Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

“भारतीय आर्थिक विचारवंत” हा विषय भारतीय ज्ञान प्रणाली या नवशैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनाचा भाग आहे. अर्थशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने भारतात आर्थिक विचारांचा इतिहास किती जूना आहे, याबाबत त्यांना जाणीव होईल....

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय आर्थिक विचारवंत
- +

“भारतीय आर्थिक विचारवंत” हा विषय भारतीय ज्ञान प्रणाली या नवशैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनाचा भाग आहे. अर्थशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने भारतात आर्थिक विचारांचा इतिहास किती जूना आहे, याबाबत त्यांना जाणीव होईल. एक वैचारिक दृष्टिकोन त्यांच्यात विकसित होईल व त्यातून तो नवीन विचारमंथनाचा भाग बनेल, त्यातून त्यांचा एक नवीन दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल. भारतीय आर्थिक विचार हा प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत सातत्यपूर्ण विकसित होत गेलेली आर्थिक व्यवस्था आहे. या पुस्तकात आर्थिक विचारांची उत्क्रांती, विचारवंताचे आर्थिक सिद्धांत, त्यांनी व्यक्त केलेल्या आर्थिक विचारांमधून वेगवेगळ्या काळात भारतीयांचे व भारतातील साधनसामग्रीचे झालेले शोषण त्यांनी जगासमोर मांडले. कौटिल्यासारख्या विचारवंताने राजाने आर्थिक कारभार कसा चालवावा याबाबत मार्गदर्शन केेलेले दिसून येते.
भारताच्या आर्थिक जडणघडणीत आधुनिक विचारवंताच फार मोठ योगदान आहे त्यात दादाभाई नौरोजी यांचा ड्रेन सिद्धांत, दारिद्रयाची समस्या, आर. सी. दत्त यांचे दारिद्रय आणि दुष्काळाबाबतचे विचार, गोखले व रानडे यांचे आर्थिक विचार, महात्मा फुले यांचे शेती, श्रमिक, सामाजिक कल्याणविषयक विचार, महात्मा गांधी यांचे ग्राम स्वराज्य, स्वदेशी, खादी आणि ग्रामीण उद्योग, विश्वस्ताचे तत्व  याबाबतचे आर्थिक विचार, डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे रुपयाची समस्या, शेतीच्या समस्या, राज्य समाजवाद, सामूहिक शेतीबाबतचे आर्थिक विचार, पंडीत नेहरू यांचे जमीन सुधारणा, सहकारी शेती, औद्योगिकीकरण, मिश्र अर्थव्यवस्था इ. बाबतचे आर्थिक विचार आणि अमर्त्य सेन यांचे आर्थिक कल्याण, दारिद्रय व दुष्काळ इ. बाबतचे विचार या पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या अर्थतज्ञांच्या विचारमांडणीत भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्न व उपाय यांच्यात प्रतिबिंब दिसून येते व हे विचार नवीन समस्यांच्या सोडवणूकीत मार्गदर्शक ठरतात म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांचे चिंतन, मनन करणे आवश्यक आहे. हा विषय DSC-9ECO-IKS 213 सत्र III साठी असून त्याला 2 श्रेयांक (Credit) असणार आहे. त्याची अंतर्गत परीक्षा-20 गुणांची असेल तर विद्यापीठ स्तरीय परीक्षा 30 गुणांची असो या सत्रात या क्रमिक पुस्तकात दोन प्रकरणाच्या माध्यमातून या विचारवंत आर्थिक विचार प्रस्तुत केले आहेत.
दुसऱ्या सत्रात IV सेमीस्टरला OGT/Internship Eco.223 हा 4 श्रेयांकासाठी (Credit) भाग असणार आहे.

1. भारतीय आर्थिक विचार - भाग-1.....................................13
(Indian Economic Thought - Part-1)
1.1 प्रारंभिक आर्थिक विचार
1.2 चाणक्य विष्णू गुप्त (कौटिल्य) यांचे आर्थिक विचार
1.3 आधुनिक आर्थिक कल्पना
1.4 दादाभाई नौरोजी यांचे आर्थिक विचार
1.5 महादेव गोविंद रानडे यांचे आर्थिक विचार
1.6 रमेशचंद्र दत्त यांचे आर्थिक विचार
1.7 गोपाळ कृष्ण गोखले यांचे आर्थिक विचार
2. भारतीय आर्थिक विचार - भाग-2.....................................76
(Indian Economic Thought - Part-2)
2.1 महात्मा फुले यांचे आर्थिक विचार
2.2 महात्मा गांधी यांच्या आर्थिक संकल्पना
2.3 बाबासाहेब डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांचे आर्थिक विचार
2.4 पंडित जवाहरलाल नेहरु यांचे आर्थिक विचार
2.5 डॉ. अमर्त्य सेन यांचे आर्थिक विचार
संदर्भ ग्रंथसूची...............................................................147
अनुक्रमणिका