1772024042"},{"product_id":"आधुनिक-चीनचा-इतिहास","title":"आधुनिक चीनचा इतिहास","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473834979557,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Chincha-Itihas_Final-1.jpg?v=1772087409"},{"product_id":"साधनसंपदा-भूगोल","title":"साधनसंपदा भूगोल","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474469564645,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SadhansampadaBhugol--1.jpg?v=1775471565"},{"product_id":"लोकसंख्या-भूगोल-3","title":"लोकसंख्या भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकसंख्या भूगोल ही अगदी अलीकडे विकसित झालेली ज्ञानशाखा असून, मानव हा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. या विषयात मानवाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित प्राकृतिक व अप्राकृतिक अशा घटकांचाही अभ्यास समाविष्ट होतो. प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांमध्ये विविधता आढळते. या प्राकृतिक\/भौगोलिक विविधतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिरणाम त्या त्या भौगोलिक प्रदेशात वास्तव्य असणार्या मानवी समुहाच्या जीवनावर होत असतो. यामुळेच भिन्न भिन्न हवामान प्रदेशांत राहणार्या मानवाच्या जीवनातही विभिन्नता आढळून येते. तसेच लोकसंख्येचे वितरणही सर्वत्र सारखे नाही. कारण लोकसंख्येच्या क्षेत्रीय वितरणावर प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. या घटकांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. यामुळेच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप बहुव्यापी व बहुस्पर्शी असे असल्याचे दिसून येते. लोकसंख्या भूगोल गतिमान व परिवर्तनशील असा अभ्यासविषय आहे. या विषयात प्रामुख्याने मानव व त्यासंबंधित पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. हे दोन्ही घटक गतिमान व परिवर्तनशील आहेत. पृथ्वीवर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडींचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. मानव स्वत:च गतिमान व परिवर्तनशील प्राणी आहे. मानव आपल्या सुप्त गुणांचा वापर नेहमी करत असतो. त्यामुळेही भौगोलिक व अभौगोलिक बदल पर्यावरणात होत असतात. या बदलांचा परिणाम मानवी जीवनावर होतो. लोकसंख्याविषयक घटकांमध्येही नेहमी बदल होतात. या सर्व प्रकारच्या बदलांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप गतिमान व परिवर्तनशील असे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474502922469,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Lokshnkhya-Bhugol-1.jpg?v=1772101811"},{"product_id":"बोलीभाषा-संशोधनाच्या-नव्या-दिशा","title":"बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474793705701,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/F-Boli-Bhasha-1.jpg?v=1772108836"},{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-2","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोलात भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. प्राकृतिक भूगोलातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. सदर पुस्तकातील मुद्द्यांची मांडणी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांना ती सहज अवगत होईल. शक्यतो ठिकठिकाणी स्थानिक व देशातील उदाहरणे देवून विद्यार्थ्यांमधील विषयाची गोडी वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. प्रश्नांची काठीण्य पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे. जवळजवळ सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या मुलभूत संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 225 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकातील मुबलक प्रश्नांमुळे अभ्यासकांना स्वयंअध्ययन करणे सोपे होणार आहे.