{"title":"Sociology","description":"","products":[{"product_id":"ग्रामीण-समाज-काल-आज-आणि-उद्या","title":"ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या","description":"\u003cp\u003eभारतातील जवळपास 70% जनता ही आजही खेड्यात वास्तव्यास आहे. या ग्रामीण भागातच भारताची खरी संस्कृती जपण्याचे कार्य केले जाते. त्यात समाजाच्या परंपरा, शिक्षण, साहित्य, चालीरिती यांचा समावेश होतो.\u003cbr\u003eग्रामीण समाजाच्या ‘काल’ या घटकात प्राचीन काळातील परंपरा व शिक्षणपद्धती यांचा समावेश केला आहे. समाजाचे दुःख, वेदना, त्यांच्या परंपरा यांचे लिखीत प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात दिसून येते. त्यामुळे ग्रामीण साहित्यात त्या काळातील स्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणजे शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच ग्रामीण जनतेचा निर्णय प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी अस्त्त्विात आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था, बिगगर सहकारी संस्थांचा सहभाग व भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या घटकांवरच ग्रामीण समाजाचे भविष्य अवलंबून आहे. एकंदरीत ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण अभ्यासाच्या दृष्टीने वरील सर्व घटकांचा कालानुरुप समावेश या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eGramin Samaj : Kal, Aaj Ani Udya\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470893068517,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Samaj-d-1.jpg?v=1772020069"},{"product_id":"ग्रामीण-समाजाची-मूलतत्त्वे","title":"ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470894969061,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-samajachi-Multatve-1.jpg?v=1772020221"},{"product_id":"ग्रामीण-समाज-व-विकास","title":"ग्रामीण समाज व विकास","description":"\u003cp\u003eमानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाला स्वतःच्या विकासासाठी समाजावरच अवलंबून रहावे लागते. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचाही निर्णय प्रक्रियेत समावेश केला आहे. वैदिक काळापासून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष ग्रामविकासात सहभाग असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी मांडली. त्यातूनच पुढे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर सरकारी संस्था, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना मोलाच्या ठरल्या आहेत. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील ग्रामीण जनतेच्या विकासात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा यासाठी पंचायतराज, बिगर सरकारी संस्था, विविध शासकीय योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470895395045,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Gramin-Samaj-v-vikas-_1.jpg?v=1772020338"},{"product_id":"बालकामगार-समस्या-व-समाधान","title":"बालकामगार समस्या व समाधान","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. आर. के. शेख विदर्भातील प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे गेल्या पाच वर्षापासून पदव्यूत्तर अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणुन अध्यापनाचे कार्य करित आहेत. याआधि त्यांनी या संस्थेअंतर्गत डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे 28 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचा अर्थशास्त्र विषयाचा अध्यापनाचा एकूण अनुभव 33 वर्षाचा आहे. संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च आचार्य पदवी (पीएच.डी.) बालकामगारासारख्या ज्वलंत विषयावर 2007 मध्ये संपादित केली आहे. त्यांच्या आचार्य पदवी संशोधनाचा विषय, ‘अकोला जिल्ह्यातील लघुउद्योगात काम करणार्या बालकामगारांच्या समस्या व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण’ हा होता. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये पीएच.डी. चे मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विद्यार्थ्यांनी संशोधन प्रबंध विद्यापिठाला सादर केले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून आतापर्यंत त्यांचे विविध परिषदांमधून 35 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे विविध वर्तमानपत्रे व नियतकालीकांमधून त्यांचे विविध आर्थिक विषयांवरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या सं.