Your cart is empty now.
‘इतिहासलेखनशास्त्र परिचय’ या ग्रंथात एकूण आठ प्रकरणांचा अंर्तभाव आहे. इतिहासलेखनशास्त्राचा परिचय, इतिहासलेखनाची परंपरा, सहाय्यक आणि सहाय्यकारी शाखा, इतिहासाचे प्रकार, इतिहासाची साधने, संशोधन पद्धती, इतिहासलेखनातील प्रवाह व भारताने प्रख्यात इतिहासकार या आठ प्रकरणात ‘इतिहासलेखनशास्त्राचा परिचय’ आम्ही लेखकांनी मांडलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अन्वये तृतीय वर्ष बीए सत्र पाच व सहासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ बी.ए. तृतीय वर्ष इतिहास स्पेशल च्या विद्यार्थ्यांना इतिहासलेखनाची आवड संशोधनात्मक पध्दतीने व्हावी यासाठी अगदी साध्या व सोप्या भाषेत प्रस्तूत ग्रंथात प्रकरणांची मांडणी केलेली आहे.
प्रकरण एक मध्ये इतिहासलेखनशास्त्राचा परिचय यात इतिहासाची व्याख्या, अर्थ, स्वरूप, व्याप्ती, इतिहासलेखनशास्त्राचे महत्त्व हे घटक विद्यार्थ्यांना समजवावे या अनूषंगाने मोजक्या शब्दांत मांडलेले आहे.
प्रकरण दोन हे इतिहासलेखनाची परंपरा या शीर्षकाचे असून, यात ग्रीक, रोमन व प्राचीन भारतीय इतिहासलेखनशास्त्राची परंपरेतील काळातील देश स्थळातील इतिहासकार त्यांच्या लिखानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या आधारे मांडणी केली आहे.
‘सहाय्यक आणि सहाय्यकारी शाखा’ या प्रकरण तीनमध्ये भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, नाणकशास्त्र आणि शिलालेखशास्त्र. या इतिहासाशी सहसंबंध व सहानुभूत असणाऱ्या शाखा यांचा अनेक उदाहरणांसह वर्णन प्रस्तुत प्रकरणात केलेले आहे.
प्रकरण चार हे इतिहासाचे प्रकार या शीर्षकाचे असून यात इतिहासांच्या विविध प्रकारचे वर्णन केलेले आहे. त्यात राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास, व लष्करी इतिहासाचा प्रामूख्याने समावेश आहे.
इतिहासाचे लिखाण साधनांशिवाय होऊ शकत नाही. ‘साधन नाही इतिहास नाही’ असे म्हटले जाते याच अनूषंगाने प्रकरण पाच हे ‘इतिहासाची साधने’ शीर्षकाचे असून यात वाचकांना इतिहास साधनांची उपयूक्तता, साधने, साधनांचे प्रकार यांसबंधी माहिती तसेच प्राथमिक, दुय्यम, मौखिक व परकीय प्रवास वृत्तांत या घटकांची माहिती उदाहरणांच्या सहाय्याने वाचक-संशोधकापूढे दिली आहे.प्रकरण सहा हे संशोधन पध्दतीचे असून यात विद्यार्थ्यांना संशोधन कसे? का? व कशासाठी? करावे या भूमिकेतून संशोधन विषयाची निवड, आढावा, उदिष्ट्ये, गृहीतके यांची ओळख उदाहरणांसह दिलेली आहे.
‘इतिहासलेखनातील प्रवाह’ या सातव्या प्रकरणात वसाहतवादी इतिहासलेखन, राष्ट्रवादी, मार्क्सवादी इतिहासलेखन, वंचितांचा अभ्यास या विविध इतिहासलेखनातील प्रवाहांचे वर्णन केलेले आहे.
विद्यार्थ्यांना इतिहास अभ्यासतांना भारतातील प्रख्यात इतिहासकारांची ओळख व्हावी या उद्देशाने प्राचीन, मध्ययूगीन व आधूनिक इतिहास व इतिहासकारांचा परिचय शेवटच्या आठव्या प्रकरणात दिलेला आहे. सदर ग्रंथ पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांना वाचकांना, अभ्यासकांना, संशोधकांना आवडले यातून संशोधनाची निर्मिती होईल, इतिहास परिपूर्ण होईल, इतिहासाची व्याप्ती कळेल, स्वरूप बदलेल, खरा इतिहास समोर येईल, सर्वसामान्य व्यक्ति इतिहासाचा नायक व अभ्यासक बनेल.