\u003cbr\u003eप्राकृतिक भूगोल हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. प्राकृतिक भूगोलातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील झकधडखउअङ ॠएजॠठअझकध हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा आम्हाला विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePrakurtik Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477501817061,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakrutik-Bhugol_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772178222"},{"product_id":"प्रादेशिक-नियोजन-आणि-विकास","title":"प्रादेशिक नियोजन आणि विकास","description":"\u003cp\u003eप्रादेशिक नियोजनाकरीता भूमी उपयोग, कृषी क्षेत्राचे संरक्षण, ग्रामीण व शहरी भागांचा विकास, औद्योगिक वसाहती, दळणवळणाचे मध्यवर्ती स्थान, पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि रिकाम्या जमिनी किंवा क्षेत्रांची आवश्यकता असते. यांच्या आधारे प्रादेशिक नियोजन साधले जाते. प्रादेशिक नियोजन हे एखाद्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा व पट्ट्यांची कार्यक्षमप्रणाली राबविणारे शास्त्र आहे. नियोजनांतर्गत एखादा ‘प्रदेश’ प्रशासकिय किंवा अंशतः कार्यशील असू शकतो आणि त्यात वस्ती आणि क्षेत्रीय नेटवर्कची वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. एखाद्या प्रदेशाचे नियोजन हे त्या प्रदेशातील प्रादेशिक गरजा व उपलब्ध संसाधने यांना विचारात घेऊन केले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतातील प्रादेशिक विकासात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, प.बंगाल, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत तर मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश व ओरीसा ही राज्ये मागासलेली आहेत. या सर्व राज्यांना समान पातळीवर आणण्याकरीता प्रादेशिक नियोजनाच्या माध्यमातून संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जात आहे. प्रादेशिक नियोजन ही अलीकडच्या काळात प्रगत झालेली एक लोकप्रिय व आधुनिक संकल्पना आहे. ज्यात मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त व पर्यायी उपयोग करून अधिकाधिक गरजांची पूर्तता करणे व जास्तीत जास्त लोकांना मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवन सुखमय करयाच्या हेतूने संतुलित विकास साधून संबंधित प्रदेशातील लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा स्वीकृत मार्ग म्हणजे ‘प्रादेशिक नियोजन’ होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘प्रादेशिक नियोजन व विकास’ या विषयावरील शक्यतो प्रत्येक घटकावर या पुस्तकात चर्चा करण्यात आलेली आहे. पुस्तकात बर्याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सोप्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून आपल्याला हे कळेलच. याशिवाय नियोजनाचे प्रकार, उद्देश, दृष्टीकोन, विकास योजना, ग्रामीण विकास, आदिवासी विकास व विकासाचे प्रतिमान व सिद्धांत या बाबतीतले लिखाण या पुस्तकातून आम्ही केले असल्याने प्रादेशिक नियोजनाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477525475557,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Pradeshik-Niyojan-V-Vikas_Dr-Sanjay-Bhaise_cnvt-1.jpg?v=1772179465"},{"product_id":"प्राकृतिक-व-मानवी-भूगोल","title":"प्राकृतिक व मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. या मध्ये प्रामुख्याने शीलावरण, वातावरण, जिवावरण, व जलावरण या प्रमुख बाबींचा समावेश होतो. पृथ्वीचे भुकवच, पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या बाहेरील असणारे वातावरण, त्या वातावरणाचे विविध घटक, पृथ्वीवरील वायुभार पट्टे, त्यांचा इतर अनेक घटकांवर होणारा परिणाम अभ्यासला जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणार्या सह संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोलाचे महत्व, स्वरूप, व्याप्ती, याशिवाय त्यामध्ये मानवी लोकसंख्या, मानवी वसाहत, शेती इत्यादी मानवी जीवनाशी निगडीत बाबींचा अभ्यास केला जातो. मानवाच्या सभोवताली असणारे नैसर्गिक पर्यावरण, त्या पर्यावरणातील अनेक घटक मानवी जीवनावर परिणाम घडवून आणतात. लोकसंखेच्या बाबत भारतीय लोकसंख्या, तिची रचना, वितरण, त्यावर परिणाम करणारे घटक, जागतिक दृष्टिकोणातून लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत, भारतीय लोकसंख्या वाढीचे गुण दोष, तर भारतातील विविध वसाहतींचे प्रकार, आकृतीबंध, नागरीकरण, नागरीकरणाचे स्वरूप, देशात व राज्यातील नागरीकरणाची स्थिति, भारतीय शेती आणि शेतकरी यांची परिस्थिती, शेतीवर परिणाम करणारे घटक, शेती आणि शेतकरी यांच्या समस्या इत्यादी दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट\/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477535764709,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakurtik-v-Manavi-Bhugol_cnvt-1.jpg?v=1772179878"},{"product_id":"प्राकृतिक-व-मानवी-भूगोल-1","title":"प्राकृतिक