Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्राणीशास्त्राच्या ZOO-114 (OE/GE) ‘गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञान’ (Vermitechniques) या विषयाची मराठी आवृत्ती आपल्या हाती देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असलेला हा विषय मराठी माध्यमात सादर करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
गांडूळखत निर्मिती तंत्रज्ञान हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण तो जैविक शेती, मृदा संवर्धन, आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी आधारभूत साधन म्हणून उदयास आला आहे. या विषयाचे शिक्षण मातृभाषेत मिळवणे विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास सहजरीत्या आणि प्रभावीपणे करता येईल, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे.
हे पुस्तक लिहिताना, इंग्रजी शब्दांचा योग्य मराठी पर्याय शोधणे आणि विषयाचे सोपे स्पष्टीकरण देणे हे एक आव्हानात्मक कार्य होते. याशिवाय, विविध संदर्भग्रंथ आणि आंतरजालावरील उपलब्ध माहितीचा वापर करून, आम्ही या विषयाला मराठी भाषेत सुसंगत आणि सुलभ स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रकरणानंतर विचारलेले प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उपयुक्त ठरतील, अशी आशा आहे.