Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या अभ्यासक्रमात डॉ. जी. एस. घुर्ये, डॉ. एम. एन. श्रीनिवास, डॉ. ए. आर. देसाई, डॉ. इरावती कर्वे, महात्मा गांधी तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जीवनचरित्र, त्यांचे सामाजिक विचार, तसेच...

Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतीय सामाजिक विचारवंत (Indian Social Thinker)
- +

या अभ्यासक्रमात डॉ. जी. एस. घुर्ये, डॉ. एम. एन. श्रीनिवास, डॉ. ए. आर. देसाई, डॉ. इरावती कर्वे, महात्मा गांधी तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे जीवनचरित्र, त्यांचे सामाजिक विचार, तसेच समाजशास्त्र व समाजपरिवर्तनातील योगदान यांचा समग्र अभ्यास करण्यात येतो. या विचारवंतांनी भारतीय समाजरचनेचे विश्लेषण करताना जात, वर्ग, कुटुंबव्यवस्था, ग्रामीण-शहरी परिवर्तन, सामाजिक विषमता, समता, न्याय, स्वातंत्र्य व मानवी मूल्ये यांसारख्या मूलभूत संकल्पनांवर सखोल मांडणी केली आहे.
प्रस्तुत पाठ्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच या समाजशास्त्रज्ञांचे कार्य केवळ शैक्षणिक दृष्टीनेच नव्हे, तर राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचे प्रतीक म्हणून समोर येते. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता, चिकित्सक विचारशक्ती आणि सामाजिक वास्तवाचे भान विकसित होते.

*प्रकरण 1. डॉ. जी. एस. घुर्ये.......................7
1. घुर्ये यांचे चरित्र
2. जातीव्यवस्थेचे समाजशास्त्रीय विश्लेषण
3. भारतशास्त्रीय दृष्टिकोन
4. आत्मसातीकरण दृष्टिकोन
प्रकरण 2. एम. एन. श्रीनिवास.........................20
1. श्रीनिवास यांचे चरित्र
2. संस्कृतीकरण
3. प्रभावी जात पाश्चात्त्यीकरण
प्रकरण 3. ए. आर. देसाई....................27
1. देसाई यांचे चरित्र
2. भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी
3. ग्रामीण समाजाची वैशिष्ट्ये
4. भारतीय समाजशास्त्रातील योगदान
प्रकरण 4. डॉ. इरावती कर्वे.................41
1. कर्वे यांचे चरित्र
2. नातेसंबंध प्रणाली
3. सांस्कृतिक अर्थ आणि त्याचे प्रकार
4. मानववंशशास्त्रातील योगदान
प्रकरण 5. महात्मा गांधी........................51
1. महात्मा गांधी यांचे चरित्र
2. सर्वोदय संकल्पना
3. ग्राम स्वराज्य संकल्पना
4. विश्वस्तपणाची संकल्पना
5. पुनर्रचना कार्यक्रम
प्रकरण 6. डॉ. बी. आर. आंबेडकर....................69
1. डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे चरित्र
2. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मते जातीची उत्पत्ती
3. जातिनिर्मूलनाचे विचार
4. भारतीय महिलांविषयीचे विचार

💬

Chat with us