व मानवी भूगोल","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असून या शाखेत मानवी निवास, स्थान व भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत असल्याने मानवी क्रियांचेही अध्ययन महत्त्वाचे आहे. परंतू मानवाला अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. म्हणून प्राकृतिक पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्याचा विकास केला व त्यातून प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना, भूरुपे, हवामान, हवेचे आविष्कार, जलाशय, वनस्पती आणि प्राणी जीवनांचा अभ्यास समाविष्ट होतो. विशेषत: शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख घटकांचा व त्यांचा मानवी जीवनावर होणार्या परिणामाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्यांचा वापर व विकास करून प्राकृतिक भूगोलाचा विकास केला गेला आहे. पृथ्वीवरील सर्व घटकांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्राकृतिक भूगोलात विविध विभाग केलेले आहेत. त्यात पृथ्वीची घनरूप अवस्था म्हणजे शिलावरण, पृथ्वीची द्रवरूप अवस्था म्हणजे जलावरण, वायु अवस्था म्हणजे वातावरण आणि पृथ्वीवरील सजिवांचे अस्तित्व असलेले म्हणजे जीवावरण होय. वरील सर्व अवस्थांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. या शाखेत निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. यात विविध भूरूपे (पर्वत, पठार, मैदान आणि त्यांची निर्मिती), हवामान, मृदा, जलाशय, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इ.नैसर्गिक घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलात केला गेला.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477543301349,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prakurtik-V-Manavi-Bhugol_Dr-U-P-Suyawanshi_cnvt-1.jpg?v=1772180117"},{"product_id":"शैक्षणिक-संशोधन-शोध-सारांश","title":"शैक्षणिक संशोधन शोध सारांश","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477754097893,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Shaikshanik-Sanshodhan-2020_cnvt-1.jpg?v=1772189092"},{"product_id":"application-of-research-techniques","title":"Application of Research Techniques","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eSettlement Geography is as ancient as human civilization. Settlement deals with dwellings and villages, township and cities. Prof. Dr. S. R. Chaudhari Ex-Principal, Pratap College, Amalner is an ardent devotee of Settlement Geography right from his students days. His doctoral thesis deals with rural settlements in Khandesh Region of Maharashtra (India) He has devoted the first half of his volume of the present book to – Introduction to the subject, Geographical personality of the region under study, Evolution of the settlements, Place names, Growth, Stagnation, Decline and Desertion of rural settlements in Khandesh, Density, Size, Spacing of settlements, Types of rural settlements, Rural dwellings and house types and amenities available in rural area of the study region. The research methodology applied for the study of these aspects of rural settlements is really a unique piece work. Various maps have added a visual grandeur to whatever theoretical material and practical applications he has complied. His maps and charts are highly illustrative and bring out the essence of the facts which he wants to highlight. His style is lucid, simple, straight forward and flowing logically and systematically.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eIn the second half, the last fourteen chapters of the total 27 chapters, the author deals with the various research techniques and applications in presenting the Rural Service Centres, Spaio-Temporal pattern of Rural Service Centres, Service areas of Rural Service Centres, Demarcation of Agro-Service Centres, Role of Rural Service Centres in Economic development, Regional planning of Rural Service Centres, Demographic characteristics, Migration, Rural transformation, Levels of Socio-Economic Development, Case studies, Rehabilitation, of villages, Identification of locations of settlements using Remote Sensing and GIS, and application of GIS in Rural Settlement Geography. Dr. Shankar Ramdas Chaudhari deserves kudos for this enterprise that is a valuable contribution to Geography and Rural Settlement Geography in particular.