Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

निवडणूक आयोग ही भारतीय संविधानाने निर्माण केलेली एक संविधानात्मक स्वायत्त संस्था आहे. संविधानाच्या अनुच्छेद 324 मध्ये एक सवतंत्र व स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. निवडणूक आयोगाची रचना आणि अधिकार व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय संविधान आणि राज्य सरकार (Indian Constitution and State Government
- +

निवडणूक आयोग ही भारतीय संविधानाने निर्माण केलेली एक संविधानात्मक स्वायत्त संस्था आहे. संविधानाच्या अनुच्छेद 324 मध्ये एक सवतंत्र व स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे. निवडणूक आयोगाची रचना आणि अधिकार व कार्ये याविषयी अभ्यास करताना अलिकडच्या काळात 1950 च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात झालेल्या महत्वपूर्ण सुधारणांचा आढावा घेतला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, 1950 च्या 14 व्या भागात अलिकडे 2021 मध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे. हा कायदा 30 डिसेंबर 2021 पासून अमलात आला आहे. आता निवडणूक कायदे (दुरूस्ती) कायदा, 2021 नुसार दरवर्षी चार वेळा मतदार म्हणून नोंद करता येते. आधी प्रत्येक वर्षीच्या 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण करनाऱ्यांना आपले नाव मतदार म्हणून मतदार यादीत नोंदणी करण्याची वर्षातून फक्त एकदाच संधी दिली जात होती. आता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जूलै आणि 1 ऑक्टोबर रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत मतदार म्हणून आपल्या नावाची नोंदणी करता येते. तसेच वरील कायद्याच्या 23 व्या भागात दुरूस्ती करून मतदार ओळखपत्राला आधार जोडण्याची तरतूद केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत झालेल्या महत्वपूर्ण बदलाची नोंद घेण्यात आली आहे. आता डिसेंबर 2023 मध्ये संसदेने यासंबंधी केलेल्या कायद्याला अनुसरून मुख्य निवडणूक आयुक्त व इतर आयुक्तांची नियुक्ती निवड समितीच्या शिफारसीवर राष्ट्रपतीद्वारा केली जाते. या निवड समितीमध्ये तीन सदस्य असतात. पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता.
प्रस्तुत पुस्तकामध्ये आतापर्यंतच्या निवडणुक सुधारणांचा आणि आदर्श आचारसंहितेचा व्यवस्थितपणे आढावा घेवून त्यासंबंधी विस्तृत विवेचन केले आहे. भारताचा वित्त आयोग ही संविधानात्मक संस्था असून ती अर्ध-न्यायीक संस्था आहे. वित्त आयोगाची रचना आणि त्याच्या कार्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंतच्या सोळाव्या वित्त आयोगापर्यंतच्या आयोगाच्या अध्यक्षांचा आढावा घेण्यात आला आहे. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक ही भारताची सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे. या संस्थेची रचना आणि कार्याचे वर्णन केले आहे. भारताचा महान्यायवादी हा केंद्र शासनाचा मुख्य विधि अधिकारी आहे. या पदाची रचना आणि कार्याचे विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. तसेच आतापर्यंतच्या अर्थातच सोळाव्या महान्यायवाद्या यादी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आकृतीबंधाचा सविस्तर अभ्यास प्रस्तुत पुस्तकात केला आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीपरिषद यांचा समावेश असून त्यांची नियुक्ती, रचना, अधिकार व कार्ये आणि भूमिकेचे विस्तृत विवेचन केले आहे. राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधानपरिषद यांचा समावेश असून त्यांची रचना, अधिकार व कार्ये, विधानसभेची भूमिका व महत्व आणि विधानपरिषदेची भूमिका व महत्व याचे विवेचन केले आहे. उच्च न्यायालयाच्या अध्ययनामध्ये उच्च न्यायालयाची रचना, त्याचे अधिकारक्षेत्र आणि त्याच्या भूमिकेचे विवेचन केले आहे. यामध्ये सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या संदर्भात 1993 मध्ये आस्तित्वात आलेल्या न्यायवृंद पध्दतीचे विवेचन केले आहे. तसेच जिल्हा न्यायालयाची रचना व त्याच्या अधिकारक्षेत्राचे विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधीत असलेल्या आधीच्या संदर्भग्रंथांचा उपयोग करून त्यात केलेल्या मांडणीला नव्याने आवश्यक ती पेड जोड देऊन प्रस्तुत पुस्तक अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तिथे संदर्भ व टिपांचा उपयोग केला आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये प्राथमिक व द्वितीय साधनांच्या आधारावर विवेचनात्मक, विश्लेषणात्मक व तुलनात्मक पध्दतीने अध्ययन केले आहे. प्राथमिक साधनांमध्ये; भारतीय संविधान, संसदेने पारित केलेले संविधान दुरूस्ती व इतर महत्वपूर्ण कायदे, प्रमुख शासन निर्णय आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्वपूर्ण निर्णय; यांचा तर द्वितीय साधनांमध्ये; प्रसिध्द संदर्भग्रंथ,
नियतकालिके, वृत्तपत्रे आणि आंतरजालावरील संकेत स्थळे; यांचा उपयोग केला आहे. 

प्रकरण 1....................................................................... 9
निवडणूक आयोग
1.1 निवडणूक आयोगाची रचना
1.2 निवडणूक आयोगाचे अधिकार व कार्ये
1.3 निवडणूक आचारसंहिता
अ) निवडणूक आचारसंहितेचा अर्थ
ब) आचारसंहितेचा उगम व विकास
क) आदर्श आचारसंहितेच्या तरतूदी
1.4 निवडणूक सुधारणा
1.5 वित्त आयोग
अ) वित्त आयोगाची रचना
ब) वित्त आयोगाची कार्ये
क) भारतातील वित्त आयोग
1.6 भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
अ) रचना
ब) नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची कर्तव्ये व कार्ये
1.7 भारताचा महान्यायवादी
अ) रचना
ब) महान्यायवाद्याची कर्तव्ये व कार्ये
क) महान्यायवादी यांची यादी

प्रकरण 2......................................................................55
राज्यपाल
2.1 राज्यपालाची नियुक्ती
2.2 राज्यपालाचे अधिकार व कार्ये
2.3 राज्यपालाची भूमिका

प्रकरण 3......................................................................64
मुख्यमंत्री व मंत्रीपरिषद
3.1 मुख्यमंत्री
अ) मुख्यमंत्र्याची नियुक्ती
ब) मुख्यमंत्र्याची भूमिका व कार्ये
3.2 मंत्रीपरिषद
अ) मंत्रीपरिषदेची रचना
ब) मंत्रीपरिषदेचे अधिकार व कार्ये

प्रकरण 4......................................................................79
राज्य विधिमंडळ

4.1 विधानसभेची रचना
4.2 विधानसभा व विधानपरिषदेचे अधिकार व कार्ये
4.3 विधानसभेची भूमिका व महत्व
4.4 विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अधिकार व कर्तव्ये

प्रकरण 5......................................................................93
विधान परिषद
5.1 विधान परिषदेची रचना
5.2 विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रता
5.3 विधानपरिषदेची भूमिका व महत्व

प्रकरण 6.................................................................... 101
उच्च न्यायालय
6.1 उच्च न्यायालयाची रचना
6.2 उच्च न्यायालयाची अधिकारिता
6.3 उच्च न्यायालयाची भूमिका
6.4 जिल्हा न्यायालय
अ) जिल्हा न्यायालयाची रचना
ब) जिल्हा न्यायालयाची अधिकारिता

संदर्भ सूची .................................................................. 119

💬

Chat with us