Your cart is empty now.
शिवपूर्वकाळ व शिवकाळातसुद्धा इस्लामी शासकांच्या अन्यायांनी, अत्याचारांनी कहर केला होता. ते पदोपदी हिंदू बहुजन समाजाला पायदळी तुडवीत. हिंदू बहुजन, कष्टकर्यांना, शेतकर्यांना कोणीही वाली नव्हता. हिंदू स्त्रियांची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाई. हिंदू समाज परक्यांची चाकरी पत्करण्यात स्वत:ला धन्य समजत होता. महाराष्ट्रातील मराठ्यांजवळ पराक्रम होता, शौर्य होते, कष्ट करण्याची, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्याची धमक होती. परंतु त्यांच्यात एकी नव्हती. शहाजी राजे, जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपापसात झगडणार्या, वतनासाठी व क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा खून व मारामार्या करणार्या, मुसलमानी सत्तांची सेवा-चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानणार्या मराठा सरदारांसोबतच सर्वसामान्य मराठी माणसांनाही एकत्र आणले. प्रसंगी साम, दाम, भेद, दंड या नीतीचा अवलंबही केला. शिवाजी महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करून त्यांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित केले. अन्यायी, अत्याचारी इस्लामी आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. परिणामी बहुजन समाजातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केली. छत्रपती शिवरायांनी केलेले उदात्त कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र ठरले.
Chhatrapati Shivaji Maharaj : Eka Rashtranirmate