Welcome to Prashant Publications

Rs. 125.00 10% OFF
Availability: 10 left in stock

मराठी भाषेचे स्वरूप व लेखन या पुस्तकाचे लेखन करत असताना भाषेविषयीच्या विविध उपपत्ती, भाषेविषयक अभ्यास करण्याच्या विविध पद्धती या निमित्ताने अभ्यासता आल्या. त्याबरोबरच भाषेचे स्वरूप अधिक उत्तम प्रकारे कशा पद्धतीने...

  • Name : मराठी भाषेचे स्वरूप व लेखन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Barcode : 9788199712003

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मराठी भाषेचे स्वरूप व लेखन
- +

मराठी भाषेचे स्वरूप व लेखन या पुस्तकाचे लेखन करत असताना भाषेविषयीच्या विविध उपपत्ती, भाषेविषयक अभ्यास करण्याच्या विविध पद्धती या निमित्ताने अभ्यासता आल्या. त्याबरोबरच भाषेचे स्वरूप अधिक उत्तम प्रकारे कशा पद्धतीने समजावून घ्यायला हवे हे या अभ्यासक्रमाच्या घटकांमधून व्यवस्थित पद्धतीने समजून घेता आले. आज आपण पाहतो भाषा जर चांगली बोलता आली, भाषेचे उपयोजन जर विद्यार्थ्याला व्यवस्थित करता आले तर त्याला प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्ही माध्यमांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत परंतु या संधी मिळण्यासाठी मात्र आजच्या विद्यार्थ्याकडे विविध कौशल्यांची आवश्यकता असणे अत्यंत आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असते. कारण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वरील दोन्ही प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे असते. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, अनौपचारिक शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित होण्यासाठी मर्यादा आलेल्या दिसून येतात या सर्व बाबींचा अतिशय गांभीर्याने विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचे स्वरूप व लेखन हा  विषय अंतर्भूत केलेला आहे त्यामुळेच विद्यार्थ्यांना इतर विषयाबरोबरच भाषिक कौशल्य विकास, भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे, मराठी भाषेचे स्वरूप, लेखन हे घटकही अभ्यासायला मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्याधिष्ठित विकास होण्यासाठी खूप मदत होणार आहे. आज आपण पाहतो आजचा विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतरही फारसा आत्मविश्वासपूर्वक संवाद साधताना दिसत नाही. त्याच्यामध्ये काही प्रमाणात न्यूनगंड जाणवतो तसेच छोट्या छोट्या गोष्टींसंदर्भात त्याला लेखन करण्यास सांगितले तरी त्याला अडचणी येतात. किंबहुना हे सर्व आपल्याला आलेच पाहिजे असाही त्याचा आग्रह असलेला दिसून येत नाही. येणाऱ्या काळात साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, वाणिज्य, संज्ञापन, पत्रकारिता, संख्याशास्त्र, इंजिनिअरिंग इ. कोणत्याही शाखेचा विषयाचा विद्यार्थी असो त्याला स्वतःमधील भाषिक कौशल्य विकसित करावीच लागणार आहेत. आता त्याला पर्याय नाही. मराठी भाषेचे स्वरूप व लेखन या अभ्यासक्रमामुळे मराठी भाषेचे स्वरूप व तिचे मानवी जीवनातील स्थान व स्वरूप विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होणार आहे तसेच भाषेचे बोली रूप व लिखित रूप यांचाही विद्यार्थ्यांना या निमित्ताने परिचय होईल. बोलीभाषा, प्रमाणभाषा व परिभाषा या तिन्ही संकल्पनांचा परिचय झाल्याने व्यावसायिक पातळीवर लेखन वाचन व संभाषण इत्यादींचा कौशल्याने वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे.विद्यार्थ्यांना भाषेची निर्मिती आवश्यकता व तिचे मानवी जीवनातील स्थान याविषयी या अभ्यासक्रमामुळे मार्गदर्शन करता येणार आहे तसेच बोलीभाषा, प्रमाणभाषा व परिभाषा यांचा कौशल्यपूर्ण वापर करून वाचन, लेखन व संभाषण इत्यादी गोष्टी करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या निमित्ताने मिळणार आहे. भाषा समजून घेणे, समाज जीवनामध्ये भाषेचा वापर अधिकाधिक परिपक्व पद्धतीने करता येणे, भाषेकडे अधिकाधिक सखोलतेने गांभीर्याने पाहत जाणं आणि तिच्या विकसित रूपाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेत तिचा सखोल अभ्यास करता येणे ही काळाची नितांत आवश्यकता आहे.
आगामी काळात अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने भाषाही यायला हवी, त्याला आपल्या भाषेत उत्तम पद्धतीने संवाद साधता येणे, लिहिता येणे, स्वतःचे विचार प्रगट करता येणे हे सर्व आजच्या विद्यार्थ्याला येणे अत्यावश्यक आहे नवे ती आत्ताच्या काळाची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने आपण या घटकांमध्ये मराठी भाषेचे स्वरूप, निर्मिती, बोलीभाषा, प्रमाणभाषा, मराठीतील विरामचिन्हे, परिभाषा स्वरूप आवश्यकता या सर्व घटकांची ओळख करून घेणार आहोत.       

घटक 1................................................................7
भाषेचे स्वरूप व निर्मिती
1.1 भाषेचे स्वरूप व निर्मिती
(भाषानिर्मितीविषयक विविध उपपत्ती)
1.2 मराठी भाषेचे स्वरूप
1.3 बोली भाषा
(मराठीच्या विविध बोली)

घटक 2..............................................................49
प्रमाणभाषा
2.1 प्रमाणभाषा : स्वरूप, नियम इ.
2.2 मराठीतील विरामचिन्हे
2.3 परिभाषा : स्वरूप व आवश्यकता
संदर्भ ग्रंथ............................................................92

💬

Chat with us