Your cart is empty now.
इतिहास आणि भारतीय संस्कृती हे स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे घटक असल्याने हे पुस्तक UPSC, MPSC, UGC-NET, MH -SET तसेच अन्य विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल. नाण्यांच्या आधारे सामाजिक-आर्थिक इतिहास, व्यापार-वाणिज्य, परकीय प्रभाव, धार्मिक सहिष्णुता, राजकीय सार्वभौमत्व आणि कालमापन पद्धती यांचा सखोल अभ्यास करता येतो, जो स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ग्रंथात नाणी केवळ चलन म्हणून नव्हे, तर इतिहासाचा विश्वासार्ह स्रोत म्हणून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाण्यांचे संवर्धन, त्यांचे संशोधनमूल्य आणि इतिहास लेखनातील स्थान यांचाही विचार करण्यात आला आहे. शास्त्रीय दृष्टिकोन जपत, तरीही विषय रंजक व समजण्यास सोपा राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये मध्ययुगीन भारतीय नाणकशास्त्राविषयी शास्त्रीय दृष्टी विकसित व्हावी, भारतीय ज्ञानपरंपरेतील या महत्त्वपूर्ण घटकाचे महत्त्व अधोरेखित व्हावे आणि इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सखोल व व्यापक व्हावी-हीच या ग्रंथामागील लेखनाची प्रामाणिक भूमिका आहे.