Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock


नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वर्णनात्मक भाषा विज्ञान व खानदेशातील बोली संदर्भातील अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत...

  • Name : भाषा विज्ञान आणि खानदेशातील बोली (Bhashavdnyan ani Khandeshatil Boli)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | V & VI | Marathi
  • Manufacturing : August 2026
  • Total Pages : 128 Pages
  • Barcode : 9789377761653

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भाषा विज्ञान आणि खानदेशातील बोली (Bhashavdnyan ani Khandeshatil Boli)
- +


नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठाच्या तृतीय वर्ष कला शाखेसाठी असलेल्या वर्णनात्मक भाषा विज्ञान व खानदेशातील बोली संदर्भातील अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे संपादन करताना आनंद होत आहे. 
मानवी संस्कृतीच्या समृद्ध आणि प्रदीर्घ इतिहासात सर्वात मौलिक आणि क्रांतिकारक शोध कोणता असेल, तर तो म्हणजे ‘भाषा’. भाषा ही केवळ माणसाच्या विचारांच्या देवाणघेवाणीचे माध्यम नसून, ती मानवी संवेदना, संस्कृती, लोकपरंपरा आणि समाजमन व्यक्त करणारे जिवंत व्यासपीठ आहे. निसर्गाने मानवाला दिलेली ही एक अलौकिक देणगी आहे. मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या सार्थ ध्वनींच्या आधारे मानवाने संवादाची एक अद्भूत आणि प्रभावी व्यवस्था उभी केली. हीच व्यवस्था सामाजिक व्यवहाराचा, विचारांच्या प्रकटीकरणाचा आणि मानवी ज्ञानाच्या पिढ्यानपिढ्या जतन व संवर्धनाचा मुख्य पाया बनली. भाषा ही प्रवाही, सजीव आणि सातत्याने बदलणारी असते. तिच्या या परिवर्तनाचा, अंतरंगाचा, ध्वनीरचनेचा, रूपरचनेचा आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंधांचा वस्तुनिष्ठ व शास्त्रीय अभ्यास म्हणजेच ‘भाषाविज्ञान’ होय. भाषाविज्ञानाचा अभ्यास म्हणजे केवळ व्याकरणाचे कोरडे नियम शिकणे नव्हे; तर भाषेची जैविक रचना, तिची मानवी मेंदू आणि समाजाशी असलेली नाते सांगणारी जडणघडण समजून घेणे होय. हाच आधुनिक भाषावैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा आणि भाषेच्या सूक्ष्म घटकांचा परिचय सुलभ व रंजक रीतीने व्हावा, या उद्देशाने ‘भाषाविज्ञान आणि खानदेशातील बोली’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.
खानदेश हा लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि समृद्ध बोलीपरंपरेचा एक ऐतिहासिक आणि संपन्न भूभाग आहे. तापी, गिरणा, पांझरा,बोरी आणि अनेर या पवित्र नद्यांच्या खोऱ्यात फुललेली खानदेशी संस्कृती आणि तिची लोकबोली ‘अहिराणी’ ही मराठी भाषेचे एक अमूल्य भूषण आहे. अहिराणीसोबतच खानदेशातील भौगोलिक व सामाजिक पटलावर ‘भिल्ल बोली’, ‘गुर्जरी’ आणि ‘तावडी’ या बोलींचे स्वतंत्र आणि वैभवशाली अस्तित्व आहे. बोलीभाषा ही नेहमीच प्रमाणाभाषेची जननी राहिली आहे; ती लोकजीवनाचा उबदार स्पर्श आणि मातीचा गंध घेऊन जगणारी असते. प्रस्तुत ग्रंथात भाषा विज्ञानाच्या सैद्धांतिक 
चौकटीसोबतच खानदेशातील या प्रमुख बोलींच्या ध्वनीविषयक, रूपविषयक आणि भाषावैज्ञानिक वैशिष्ट्यांचा सखोल आणि वस्तुनिष्ठ अभ्यास समाविष्ट केला आहे.
प्रस्तुत ग्रंथ. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमावर आधारित आहे. या विवेचनात मर्यादित हेतू न ठेवता सर्वसमावेशक असे विश्लेषण घटक निहाय केले आहे म्हणून हा ग्रंथ केवळ पदवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी मर्यादित नसून, मराठी भाषेचे प्राध्यापक, संशोधक, बोलीभाषांचे अभ्यासक आणि मराठी साहित्याच्या प्रेमींसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आम्हाला वाटतो. भाषाविज्ञानासारखा काहीसा क्लिष्ट आणि तांत्रिक वाटणारा विषय सोप्या मराठीत, उदाहरणांसह आणि आकृत्यांच्या साहाय्याने सुबोध कसा करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

प्रकरण 1.......................................................................7
भाषा स्वरूप आणि लक्षणे
1.1 भाषेचे स्वरूप
1.2 भाषा म्हणजे काय?
1.3 भाषेची संदेशन प्रक्रिया
1.4 भाषेची लक्षणे
1.5 भाषाभ्यासाची प्रमुख अंगे
1.6 भाषा अभ्यासाच्या पध्दती

प्रकरण 2.....................................................................28
स्वन विज्ञान
2.1 स्वनविज्ञान : संकल्पना
2.2 वागिद्रियाची रचना व कार्य
2.3 स्वनांचे वर्गीकरण
2.3.1 उच्चारण स्थानावर आधारलेले स्वनांचे वर्गीकरण
2.3.2 प्रयत्नावर आधारीत स्वन

प्रकरण 3.....................................................................45
खानदेशातील प्रमुख बोलींचा परिचय
3.1 बोली संकल्पना व स्वरूप
3.2 प्रमाणभाषा व बोली
3.3 खानदेशातील प्रमुख बोलींचा परिचय
प्रकरण 4.....................................................................61
बोलींची वैशिष्ट्ये
4.1 खान्देश : भौगोलिक क्षेत्र
4.2 खान्देशातील अहिराणी बोली

4.3 खान्देशी बोलीचे क्षेत्र व प्रकार
4.4 बोलीभाषांची वैशिष्ट्ये
प्रकरण 5.....................................................................72
स्वन संकल्पना
5.1 स्वनिम म्हणजे काय?
5.2 स्वन, स्वनिम, स्वनांतर यांचा परस्पर संबंध
5.3 स्वनिम विनीयोगाचे प्रकार

प्रकरण 6.....................................................................89
रुपिम विन्यास
6.1 रुपिम संकल्पना व स्वरूप
6.2 रुपिका, रुपिम, यांचा परस्पर संबंध
6.2 रुपिमाचे प्रकार

प्रकरण 7....................................................................107
बोलींची वैशिष्ट्ये
7.1 गुर्जर बोलीची वैशिष्ट्ये
7.2 तावडी बोलीची वैशिष्ट्ये
7.3 गुर्जर व तावडी बोलीची वैशिष्ट्य

सराव प्रश्नसंग्रह..............................................................120

संदर्भ ग्रंथसूची...............................................................124

💬

Chat with us