Welcome to Prashant Publications

Rs. 280.00 10% OFF
Availability: 10 left in stock

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने New Education Policy - 2020 (Revised from 2026-27) अंतर्गत पदवीस्तरासाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यानुसार बी.ए. तृतीय वर्ष, सत्र-5, मेजर पेपर-8...

  • Name : आधुनिक जगाचा इतिहास (इ.स. 1780-1920) History of Modern World (1780 AD-1920 AD)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 198 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक जगाचा इतिहास (इ.स. 1780-1920) History of Modern World (1780 AD-1920 AD)
- +

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने New Education Policy - 2020 (Revised from 2026-27) अंतर्गत पदवीस्तरासाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे. त्यानुसार बी.ए. तृतीय वर्ष, सत्र-5, मेजर पेपर-8 (आधुनिक जगाचा इतिहास: इ.स. 1780 ते इ.स. 1920) या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रस्तुत पाठ्यपुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.
सदर पुस्तकाचे लिखाण विद्यापीठाच्या अभ्यासक्रम चौकटीत राहून आणि विद्यार्थी हिताला प्राधन्य देऊन केले आहे. विद्यार्थ्यांसोबतच इतिहास विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. नेट, सेट परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांमध्ये या कालखंडावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जात असेल, त्यांनाही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच इतिहासाची आवड असणाऱ्या सामान्य वाचकांनाही यातून समृद्ध ऐतिहासिक माहिती मिळून वाचनाचे समाधान लाभेल, अशी खात्री वाटते.
या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, केवळ क्रमिक अभ्यासक्रमापुरते (1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते राष्ट्रसंघाची स्थापना, रचना, कार्य व अपयश) मर्यादित न राहता प्रत्येक युनिटमधील मुद्द्यांचे सविस्तर विश्लेषण देताना, आवश्यक त्या ठिकाणी सखोल संशोधनात्मक व अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक मुद्दा अथवा संकल्पना अतिशय विस्तृतपणे स्पष्ट करतानाच संपूर्ण कालखंडातील ऐतिहासिक सुसंगती कोठेही तुटणार नाही, याची विशेष काळजी घेतली आहे. पुस्तकाची भाषा वाचनीय, सोपी व सुबोध ठेवण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सराव स्वाध्यायासाठी महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्नसंच समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुलभ होईल.

1. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियन युग....................................9
(French Revolution and Napoleon Era)
1.1 फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे
(Causes of the French Revolution)
1.2 फ्रेंच राज्यक्रांतीतील प्रमुख घटना व परिणाम
(Key Events and Consequences of French Revolution)
1.3 नेपोलियन बोनापार्टचा उदय आणि कार्य
(Rise and Achievements of Napoleon Bonaparte)
1.4 नेपोलियन बोनापार्टचे पतन
(Downfall of Napoleon Bonaparte)

2. व्हिएन्ना परिषद आणि इटली व जर्मनीचे एकीकरण......................48
(Vienna Congress and Unification of Italy and Germany)
2.1 व्हिएन्ना परिषद (1815)
(Vienna Congress-1815)
2.2 इटलीचे एकीकरण (1870)
(Unification of Italy -1870)
2.3 जर्मनीचे एकीकरण (1871)
(Unification of Germany-1871)
2.4 इटली व जर्मनीच्या एकीकरणाचे परिणाम
(Consequences of the Unification of Italy and Germany)

3. बिस्मार्क आणि कैसर विल्यम द्वितीयच्या काळातील जर्मनी.............80
(Germany Under The Leadership of Bismarck and Kaiser Wilhelm II)
3.1. बिस्मार्कची विचारसरणी आणि अंतर्गत धोरण
(Bismarck's Ideology and Internal Policy)
3.2. बिस्मार्कच्या काळातील जर्मनीचे परराष्ट्र धोरण
(Foreign Policy of Germany under Bismarck)
3.3. कैसर विल्यम द्वितीयचे राज्यारोहण आणि अंतर्गत धोरण
(Accession of Kaiser Wilhelm- II and his Internal Policy)
3.4. कैसर विल्यम द्वितीयच्या काळातील जर्मनीचे परराष्ट्र धोरण
(Foreign Policy of Germany under Kaiser Wilhelm II)

4. पहिले महायुद्ध आणि संयुक्त राज्य अमेरिका...........................103
(World War -I and the United States of America)
4.1. पहिल्या महायुद्धाची कारणे
(Causes of the First World War)
4.2. पहिले महायुद्ध : प्रमुख घटना आणि परिणाम
(First World War: Key Events and Consequences)
4.3. पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा प्रवेश : कारणे व परिणाम
(Entry of the USA into the First World War: Causes and Consequences)
4.4. वुड्रो विल्सनची चौदा तत्त्वे
(Woodrow Wilson's Fourteen Points)

5. रशियन राज्यक्रांती आणि पॅरिस शांतता परिषद........................133
(Russian Revolution and Paris Peace Conference)
5.1. रशियन राज्यक्रांतीची कारणे (1917)
(Causes of the Russian Revolution-1917)
5.2. बोल्शेविक क्रांती (नोव्हेंबर 1917) आणि रशियन राज्यक्रांतीचे परिणाम
(Bolshevik Revolution (November-1917) And Consequences of Russian Revolution)
5.3. पॅरिस शांतता परिषद (1919)
(Paris Peace Conference-1919)
5.4. शांतता करार:व्हर्साय, सेंट-जर्मेन, न्युली, ट्रॉयनॉन आणि सिव्हर्सचा तह
(Peace Treaties:Versailles, Saint-Germain, Neuilly, Trianon & Sèvres)

6. राष्ट्रसंघ................................................................168
(League of Nations)
6.1. स्थापना, उद्दिष्टे आणि ध्येय
(Establishment, Aims and Objectives)
6.2. संघटना (रचना) आणि कार्ये
(Organization and Functions)
6.3. राष्ट्रसंघाची कामगिरी
(Achievements of the League of Nations)
6.4. अपयशाची कारणे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या निर्मितीमागील भूमिका
(Causes of Failure and Its Role in the Outbreak of World War II)

संदर्भ ग्रंथसूची...............................................................196

💬

Chat with us