Welcome to Prashant Publications

Rs. 325.00
Availability: 10 left in stock

मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मूलभूत समाजशास्त्रीय विचार
- +

मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.

Mulbhut Samajshashriy Vichar