Your cart is empty now.
"महाराष्ट्राचा प्राकृतिक व आर्थिक भूगोल" या पुस्तकात महाराष्ट्राची प्राकृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्राची ऐतिहासिक व राजकीय ओळख, स्थान, विस्तार, भौगोलिक क्षेत्रफळ, शेजारील राज्यांच्या सरहद्दी, प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या त्यामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी आणि कोकणातील नद्या या घटकांचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्राचे हवामान, तापमानातील विविधता, पर्जन्याचे वितरण आणि महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश इत्यादी घटकांचे विश्लेषण करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलात खनिज संसाधने आणि शेती स्पष्ट करण्यासाठी संसाधनांची व्याख्या, दगडी कोळसा, खनिज तेल, लोहखनिज आणि बॉक्साईट या खनिज संसाधनांचे उत्पादन आणि वितरण, तसेच महाराष्ट्रातील शेतीचे प्रकार आणि ज्वारी, कापूस, ऊस व केळी या पिकांचे उत्पादन आणि वितरण तसेच महाराष्ट्रातील उद्योग आणि वाहतूक स्पष्ट करण्यासाठी, महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक केंद्र त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील उद्योगधंदे, तसेच महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल, साखर, कापड आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे स्पष्टीकरण, वाहतूक सुविधेमध्ये रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतूक या घटकांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाची मांडणी व त्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.