Your cart is empty now.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘द्वितीय अर्थशास्त्र’ विषयामध्ये Major - Major Core म्हणून सत्र-4 साठी ‘स्थूल अर्थशास्त्र-प्रात्यक्षिक’ Eco 252 MJP(P) हा विषय 4 क्रेडीटसाठी प्रात्यक्षिक पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘स्थूल अर्थशास्त्र- प्रात्यक्षिक’ या पुस्तकातील भाग-1 लेखी यात एकूण 3 प्रकरणे दिलेली आहेत. यानुसार प्रकरण 1ले राष्ट्रीय उत्पन्न असून यात राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि महत्त्व राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आणि त्यातील अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह - द्वि-क्षेत्रीय आणि त्रि-क्षेत्रीय प्रतिमान इ. घटकांची माहिती यात दिलेली आहे. तर प्रकरण 2 मध्ये चलनवाढ / चलनविस्तार हे असून यात चलनविस्तार: अर्थ आणि व्याख्या चलनविस्ताराची कारणे, चलनविस्ताराचे परिणाम, मागणीजन्य आणि खर्चजन्य चलनविस्तार, फिलीप्स वक्र स्टॅगफ्लेशन (Stagflation): अर्थ तसेच प्रकरण-3 यात मौद्रिक आणि राजकोषीय धोरण (Monetary Fiscal Policy) यात मौद्रिक धोरण: अर्थ, व्याख्या आणि मौद्रिक धोरणाची साधने, राजकोषीय धोरण: अर्थ, व्याख्या आणि राजकोषीय धोरणाची साधने इ. घटकांचा विचार केलेला आहे. त्यांमुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांना विविध संकल्पनांची माहिती व्हावी, देशाची आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थिती समजावी, हा हेतू पुस्तकाचे लिखाण करतांना विचारात घेतलेला आहे.
‘स्थूल अर्थशास्त्र-प्रात्यक्षिक’ सत्र-4 प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्यांच्या आधारे ‘स्थूल अर्थशास्त्र’ (समग्रलक्षी अर्थशास्त्र) यांचे सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे.अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, व विस्तृतपणे मांडणी केली आहे. त्यासंदर्भातील अलिकडील अद्ययावत माहितीचे संदर्भ, आवश्यक तेथे सूची, तक्ते, आकृत्यांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने सूचविलेल्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा आवर्जून वापर केलेला आहे. विविध तज्ज्ञांचे संशोधन लेख मुक्त विद्यापीठ पुस्तके, संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीचाही अवलंब केलेला आहे. तर या पुस्तकातील भाग-2 मध्ये घटक निहाय संभाव्य 15 प्रात्यक्षिक यादी, प्रात्यक्षिक मार्गदर्शक तत्वे, घटक निहाय सर्व संभाव्य प्रात्यक्षिक उद्दिष्टे, थोडक्यात रूपरेषा इ.बद्दल सविस्तर माहिती प्रतिमानानुसार देलेली आहे.त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना प्रात्यक्षिक कार्य करण्यासठी उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.