{"title":"Sem - II","description":"","products":[{"product_id":"युद्धाचे-वैचारिक-पैलू-युद्धाचे-संकल्पनात्मक-पैलू-भाग-2","title":"युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू) भाग 2 |Conceptual aspects of war - Part II","description":"\u003cp\u003eयुद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470322053349,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Yuddhach-Vaicharik-Pail-II_Prof-A-P-Chaudhari_cnvt-1.jpg?v=1772000834"},{"product_id":"भारतीय-प्रसंविदा-अधिनियम-indian-contract-act-i","title":"भारतीय प्रसंविदा अधिनियम (Indian Contract Act  - I)","description":"\u003cp\u003eवद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत बी. कॉम. प्रथम वर्ष पहिले सत्रकरिता प्रमुख विषय म्हणून भारतीय प्रसंविदा अधिनियम-1 या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.\u003cbr\u003eकायद्यासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे. कायद्याची भाषा बोजड, क्लिष्ट वाटू नये म्हणून विविध संकल्पना, नियम तरतुदीचे मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. तसेच सहज समजतील अशी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाची रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून वाणिज्य कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल बदललेल्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकाचे लिखाण करण्यात आलेले आहे. पुस्तक परिपूर्ण राहील यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आलेले आहेत\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48625224712421,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BharatiyaPrasanvidaAdhiniyam-I_DrRRJoshi-1.jpg?v=1774866270"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sem-ii-2.oembed","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}