Your cart is empty now.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या द्वितीय वर्ष कला (SYBA) या वर्गाच्या IKS (Indian Knowledge System) भारतीय ज्ञान प्रणाली या विषयाच्या जून 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले आहे.
भूगोल हा विषय तसा गतिमान असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, भूगोल अभ्यास मंडळ यांनी याविषयाचा समाजाभिमुख अभ्यासक्रम तयार करताना भूगोलाच्या माध्यमातून अनेक घडामोडींचा परामर्श घेतला आहे. काळानुरूप बी.ए. पदवी पर्यंतचा लागू केलेला अभ्यासक्रम भूगोल अभ्यास मंडळाचा एक आगळा वेगळा प्रयत्न असल्याने आजपर्यंत मराठीतून कमी पुस्तके भारतीय भोगोलिक ज्ञानाचा विकास या विषयावर उपलब्ध आहेत. त्यासाठी अनेक वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेट वरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. या सर्व साधनांचा वापर करून अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
भूगोल विषयाची बांधिलकी, तज्ञ अभ्यासकांशी चर्चा, अहवाल, चर्चासत्र, आमचा थोडासा अनुभव आणि मूळ संदर्भ यांच्या आधारे क्रमिक पुस्तकाच्या निकषानुसार या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. या विषयातील काही संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सदरचे पुस्तक भूतकाळातील भौगोलिक घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट/सेट परीक्षांना ही उपयोगी ठरेल असा प्रयत्न केला आहे.