Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एस.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बदल केलेला आहे. एस.वाय.बी.कॉम. वर्गाच्या सेम-4 अभ्यासक्रमात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन हा...

  • Name : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन (Management of Co-operative Houshing Societies)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV
  • Barcode : 9789377762568

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन (Management of Co-operative Houshing Societies)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एस.वाय.बी.कॉम. अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून बदल केलेला आहे. एस.वाय.बी.कॉम. वर्गाच्या सेम-4 अभ्यासक्रमात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एस.वाय.बी.कॉम. 2024 पॅटर्न (एन.ई.पी 2020) अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

1. सहकारी गृहनिर्माण संस्थांची मूलतत्वे............................9
1.1 भारतातील सहकारी गृहनिर्माणाच्या लोकशाही प्रारूपाची उत्क्रांती
आणि विकास
1.2 सहकारी गृहनिर्माण संस्थांसमोरील समस्या आणि आव्हाने
1.3 इतर गृहनिर्माण प्रारूपांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांची वैशिष्ट्ये
1.4 गृहनिर्माण संस्थांचे वर्गीकरण
1.5 गृहनिर्माण संस्थांची नोंदणी प्रक्रिया आणि आदर्श पोटनियम
1.6 गृहनिर्माण संस्थेच्या सभासदत्वासाठी पात्रतेचे निकष
1.7 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचे अधिकार, दायित्वे आणि जबाबदाऱ्या.

2. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नियम व वाद निवारण..............30
2.1 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत सहकारी संस्थांच्या नोंदणीसंबंधी तरतुदी
2.2 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपनियम/उपविधी तयार करणे, दुरुस्ती करणे व अंमलबजावणी
2.3 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक, अधिकार व कार्ये
2.4 सभांचे प्रकार: वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि समिती सभा
2.5 पदाधिकाऱ्यांची भूमिका: अध्यक्ष, सचिव व खजिनदार
2.6 सदस्यांच्या तक्रारी हाताळणे व अंतर्गत वादांचे निवारण
2.7 शासकीय प्राधिकरणे, निबंधक व सहकारी न्यायालयाशी समन्वय साधणे
2.8 वैधानिक अनुपालन आवश्यकतांचे पालन
2.9 वाद निवारण यंत्रणा व कायदेशीर उपाययोजना

3. वित्तीय व कार्यात्मक व्यवस्थापन.................................88
3.1 गृहनिर्माण संस्थांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि निधीचे प्रकार
3.2 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील अंदाजपत्रक, लेखा, अंकेक्षण आणि करप्रणाली
3.3 थकबाकीदारांचे व्यवस्थापन आणि वसुलीची यंत्रणा
3.4 गुंतवणूक धोरणे आणि निधी वापराची मार्गदर्शक तत्त्वे
3.5 गृहनिर्माण संस्थांचे दैनंदिन प्रशासन
3.6 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील शाश्वतता पद्धती
3.7 गृहनिर्माण संस्थांची सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश नियंत्रण
3.8 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील विक्रेता निवड आणि कंत्राट व्यवस्थापन
3.9 सहकारी गृहनिर्माण संस्थांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि प्रतिबंधात्मक देखभाल
3.10 गृहनिर्माण संस्था व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाचा वापर
3.11 गृहनिर्माण संस्थांसाठी डिजिटल व्यवस्थापन साधने

संदर्भ ग्रंथसूची.....................................................126

💬

Chat with us