{"title":"S.Y.B.A.","description":"","products":[{"product_id":"मराठ्यांचा-इतिहास-इ-स-१६००-१७०७","title":"मराठ्यांचा इतिहास (इ. स. १६००-१७०७) History of Maratha (1600 AD - 1707 AD)","description":"\u003cp\u003eमराठ्यांचा इतिहास हा महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विस्तार हा केंद्रबिंदु मानून या ग्रंथाची रचना केली आहे. संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आणि शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण हे सर्व लक्षात घेवून हा ग्रंथ सिध्द केला आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याचा पाया तर घातलाच परंतु मराठा राज्य टिकले पाहिजे याचीही त्यांनी काळजी घेतली औरंगजेबासारखा बलाढ्य मोगल राजा की जो उमलते मराठ्यांचे राज्य कुस्करून टाकण्यासाठी अधीर झाला होता पण त्यालाही छत्रपती शिवाजी महाराज हे पुरून उरले. त्यासाठी त्यांनी जिंकलेल्या राज्याची नीट घडी बसविली. प्रशासनात एकात्मता आणली. सामाजिक जीवनात स्थैर्य यावे म्हणून त्यांनी अनेक कुरूढीवर हल्ला चढविला जाति भेदाला वाव दिला नाही. वतनदार हे राज्याचे शत्रूच होत असा अनुभव घेवून त्यांनी नवीन वतने देणे बंद केले. स्त्रीयांचा सन्मान केला. त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा राज्याचा इतिहास म्हणजे हा ग्रंथ होय. तो सर्वांना उपयुक्त ठरेल या आशेने हे मनोगत पूर्ण करतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401241014501,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Marathyancha-Itihase_GBShah-1-768x1181.jpg?v=1770890779"},{"product_id":"लोकसंख्या-भूगोल","title":"लोकसंख्या भूगोल","description":"\u003cp\u003eपृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भारतातील तसेच जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडील काळात लोकसंख्या वाढ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या हा घटक कोणत्याही देशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असतो. कारण देशाचे आकारमान, वैशिष्ट्ये, विभाजन, रचना, राहणीमान, प्रगती, विकास, सामाजिक रचना हे घटक लोकसंख्येमुळे प्रभावित होत असतात.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात भारताची जनगणना, लोकसंख्येच्या सर्वेक्षणाच्या पद्धती, लोकसंख्याविषयक मिळालेल्या आकडेवारीचे सादरीकरण, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक, स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा, वयोगट रचना, व्यवसाय संरचना, अवलंबता गुणोत्तर, दीर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या विषयक समस्या, लोकसंख्या धोरणे, मानव विकास निर्देशांक, आरोग्य निर्देशांक तसेच नागरीकरण व त्यासंबंधित समस्या इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eLoksankhya Bhugol\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451356721381,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksankhya-Bhugol_Dr-Shailesh-Nikam_cnvt-1.jpg?v=1771574243"},{"product_id":"आधुनिक-जगातील-घडामोडी","title":"आधुनिक जगातील घडामोडी","description":"\u003cp\u003eअमेरिका व फ्रेंच क्रांतीने सर्वप्रथम लोकशाहीचा पुरस्कार केला. औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला, तर रशियन क्रांतीने साम्यवादाचा पुरस्कार केला. एकोणिसाव्या शतकात युरोपात राष्ट्रवादी चळवळींना जोम आला. मॅझिनी, काव्हूर, गॅरिबाल्डी व व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा यांच्या देशभक्तीमधून इटालीचे आणि बिस्मार्कच्या महत्त्वांकाक्षेतून जर्मनीचे एकीकरण पूर्ण झाले. बिस्मार्कने युरोपात गुप्त राजकारण व गटबाजीचे धोरण स्वीकारल्यामुळे युरोपियन देशांची दोन गटांत विभागणी झाली. त्याचे पर्यवसान पहिल्या महायुद्धात होऊन मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम झाले. आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारविनिमय करून सामोपचाराने सोडवावेत आणि जगात शांतता राखावी म्हणून राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला; परंतु बड्या देशांनी राष्ट्रसंघाचा फायदा केवळ स्वार्थासाठीच करून घेतला. याशिवाय मुसोलिनी व हिटलर या हुकूमशहांनी राष्ट्रसंघावर आघात केला. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे दुसरे महायुद्ध घडून आले. यानंतर जागतिक शांंततेसाठी पुन्हा संयुक्त राष्ट्रसंघटना अस्तित्वात आली. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य चळवळींना जोर आला.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात प्रबोधनाचे युग, धार्मिक सुधारणा चळवळी, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, इटाली व जर्मनीचे एकीकरण, मेईजी क्रांती, पहिले महायुद्ध व साम्यवादाचा उदय, विविध शांतता परिषदा, राष्ट्रसंघ, रशियन राज्यक्रांती, शीत युद्ध आणि सोव्हिएत रशियाचे विघटन इ. विविध मुद्द्यांचा सखोल विचारविमर्श केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458268639461,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Jagatil-Ghadamodi_Dr-Anil-Kathare_cnvt-1.jpg?v=1771844302"},{"product_id":"प्राचीन-भारताचा-इतिहास-इ-पू-3000-ते-इ-स-1200","title":"प्राचीन भारताचा इतिहास (इ.पू. 3000 ते इ.स. 1200)","description":"\u003cp\u003eप्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477988454629,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bhartacha-Itihas_cnvt-1.jpg?v=1772196832"},{"product_id":"महाराष्ट्राचा-प्राकृतिक-आणि-आर्थिक-भूगोल","title":"महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल","description":"\u003cp data-path-to-node=\"4\"\u003e\"महाराष्ट्राचा प्राकृतिक व आर्थिक भूगोल\" या पुस्तकात महाराष्ट्राची प्राकृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्राची ऐतिहासिक व राजकीय ओळख, स्थान, विस्तार, भौगोलिक क्षेत्रफळ, शेजारील राज्यांच्या सरहद्दी, प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या त्यामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी आणि कोकणातील नद्या या घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003eमहाराष्ट्राची भौगोलिक स्थिती स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्राचे हवामान, तापमानातील विविधता, पर्जन्याचे वितरण आणि महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलात खनिज संसाधने आणि शेती स्पष्ट करण्यासाठी संसाधनांची व्याख्या, दगडी कोळसा, खनिज तेल, लोहखनिज आणि बॉक्साईट या खनिज संसाधनांचे उत्पादन आणि वितरण, तसेच महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार आणि ज्वारी, कापूस, ऊस व केळी या पिकांचे उत्पादन आणि वितरण तसेच महाराष्ट्रातील उद्योग आणि वाहतूक स्पष्ट करण्यासाठी, महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक केंद्र त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील उद्योगधंदे, तसेच महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल, साखर, कापड आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे स्पष्टीकरण, वाहतूक सुविधेमध्ये रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतूक या घटकांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003eविद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाची मांडणी व त्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587565564133,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/MaharashtrachaPrakrutikAaniAarthikBhugol_Gajare-1_ba49604d-739d-42bc-ba43-7eb904e39ee7.jpg?v=1773913699"},{"product_id":"प्राचीन-भारतीय-भौगोलिक-विचार","title":"प्राचीन भारतीय भौगोलिक विचार","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003e\u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"0\"\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/b\u003e च्या कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"93\"\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020)\u003c\/b\u003e नुसार प्रमुख विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित \u003cb data-path-to-node=\"2\" data-index-in-node=\"182\"\u003e'प्राचीन भारतांतील भौगोलिक विचार'\u003c\/b\u003e हे पुस्तक तयार करण्यात आलेले आहे. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ज्ञात व्हावी, या उद्देशाने भूगोल अभ्यास मंडळाने 'प्राचीन भारतांतील भौगोलिक विचार' चा अभ्यासक्रमात समावेश केला. ही अतिशय चांगली बाब आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eपुस्तक लिहिताना \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"16\"\u003eहिंदू ग्रंथ-वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता तसेच जैन ग्रंथ, बौद्ध ग्रंथांचे व इतर प्राचीन ग्रंथांचे\u003c\/b\u003e संदर्भ घेण्यात आले व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार प्रकरणांमध्ये विषय विवेचन करण्यात आले. हे पुस्तक लिहिताना आमच्या मित्रांनी व कुटुंबीयांनी केलेल्या सूचना त्या आम्ही पुस्तक लिहिताना विचारात घेतल्या. संस्कृत भाषेतील ग्रंथांमध्ये असलेले भौगोलिक विचार हे मराठीत अत्यंत सोपी व सरळ भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587632017637,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachinbhartiybhaugolikvichar-1.jpg?v=1773914752"},{"product_id":"व्यावहारिक-कौशल्य-1","title":"व्यावहारिक कौशल्य","description":"\u003cp\u003eउपयोजित मराठीचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. नवसमाज माध्यमांनी भाषेच्या उपयोजनाला व्यापक आयाम दिला. एवढेच नव्हे तर भाषिक कौशल्याचे उपयोजन करून नवे रोजगार निर्माण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासही हेच अपेक्षित आहे. निव्वळ भाषेचा उपयोग करून रोजगार निर्मिती करता येते किंवा रोजगार प्राप्त करता येतो हे उपयोजित मराठीने सिद्ध केलेले आहे. भविष्यात भाषेचे कोणते कौशल्य हस्तगत केले तर आपण यशस्वी होऊ शकतो हे ओळखून मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाची रचना केली. यात मुलाखत लेखन, ग्रंथ परीक्षण, संपादन, स्तंभलेखन, जाहिरात लेखन, निवेदन, संहिता लेखन, बातमी लेखन इत्यादी घटक नेमून अभ्यास मंडळाने आधुनिक जीवनाची नस ओळखली यात काही शंका नाही. तसा विचार केला तर वरील घटक हे अभ्यासक्रमात समाविष्ट होतेच आणि काळानुसार त्याचे स्वरूपही ठरलेले होते. आता काळ बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जग अस्तित्वात आलेले आहे. झपाट्याने यंत्रात तंत्रात क्रांती होत आहे. माध्यमांचे स्वरूप बदलल्याने वरील घटकांच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. वरील घटक लेखनाचे तंत्रही बदललेले आहे. हा बदल लक्षात घेऊनच सदर पुस्तकातील अभ्यास घटकांची रचना केलेली आहे. त्यामुळे वाचक, अभ्यासकांसाठी हे पुस्तक नवीन आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587866505445,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/VyavharikKaushalya-1.jpg?v=1773921297"},{"product_id":"भारतीय-मानसशास्त्र","title":"भारतीय मानसशास्त्र ((Indian Psychology))","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eया पुस्तकात आम्ही प्राचीन भारतीय मानसशास्त्राचे स्वरूप, बोधात्मक प्रक्रिया, व्यक्तिमत्त्वाचे प्रकार आणि सिद्धांत यांचा सखोल अभ्यास सादर केला आहे. उपनिषदे, सांख्य, योग, अभिधम्म अशा पुस्तकांमधील विचारांचा अभ्यास करताना आम्हाला जाणवले की, मनुष्याच्या मानसिक जीवनाच्या विविध पैलूंची खोल समज आणि व्यक्तिमत्त्वाची गुंतागुंत या तत्त्वांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते. राग, द्वेष, मोह या प्रकारांपासून ते एकाग्रता, सजगता, अध्ययन, स्मृती आणि कल्पनाशक्ती यांपर्यंतच्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करताना, आम्हाला हे लक्षात आले की विचारांची स्पष्टता आणि व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास खूप महत्त्वाचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eनिरोगी व्यक्तिमत्त्व साधण्याच्या दृष्टीने, ध्यान, सजगता आणि आंतरिक समत्व या साधनांचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. वाचनादरम्यान अरहंताची आदर्श व्यक्तिरेखा आणि पूर्व-पाश्चात्य मानसशास्त्रीय दृष्टिकोनांची तुलना करताना आम्हाला जाणवले की, प्राचीन भारतीय मानसशास्त्र आजच्या जीवनातही मानसिक आरोग्य, भावनिक स्थिरता, जीवनातील संतुलन, सकारात्मक व्यक्तिमत्त्व आणि आत्मविकासासाठी अत्यंत मौल्यवान साधन ठरू शकते.