Your cart is empty now.
वद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा
अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन
शैक्षणिक धोरण 2020(NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे.
त्याअंतर्गत बी. कॉम. प्रथम वर्ष पहिले सत्रकरिता प्रमुख विषय म्हणून भारतीय
प्रसंविदा अधिनियम-1 या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित
केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
कायद्यासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने
विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे.
कायद्याची भाषा बोजड, क्लिष्ट वाटू नये म्हणून विविध संकल्पना, नियम तरतुदीचे
मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या
व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. तसेच सहज समजतील अशी उदाहरणे देऊन
संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाची
रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या
शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या
माध्यमातून वाणिज्य कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल. हे पुस्तक विद्यार्थी व
प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करतांना आनंद होत आहे.
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले
आहे. पुस्तक परिपूर्ण राहील यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आलेले आहेत