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477771923685,"sku":null,"price":2495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Application-of-Research-Techniques-in-RSG_Dr-Shankar-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772193767"},{"product_id":"महाराष्ट्राचा-आर्थिक-भूगोल","title":"महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल","description":"","brand":"Prashant Publication.","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477852369125,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Maharashtracha-Arthik-Bhugol_Bhaise14_cnvt-1.jpg?v=1772192096"},{"product_id":"संशोधन-पद्धती","title":"संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंशोधनाचा एकंदरीत विचार करता, संशोधन म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे. माणसामध्ये एक उपजत कुतूहल प्रवृत्ती असते. आपल्या भोवतालच्या जगातील माणसे, वस्तू आणि घटना यांचे अस्तित्व माणसाला जेव्हापासून जाणवायला लागते, तेव्हापासून हे काय आहे, कसे आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग करुन जाणून घेण्याची त्याची खटपट सुरु होते आणि हे जाणून घेणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत ’ठशीशरीलह’ म्हटले जाते. हा इंग्रजी प्रतिशब्द योग्यच आहे. ’ठशीशरीलह’ म्हणजे ‘पुन्हा शोध घेणे.’ थोडक्यात कोणत्याही ज्ञानशाखेत नवीन तत्त्वे अथवा तथ्ये शोधण्यासाठी आणि जुनी तथ्ये व तत्त्वे परीक्षणासाठी केलेला चिकित्सक व पध्दतशीर अभ्यास म्हणजे संशोधन होय. माणूस गोष्टींच्या संपर्कात यायला लागतो, नवीन माहिती मिळवायला लागतो, तसतसा तो नवीन माहितीची आधीच्या माहितीशी सांगड घालायला लागतो. मग त्याला त्याच्यात काही संबंध दिसायला लागतात. तो तुलना करु लागतो. नव्या व जुन्या गोष्टींत त्याला काही समान गुणधर्म आढळतात. तेव्हा तो त्यांना एका वर्गात घालतो. म्हणजे त्यांचे वर्गीकरण करतो. आणखी पुढे जाऊन त्याला असे आढळते की, भोवताली घडणार्या घटना काही क्रमाने घडतात. तसेच एखादी घटना घडली तरच पुढची घटना घडते. म्हणजे आधी घडलेली घटना कारण आहे तर नंतर घडलेली घटना तिचा परिणाम आहे हे कळते. कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी तो अनेक वेळा तशीच निरीक्षणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी करतो, मगच त्याच्या मनात कारण-परिणाम संबंध प्रस्थापित होतो. म्हणजेच नव्याने उजेडात आलेल्या तथ्यांच्या आधारे प्रस्थापित, स्वीकृत निष्कर्ष व सिध्दांतांचे पुनर्परीक्षण करण्याच्या हेतूने चिकित्सक व सखोल चौकशी वा प्रयोगास संशोधन म्हणता येईल. सदरील ग्रंथात संशोधनाची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ग्रंथ हा पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., एमपीएससी, यूपीएससी व सेट इत्यादी परीक्षांचे अध्ययन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477931634917,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Paddhati-2022_Dr-V-B-Patil_cnvt-1.jpg?v=1772194609"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"मार्गदर्शन-आणि-समुपदेशन-1","title":"मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687966949,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Margadarshan-Samupdeshan_cnvt-1.jpg?v=1772255140"},{"product_id":"research-methodology-1","title":"Research Methodology","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479701270757,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Methodology_-Dr-A-P-Sarode_cnvt-1.jpg?v=1772256342"},{"product_id":"साधन-व-जलसंपदा-भूगोल","title":"साधन व जलसंपदा भूगोल","description":"\u003cp\u003eमानव हा पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जीवन व अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे. आपले जीवन अधिक सुखसोयीचे व सुरक्षीत होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो निसर्गातील विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. मानवाला