Your cart is empty now.
दूर संवेदन हे तंत्रज्ञान संगणक व अवकाश विज्ञानातील एक प्रभावी असे तंत्र आहे. पहिल्या महायुद्धानंतर हवाई छायाचित्रापासून सुुरुवात झालेल्या या तंत्राचा वापर आज शेती, खाणकाम, संरक्षण, बांधकाम, सर्वेक्षण, हेरगिरी, खाजगी उद्योग अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज उपग्रहाच्या मदतीने सगळ्या पृथ्वीचे व इतर ग्रहांचे, अवकाशातील तार्यांचे सेकंद आणि सेकंद चित्रण सुरू आहे. त्यातून भरपूर माहितीचे संकलन होत आहे.
दूर संवेदन तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील उपयोग यासाठी हे तंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे आहे. यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाची मराठी भाषेतून ओळख करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्या आमच्या विद्यार्थी मित्रांना व अभ्यासकांना या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होईल अशी आशा आहे.