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587873583333,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaManasshastra_-1.jpg?v=1773921973"},{"product_id":"स्व-मानसशास्त्र-आणि-भावना-व्यवस्थापन","title":"स्व - मानसशास्त्र आणि भावना व्यवस्थापन","description":"\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eपुस्तकाचा पहिला भाग \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"20\"\u003e\"स्व-मानसशास्त्र\"\u003c\/b\u003e या विषयावर केंद्रित आहे. यात स्व-संकल्पना, तिची निर्मिती आणि तिच्यावर परिणाम करणारे विविध घटक या विषयांचा सखोल विचार केला आहे. \"स्व\"चे विविध प्रकार- \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"187\"\u003eवास्तव-स्व, आदर्श-स्व, सामाजिक-स्व, आध्यात्मिक-स्व\u003c\/b\u003e - यांच्या माध्यमातून वाचक स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेऊ शकतो. तसेच, \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"305\"\u003eSWOC विश्लेषण\u003c\/b\u003e आणि \u003cb data-path-to-node=\"3\" data-index-in-node=\"323\"\u003eजोहारी विंडो (Johari Window)\u003c\/b\u003e यांसारख्या विश्लेषण साधनांद्वारे स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःचे मूल्यांकन करण्याची संधी दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"4\"\u003eतसेच यात \u003cb data-path-to-node=\"4\" data-index-in-node=\"9\"\u003eस्व-जागरूकता, स्व-प्रतिमा, स्व-नियमन, स्व-सादरीकरण, स्व-आदर आणि स्व-सामर्थ्य\u003c\/b\u003e या घटकांच्या माध्यमातून व्यक्ती कशा प्रकारे स्वतःचा विकास साधू शकते, हे स्पष्ट केले आहे. आत्मशिस्त, आत्मपुष्टीकरण आणि आत्मविशेषता यांचा समतोल साधत, व्यक्ती अधिक आत्मविश्वासापूर्ण आणि संतुलित जीवन जगू शकते, हा संदेश या विभागातून दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"5\"\u003eदुसरा भाग \u003cb data-path-to-node=\"5\" data-index-in-node=\"10\"\u003e\"भावना व्यवस्थापन\"\u003c\/b\u003e या विषयावर आहे. भावना ओळखणे, त्यांचे नियमन करणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे \u003cb data-path-to-node=\"5\" data-index-in-node=\"111\"\u003eभावनिक बुद्धिमत्तेचे\u003c\/b\u003e मुख्य घटक आहेत. या भागात भावना, तणाव, चिंता आणि नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन या विषयांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. विश्रांती, व्यायाम, वेळ व्यवस्थापन आणि स्व-स्वीकृती यांसारखी तंत्रे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास आणि मनोबल वाढीस सहाय्यक ठरतात.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"6\"\u003eया पुस्तकाची रचना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांबरोबरच त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासाचाही विचार करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48587889344741,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Swa-ManasshastraaaniBhavnavyavsthapan_Gayakwad-1.jpg?v=1773922825"},{"product_id":"भारतीय-राजकीय-व्यवस्थेतील-अलीकडील-प्रवाह","title":"भारतीय राजकीय व्यवस्थेतील अलीकडील प्रवाह","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाह’ या पुस्तकात सविस्तर व सखोल माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राजकारणात सध्या अनेक महत्त्वाचे प्रवाह कार्यरत आहेत, जे देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम करत आहेत. यामध्ये आरक्षण, राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि अंतर्गत सुरक्षा तसेच भारतातील राजकीय नेतृत्व यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. या प्रवाहांचा अभ्यास करणे हे समकालीन भारतीय राजकारणाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय राजकारणाच्या गुंतागुंतीच्या प्रवाहांना समजून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय राजकारणातील अलीकडील प्रवाहाचा परिचय आणि\u003cbr\u003eस्वरूप, मिडिया आणि नागरी समाजाची भूमिका, लोकशाही संस्थांसमोरील आव्हाने राजकीय सुधारणा आणि निवडणूक नवकल्पना, भारतातील आरक्षणाचे राजकारण, आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूी, आरक्षणाच्या संविधानातील तरतुदी, मंडल आयोग आणि परिणाम, आरक्षणाचे सध्याचे वादविवाद, राष्ट्रवादाची संकल्पना,\u003cbr\u003eभारतीय राष्ट्रवादाचा विकास, राष्ट्रवादाचे प्रकार, राष्ट्रवादाचा धोरणनिर्मिती आणि राष्ट्रीय ओळखीवर परिणाम, सांप्रदायिकतेची संकल्पना आणि सांप्रदायिकतेची कारणे, सांप्रदायिक दंगली व त्यांचा राजकीय परिणाम, सांप्रदायिकतेबाबत राज्य आणि राजकीय पक्षांची भूमिका, दहशतवादाचा अर्थ आणि भारतातील प्रकार,\u003cbr\u003eभारतातील दहशतवादाची कारणे, दहशतवादाचा संघराज्यवादावर आणि मानवी हक्कांवर प्रभाव, दहशतवाद विरोधी कायदे : णअझअ, छखअ अधिनियम, भारतातील राजकीय नेतृत्व, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्वाचे प्रकार, युवक आणि महिला नेतृत्वाची भूमिका, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्वाची सार्वजनिक प्रतिमा इत्यादी\u003cbr\u003eघटकांचे सविस्तर व अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.                              \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48617242558693,"sku":null,"price":595.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyRajkiyVyavsthetilAlikadilPravah1-1.jpg?v=1774605450"},{"product_id":"१९-व्या-शतकातील-महाराष्ट्रातील-समाजसुधारक-social-reformers-in-19th-century-maharashtra","title":"१९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers in 19th Century Maharashtra)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश आहे 19व्या शतकातील त्या थोर समाजसुधारकांचा परिचय करून देणे, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या सुधारणांचा संघर्ष सहज आणि सोपा नव्हता. अनेकांना विरोध सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी आपली दिशा बदलली नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर होता एक असा समाज, जिथे माणूसपणाला खरे स्थान मिळावे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621534118117,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/19vyashatkatilMaharastratilsamajsudharak-1.jpg?v=1774696906"},{"product_id":"भारतीय-आर्थिक-विचारवंत-1","title":"भारतीय आर्थिक विचारवंत","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या आर्थिक विचारांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील आर्थिक विचारांचे साध्या, सोप्या व ओघवत्या भाषेत विलेषण केले आहे. ‘भारतीय आर्थिक विचारवंत’ ह्या पुस्तकाचा उपयोग बी.ए. भाग 2 च्या विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा होणार आहे. हे पुस्तक विद्यार्थिमित्रांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. अर्थशास्त्र विषयातील अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी या पुस्तकाचे स्वागत करतील, ही अपेक्षा! \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48644868899045,"sku":null,"price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BhartiyaAarthikVicharvant_Ghodeswar-1_de9118b1-5940-4d5e-a51a-9a7386604737.jpg?v=1775021087"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/s-y-b-a.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}