निसर्गातून उपलब्ध झालेल्या विविध वस्तू किंवा पदार्थ म्हणजेच नैसर्गिक साधने होत. मानवाचे पर्यावरणाविषयी जसजसे ज्ञान वाढत गेले आणि त्याची तांत्रिक प्रगती होत गेली तसतसा पर्यावरणातील विविध घटकांचा वापर वाढला. आधुनिक काळात साधनसंपत्तीची संकल्पना अधिक व्यापक झाली असून त्यात संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग म्हणजे सुमारे 71 टक्के भागावर जल तर 29 टक्के क्षेत्रावर भूभाग आहे. भूपृष्ठावरील एकूण जलसंपदेपैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्रात सामावले आहे. सागराचे पाणी खारट असल्याने त्याचा फारसा वापर करता येत नाही तर सुमारे 3 टक्के जलसाठा नद्या, तलाव, सरोवर व भूमीगत पाण्याचा म्हणजे गोड पाण्याचा आहे. पृथ्वीच्या निर्मिती\/उत्पत्तीसोबत पाणी व पाण्यामुळे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. जलसंपदेचा योग्य वापर व संवर्धन होण्यासाठी सन 2004 हे वर्ष ‘जल वर्ष’ म्हणून घोषित केले गेले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केला आहे. संज्ञा व संकल्पना सर्वांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479709757669,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sadhan-va-Jalsampada-Bhugol_cnvt-1.jpg?v=1772257804"},{"product_id":"पर्यटन-व्यवस्थापनाचा-भूगोल","title":"पर्यटन व्यवस्थापनाचा भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक काळात धकाधकीच्या जीवनापासून मनाला शांती मिळण्यासाठी व विरंगुळासाठी मानव निसर्गरम्य अशा स्थळी जाणे पसंत करतो. त्यातूनच पर्यटन विकसित झाले अलीकडे पर्यटन हे अत्यावश्यक झाल्याने जगातील सर्वच देशात पर्यटनाचे महत्त्व वाढलेले आहे. म्हणजे पर्यटन ही एक अत्यावश्यक गरज झालेली आहे. प्रवास व पर्यटन हा जगातील अग्रेसर जास्तीत जास्त लोकांना रोजगार प्राप्त करून देणारा असा व्यवसाय आहे. संपूर्ण जगात पर्यटनाचा विकास एक आर्थिक क्रिया म्हणून होत असल्याने पर्यटन हा एक ‘अदृश्य व्यापार’ म्हणून संबोधला जातो. यामुळे पर्यटनाचे आर्थिक स्वरूप दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटनाला विशेष महत्त्व समाज व राजकारण, पर्यावरण व सांस्कृतिक घटकांचे जतन, संवर्धन व संरक्षण यादृष्टीने ही आहे. अतिप्राचीन काळापासून प्रवास करणे हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. पर्यटन ही आधुनिक व शास्त्रीय संकल्पना म्हणून उदयाला आलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479721095397,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Parytan-Vyavsthapanacha-Bhugol_Sambhaji-Patil2_14_cnvt-1.jpg?v=1772259317"},{"product_id":"संशोधन-प्रकल्पाची-लेखनपद्धती","title":"संशोधन प्रकल्पाची लेखनपद्धती","description":"\u003cp\u003eदैनंदिन जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. उलट ते प्रश्न सोडविण्यासाठी सदोदीत प्रयत्न करावे लागतात. प्रश्न जसे व्यक्तिसमोर निर्माण होतात. तसे सार्वजनिक संस्थापुढे, निरनिराळ्या संघटनापुढे, देशाच्या व राज्याच्या अथवा जिल्ह्याच्या अनेक विभागापुढे निर्माण होतात. तसेच ते विचारवंतापुढे, अभ्यासकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात.\u003cbr\u003eएखाद्या देशासमोर विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे प्रश्न पुढे उभे राहतात, ते आजार बरे होण्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत असतो इ. प्रकारचे प्रश्न असतात. सरकारपुढे बेरोजगारी, शासकीय यंत्रणा कशी सुधारावी? धान्य उत्पादन कसे वाढवावे? कौशल्यपूर्ण शिक्षण कसे द्यावे? देशाला संरक्षणक्षम कसे ठेवावे? इत्यादी सारखे प्रश्न असतात. याउलट विचारवंतापुढे व विद्यार्थ्यांसमोर व्यक्तिव्यक्तित अपप्रवृत्ती का उफाळून येतात? असा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुष्कळ प्रकारे माहिती जमवून तिचे सूक्ष्म अवलोकन करुन एकंदर परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून कारणे शोधावी लागतात व उपाययोजना करावी लागते, हे सारे ‘संशोधन’ असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479849513189,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanshodhan-Prakalpachi-Lekhanpaddhati_Dr-Prashant-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1772272224"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/research.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}