गा.बा. अमरावती विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यासमंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. एक अभ्यासू, विद्यार्थाप्रिय प्राध्यापक म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470943301861,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Balkamgar-1.jpg?v=1772023463"},{"product_id":"प्रारंभिक-समाजशास्त्र","title":"प्रारंभिक समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473880002789,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Praranbhik-Samajshastra-1.jpg?v=1772088103"},{"product_id":"rural-industrialisation-in-india","title":"Rural Industrialisation in India","description":"\u003cp\u003eSociety can flourish when all sections of populace, sectors of economy and different regions can draw benefits to prosper and progress. Despite India becoming a major power in terms of reasonably high growth rate, it is the home of the largest number of poor. There is a paradoxical situation that benefits of growth have not percolated to all regions and segments of population. Incidence of poverty on account of deprivation in many areas, in terms of socio-economic infrastructure is more evident in rural India. The book centers around this core theme hence takes up the case for rural folks living in countryside. The book covers suggestions based on appraisal to make rural industrialisation more pragmatic and practical in the present context of globalisation. It helps readers in better assimilation on the subject.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477550313701,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rural-Industrialisation-in-India_cnvt-1.jpg?v=1772180604"},{"product_id":"आदिवासींची-शैक्षणिक-स्थिती","title":"आदिवासींची शैक्षणिक स्थिती","description":"\u003cp\u003eसमाजकार्य अभ्यासक्रमात क्षेत्रकार्य हे समाजकार्य शिक्षणाचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. क्षेत्रकार्याचे पर्यवेक्षण करित असतांना आदिवासी भागातील, डोंगरात वास्तव्य असणार्या अनेक गावातील परिस्थितीचा अभ्यास करतांना तेथील मुलांचे शिक्षणाचे तसेच त्या भागात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात आले. त्या भागातील शिक्षणाच्या अशा परिस्थितीस कारणीभूत वरवर काही कारणे लक्षात जरी आली तरी त्या संदर्भातील वास्तविक कारणे काय असावित याची उत्सुकता निर्माण झाल्यामुळे त्या विषयी या आदिवासी शिक्षणाच्या स्थितीबाबतचे अध्ययन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या शिक्षकाच्या माध्यमातून तसेच प्राथमिक शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी व आदिवासी आश्रमशाळांमधून शिक्षण घेवून विविध पदांवर कार्यरत असणार्या व्यष्टींच्या माध्यमातून तथ्य संकलीत करण्यात आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eAadivasinchi Shaikshanik Sthiti\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477703831781,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasinchi-Shaikshanik-Sthiti-1.jpg?v=1772185871"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-व-मूलाधार","title":"समाजशास्त्र : परिचय व मूलाधार","description":"\u003cp\u003eमनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSamajshastra Parichay Aani Muladhar\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477755703525,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastracha-Parichay_Dr-Sudhakar-Jadhav_cnvt-1.jpg?v=1772189073"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477806559461,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra-1.jpg?v=1772190902"},{"product_id":"राजकीय-समाजशास्त्र-1","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477814751461,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Rajkiya-Samajshastra_Mahendra_cnvt-1.jpg?v=1772190971"},{"product_id":"समाजशास्त्रातील-मूलभूत-संकल्पना","title":"समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणत्याही भूप्रदेशावरील मानवांच्या परस्पर संबंधांची व्यवस्था किंवा पद्धती म्हणजे समाज होय. एकविसाव्या शतकाकडे झेपावणार्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. मात्र या विकासाबरोबर सामाजिक विकासाचीही आवश्यकता भासली. समाजाच्या विकासाचा, सामाजिक संबंधांचा किंवा सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा पाया घातला गेला. समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक नियंत्रण व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. 