Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक...

  • Name : प्रमंडळ कायदे आणि सचिवांची कार्यपद्धती (Corporate Law and Secretarial Practice)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBCom Sem I (VSC-1 116A)
  • Manufacturing : September 2024
  • Total Pages : 72 Pages
  • Barcode : 9789348040220

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

प्रमंडळ कायदे आणि सचिवांची कार्यपद्धती (Corporate Law and Secretarial Practice)
- +

प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक असतो. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या संदर्भात त्याचप्रमाणे विशेष करून सचिवाच्या कार्यपद्धती संदर्भात या पुस्तकांमध्ये पूर्णपणे विवेचन करण्यात आलेले आहे. सचिव हा कोणत्याही प्रकारच्या कंपनीतील उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील महत्त्वाची व्यक्ती असतो. प्रमंडळाच्या यश अपयशामध्ये सचिवाने घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत असतो. खरे तर सचिवाद्वारे कोणत्याही कंपनीची कायदेशीर धुरा सांभाळली जात असते. कंपनी कायदा 1956 नुसार व्यवसायाच्या संदर्भातील संपूर्ण तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर संकल्पनांचा या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 मधील जे ठळक बदल आहेत त्यांचाही अंतर्भाव सदर पुस्तकांमध्ये दिसून येईल. कंपनी कायदा 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्यांपैकी प्रमाणाच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि इतरच्या बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या विकासावर या कायद्याचा परिणाम होत असताना दिसून येतो. सदर पुस्तकामध्ये कंपनी कायद्याची ओळख त्याचबरोबर सचिवाचे कर्तव्य जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती संदर्भात सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. सदर पुस्तक लिहिताना विविध प्रकारच्या इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथ पाठ्यपुस्तके वेबसाईट शोधनिबंध यांचा वापर करण्यात आलेला आहे. 

1. कंपनीचा परिचय ............................................... 7
1.1 कंपनी परिचय
1.2 कंपनीची व्याख्या
1.3 कंपनीची वैशिष्ट्ये
1.4 कंपनीचे फायदे
1.5 कंपनीचे प्रकार

2. कंपनी कायद्याचा परिचय ...................................... 23

2.1 भारतातील कंपनी कायदा संकल्पनेचा ऐतिहासिक विकास
2.2 कंपनी कायदा 2013 ची प्रमुख वैशिष्ट्ये, 2013 कंपनी कायद्याचे ठळक मुद्दे
2.3 कंपनी कायदा, 1956 : दृष्टीक्षेप
2.4 कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट, 1980 : दृष्टीक्षेप

3. कंपनी सचिव .................................................. 42
3.1 ‌‘सचिव‌’ शब्दाची उत्पत्ती
3.2 व्याख्या आणि अर्थ
3.3 सचिवाची वैशिष्ट्ये
3.4 सचिवाचे महत्त्व
3.5 सचिवाचे प्रकार
3.6 सचिवाची कार्ये
3.7 सचिवाचे (चिटणिस) गुण
3.8 कायदेशीर स्थिती
3.9 वास्तविक स्थिती
3.10 सचिवाची पात्रता
3.11 सचिवाची नियुक्ती
3.12 कंपनीच्या सचिवाची हकालपट्टी
3.13 सचिवाची कर्तव्ये
3.14 सचिवाचे अधिकार आणि दायित्वे

संदर्भ ग्रंथसूची ...................................................... 68

💬

Chat with us