Your cart is empty now.
लोकसंख्या एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे तसेच अलीकडील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे नगरांची वाढ होत आहे. ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाने लोकसंख्या व वस्ती भूगोल या विषयाचा पदवी स्तरावरावरील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. भूगोल विषयाच्या विद्यार्थांना लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे महत्त्व समजून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, व्यावसायिक, संशोधक यांच्याशी सखोल चर्चा करून तसेच लोकसंख्या व वस्ती भूगोलाशी निगडीत संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोध निबंध यांचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे स्वरूप व महत्त्व, लोकसंख्या विषयक संकल्पना, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीचे घटक, अतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्याविषयक धोरणे, वस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, वस्ती भूगोलातील संकल्पना, ग्रामीण वस्त्यांचे प्रकार व कार्य, शहरी वस्तीविषयक संकल्पना, नागरीकरण व त्याच्याशी संबंधित समस्या तसेच प्रात्याक्षिकांमध्ये जनन, मर्त्यता व लोकसंख्येची घनता यांचे मापन, लोकसंख्या प्रक्षेपण, व त्यांचे मापन, गुरुत्वाकर्षण प्रतिमान, लॉरेन्झ वक्र, गिनी गुणांक व ग्रामीण वस्तीचे व्यष्टी अध्ययन यांचा अभ्यास या पुस्तकाच्या लिखाणात समाविष्ट करण्यात आला आहे.