1924 साली डॉ. गोविंद घुर्ये यांनी भारतातील आदिवासी समुदाय, जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, भारतीय रुढी, प्रथा व परंपरांचे सामाजिक कार्य अशा विविध विषयांवर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून संशोधन केले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणार्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सदर पुस्तकात विविध मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815505125,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshtratil-Mulbhut-Sankalpna_FNL-1.jpg?v=1772191223"},{"product_id":"समाजशास्त्र-परिचय-1","title":"समाजशास्त्र परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक युगात समाजशास्त्रामध्ये नवीन परिवर्तनाचा अभ्यास होत असल्यामुळे समाजशास्त्राशिवाय सामाजिक घटनांचा अभ्यास करणे शक्य नाही. समाज, सामाजिक जीवन, सामाजिक घटना, व्यक्ती-व्यक्तींमधील परस्परसंबंधाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्र हे पायाभूत सामाजिकशास्त्र असल्यामुळे त्याचे महत्त्व सर्वत्र मान्य करण्यात आले आहे. भारतीय सामाजिक समस्यांचे अध्ययन करण्यामध्ये समाजशास्त्र विषयाचे विशेष योगदान आहे. समाजशास्त्र सामाजिक घटना व प्रक्रियांचे अध्ययन करते. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे सामाजिक घटना व सामाजिक प्रक्रियांचा परिपूर्ण अभ्यास होतो. समाजशास्त्र नवनवीन परिस्थितीचे आयोजन करण्यास शिकविते. भारतात सर्वप्रथम 1919 मध्ये मुंबई विश्वविद्यालयामध्ये प्रोफेसर पॅट्रीक गिडीस व 1924 मध्ये डॉ. गोविंद घुर्ये यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मूलभूत संकल्पना, समाजाचा सभासद असणार्या मानवी प्राण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योगदान देत असलेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक अनुचन, विचलन तसेच सामाजिक नियंत्रण, सामाजिक चळवळी, सामाजिक स्तरीकरण व परिवर्तन इ. घटकांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477815603429,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajshastra-Parichay_Kirdak_cnvt-1.jpg?v=1772191297"},{"product_id":"सामाजिक-मानवशास्त्र","title":"सामाजिक मानवशास्त्र","description":"\u003cp\u003eआधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477818880229,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manavshastra_Dr-Sudha-Khadke_cnvt-1.jpg?v=1772191403"},{"product_id":"सातपुड्यातील-आदिवासी-भिल्ल","title":"सातपुड्यातील आदिवासी भिल्ल","description":"\u003cp\u003eठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. धुळे, नंदुरबार व जळगावमध्ये भिल्ल, पावरा, मावची कोकणी अशा जमाती प्रामुख्याने आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव भारताचे मुळनिवासी यांचे पारंपारिक जीवन विविध माध्यमातील कला विष्कारांनी संपन्न समृद्ध झाले आहे. संगीत, नृत्य, नाट्य, मौखिक, वाङ्मय यामुळे जीवनातील दुःख, दारिद्य्र सोसूनही आनंदी राहण्याची कला त्यांनी शतकानुशतके जोपासली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआदिवासींच्या जीवनाचे विविध पैलू समजून घेऊन आदिवासींची भाषा, कुळे, गोत्रे, कुटुंब, समाज, प्रथा-पंरपरा, त्यातून आदिवासींची बनलेली विशिष्ट जीवनशैली आणि संस्कृती याविषयीच्या नोंदी सदरील पुस्तकात आहेत. सदरील माहिती एखाद्या अभ्यासकाप्रमाणे सूत्रबद्धरीतीने मांडलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ लहानसा का होईना, पण अभ्यासक, जिज्ञासू, विद्यार्थी तसेच सर्वांसाठी संदर्भसाधन म्हणून उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477826482405,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Satpudyatil-Adivasi-Bhill_cnvt-1.jpg?v=1772191479"},{"product_id":"लोकसहभाग-आणि-पी-आर-ए","title":"लोकसहभाग आणि पी.आर.