Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तक हे याच सुधारित अभ्यासक्रमावर आधारित असून, विद्यार्थ्यांमधील बँकिंग विषयाची समज विकसित करण्याच्या उद्देशाने लिहिलेले आहे. या पुस्तकाची रचना मुख्यत्वे सहा महत्त्वाच्या घटकांभोवती करण्यात आली आहे. ‘बँकिंगचा परिचय’ या पहिल्या प्रकरणामध्ये बँकिंग क्षेत्राचा उगम, कार्यपद्धती आणि व्यावसायिक बँकांची बदलती भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ‘केंद्रीय बँक’ (ठइख) या दुसऱ्या प्रकरणात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, तिची ध्येयधोरणे आणि पत नियंत्रणाद्वारे देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात रिझर्व्ह बँकेचे असलेले महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘नाबार्ड’ (छअइअठऊ) या तिसऱ्या प्रकरणात भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण आणि कृषी विकासासाठी ‘नाबार्ड’ ही शिखर बँक म्हणून कशा प्रकारे काम करते, याचा सविस्तर आढावा येथे घेतला आहे. चौथ्या आणि पाचव्या प्रकरणात जागतिक स्तरावरील आर्थिक स्थिरता आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी’ (खचऋ) आणि ‘जागतिक बँक’ (थेीश्रव इरपज्ञ) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. शेवटच्या सहाव्या प्रकरणात ‘बँकिंगमधील नवोन्मेष आणि आव्हाने’ या अंतर्गत डिजिटल युगात बँकिंग क्षेत्रात आलेली नाविन्यपूर्ण साधने आणि बँकिंग क्षेत्रासमोर उभी असणारी सायबर सुरक्षेची आव्हाने यावर चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
“बँकिंग” हे पुस्तक केवळ परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त नसून, विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी ओळखण्यासाठी आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
अभ्यासक्रमातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.