Welcome to Prashant Publications

Rs. 395.00
Availability: 10 left in stock

अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून...

  • Name : समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Macro Economics
  • Manufacturing : 2026 / 02 / 23
  • Barcode : 9789390483587

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)
- +

अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.

Samagralakshi Arthashastra – SYBCOM