ए.","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलोकसहभाग हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतचा बारकाईने विचार केला असता आपल्या असे लक्षात येते की, सर्वच लहान मोठी विकासाची असो अथवा विघातक स्वरूपाची असो कामे ही लोकसहभागातून झालेली आहेत. लोकांनी जर एखादे काम मनावर घेतले तर ते सांघिक प्रयत्नातून लिलया करू शकतात. लोकसहभाग म्हणजे एकीची शक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते. लोकसहभागात्मक विकास कार्यात लोकांच्या वेळ, श्रम, पैसा, बुद्धी आणि उपलब्ध संसाधनांचा सुरेख संगम असतो आणि म्हणून आज सर्व स्तरावरील विकासात्मक उपक्रमासाठी लोकसहभागाची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. सदर पुस्तकात लोकसहभागाचा अर्थ, संकल्पना, व्याख्या, लोकसहभागाकरीता अपेक्षीत कृती योजना, लोकसहभागाच्या संकल्पनेतून झालेले अपेक्षीत परिवर्तन, लोकसहभागाचे प्रकार, लोकसहभागातील अडथळे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय लोकसहभागात्मक मार्गाची आवश्यकता, लोकसहभागात्मक मार्गाचे फायदे, लोकसहभागात्मक मार्गातून प्रश्न सोडविण्याची पद्धत इ. विषयक बाबींवर देखील प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477834674405,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Loksahbhag-Aani-PRA_14_cnvt-1.jpg?v=1772191619"},{"product_id":"मानवी-हक्क-3","title":"मानवी हक्क","description":"\u003cp\u003eमानव म्हणून जगण्यासाठी आवश्यक, मानवाच्या नैसर्गिक अस्तित्वाशी संबंधित अशा सर्व अधिकारांना मानवाधिकार म्हणतात. प्रत्येकात आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी, आपले व्यक्तिगत गुण, बुद्धिमत्ता व स्वत्त्व भावनेची जपणूक करण्यासाठी मानवाधिकाराची आवश्यकता असते. मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क. अन्न, वस्त्र, निवारा, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, हिंसेपासून मुक्तता, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्या जगण्याचा भाग आहेत. स्वतंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधीची चर्चा हे हक्क करतात. तसेच मानवी हक्कांना नैतिक हक्क. तसेच कायदेशीर हक्क असेही म्हणता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात मानवाधिकार, बालविकास, महिला विकास, तरुणवर्गाचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वृद्धांचे कल्याण, कामगार कल्याण, अपंग कल्याण, लोकांचे पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण मूल्ये आणि नैतिकता इ. प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477910335717,"sku":null,"price":695.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Manvi-Hakka_cnvt-1.jpg?v=1772193863"},{"product_id":"research-methodology-in-social-sciences","title":"Research Methodology in Social Sciences","description":"","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479700746469,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Research-Methodology-in-Social-Science_cnvt-1.jpg?v=1772256273"},{"product_id":"आदिवासी-समाज-अस्तित्व-आणि-अस्मिता-खंड-२","title":"आदिवासी समाज अस्तित्व आणि अस्मिता (खंड – २)","description":"\u003cp\u003eआदिवासी समाज प्राचीन काल से जंगलो में निवास करता आया है| जंगलो, पहाडों और प्राकृतिक परिवेश में इन्हीं लोगों का वास्तव्य दिखाई देता है| आदिवासी लोग नगरीय संस्कृति से भिन्न लोग कहलाए जाते हैं| आदिवासीयों का अस्तित्व नगरीय संस्कृति से पूर्णत: भिन्न दिखाई देता है| आज भी अधिकांश आदिवासी समूह घने जंगलों, पर्वतीय क्षेत्रों या दूरस्थ गाँवों मेेंं झोपडियों में रहने वाला समूह है| स्थूल रुप से उनके वास्तविक निवास स्थान का अवलोकन किया जाए तो, शहरों से दूर देहात के लोग रहते हैं, और गॉव-देहातों से भी दूर आदिवासी लोग रहते हैं इसलिए शहरी जन-जीवन के विकसित रूप से कोसों दूर आदिवासी समाज का अस्तित्व दिखाई देता है| उनका रहन-सहन, खानपान, अस्तित्व और अस्मिता की सीमा-रेखाए औरों से अत्यधिक भिन्न दिखाई देती है|\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479840043237,"sku":null,"price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adivasi-Samaj-Astitva-Aani-Asmita-khand-1_c-1-800x1207.jpg?v=1772271006"}],"url":"https:\/\/prashantpublications.com\/collections\/sociology.oembed?page=2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}