{"title":"Sem - I","description":"","products":[{"product_id":"प्राचीन-भारतातील-जैन-व-बौद्ध-धर्माचा-इतिहास","title":"प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391835418853,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Prachin-Bharatatil-Jain-va-Bauddha-Dharmacha-Itihas-Dr-G-B-Shah_cnvt-1-1-198x300.jpg?v=1770797452"},{"product_id":"मूलभूत-शेअर-बाजार","title":"मूलभूत शेअर बाजार","description":"\u003cp\u003eजगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोठा गुंतवणूकदार वारेन बफेट म्हणतात. “जर तुम्हाला झोपण्याच्या वेळेस, झोपेत असताना पैसे कमावण्याची एखादी पद्धत सापडत नसेल तर मग तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावे लागेल.” पैसे कमावण्याच्या संदर्भात एक विधान केले जाते. “जर तुमच्याकडे पैसा आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्ही पैशाला कामाला लावा स्वत:ला नाही.” या दोन्ही विधानांचा अंगुली निर्देश शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय नियोजन करतात, तेव्हा तुमच्यासमोर शेअर बाजार हा सक्षम पर्याय आहे. शेअर बाजारात एकदा का विचारपूर्वक गुंतवणूक केली किंवा शेअर ट्रेडिंग केले की मग शेअर बाजारातील चढ उतारांनी तुमच्या Portfolio मध्ये आणि संपत्तीत वाढ होते. मग तुम्ही काम करा की करु नका, झोपेत असा की जागे असा, सुटीवर असा की पर्यटनाला असा. तुमचा पैसा या बाजारात वाढत जातो आणि तुमच्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतात. पण यासाठी शेअर बाजाराचे बेसिक नॉलेज असणे, अनुभव व कौशल्य असणे, बाजार विश्लेषण करणे यासारखे बौद्धिक श्रम करण्याची तयारी हे सर्व आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470927605989,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Mulbhut-Share-Bajar_Dr-N-L-Chavhan_cnvt-1.jpg?v=1772022183"},{"product_id":"भारताची-संरक्षण-संघटना-आणि-राष्ट्रीय-सुरक्षितता","title":"भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता","description":"\u003cp\u003e1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा\/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477796892901,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Bharatachi-Savrankshan-Sanghatna-Ani-Rashtriya-Surkshitata_Dr-B-D-Todkar_cnvt-1.jpg?v=1772190769"},{"product_id":"अर्थशास्त्राची-ओळख-an-introduction-economic","title":"अर्थशास्त्राची ओळख An Introduction Economic","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्र हा विषय मानवाच्या आर्थिक जीवनाचा आरसा आहे, विद्यार्थी जीवनात या विषयाच्या विविध अभ्यासशाखांची ओळख\/परिचय व्हावा त्यामुळे त्यांच्यात विषयाबाबत ओढ निर्माण व्हावी, त्यात करिअर करण्याची त्यांची मानसिकता निर्माण व्हावी या उद्देशाने विविध विषयशाखांच्या मुख्य Content ची महत्त्वपूर्ण मांडणी या पुस्तकात केली आहे. यात प्रामुख्याने अर्थशास्त्राची ओळख, अर्थशास्त्राच्या व्याख्यांची ओळख, मागणीची ओळख, पुरवठ्याची ओळख, बाजाराच्या रचनेची ओळख, उत्पादन घटकांची ओळख व व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकीची ओळख इत्यादीचा अंतर्भाव केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. पुस्तकातील संकल्पनात्मक मांडणी विद्यार्थ्यांना सकस बौद्धिक आहार ठरणार आहे. यासाठी विद्वत लेखकांच्या मौलिक ग्रंथसंपदेचा संदर्भ म्हणून उपयोग करण्यात आला आहे.\u003cbr\u003eअर्थशास्त्राची ओळख हा पेपर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची आवश्यकता लक्षात घेवून या पुस्तकात विविध महत्त्वाच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांची मांडणी केली आहे. सोपी भाषा व आवश्यक त्या ठिकाणी तक्ते व आकृत्या काढून विद्यार्थ्याची आकलन क्षमता वाढण्यास मदत होईल. ग्रंथसंपदा अभ्यासकांना निश्चीतच आवडेल \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48630612394213,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ArthashastrachiOlkha_DrMJGaikawad-1.jpg?v=1774936596"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-i-1.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}