Your cart is empty now.
उपयोजित मराठीचे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होत आहे. नवसमाज माध्यमांनी भाषेच्या उपयोजनाला व्यापक आयाम दिला. एवढेच नव्हे तर भाषिक कौशल्याचे उपयोजन करून नवे रोजगार निर्माण केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासही हेच अपेक्षित आहे. निव्वळ भाषेचा उपयोग करून रोजगार निर्मिती करता येते किंवा रोजगार प्राप्त करता येतो हे उपयोजित मराठीने सिद्ध केलेले आहे. भविष्यात भाषेचे कोणते कौशल्य हस्तगत केले तर आपण यशस्वी होऊ शकतो हे ओळखून मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाची रचना केली. यात मुलाखत लेखन, ग्रंथ परीक्षण, संपादन, स्तंभलेखन, जाहिरात लेखन, निवेदन, संहिता लेखन, बातमी लेखन इत्यादी घटक नेमून अभ्यास मंडळाने आधुनिक जीवनाची नस ओळखली यात काही शंका नाही. तसा विचार केला तर वरील घटक हे अभ्यासक्रमात समाविष्ट होतेच आणि काळानुसार त्याचे स्वरूपही ठरलेले होते. आता काळ बदलतो आहे. माहिती तंत्रज्ञानाचे जग अस्तित्वात आलेले आहे. झपाट्याने यंत्रात तंत्रात क्रांती होत आहे. माध्यमांचे स्वरूप बदलल्याने वरील घटकांच्या स्वरूपातही बदल झालेला आहे. वरील घटक लेखनाचे तंत्रही बदललेले आहे. हा बदल लक्षात घेऊनच सदर पुस्तकातील अभ्यास घटकांची रचना केलेली आहे. त्यामुळे वाचक, अभ्यासकांसाठी हे पुस्तक नवीन आहे.