Your cart is empty now.
वद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी मानव विद्याशाखेच्या नवीन शैक्षणिक धोरण (NEP) नुसार प्रथम वर्ष कला (F.Y.B.A.)
वर्गासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2024-25 पासून लागू केला आहे. त्यानुसार ‘समाजशास्त्राचा परिचय’ हे क्रमिक पुस्तक अध्यापक व संशोधक यांच्या हाती देतांना आनंद होत आहे. या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना सुलभ रितीने मिळावी यासाठी सदरील पुस्तकाचे लेखन केले आहे. सदर अभ्यासक्रमात जुन्या आणि नवीन सिद्धांत व संकल्पनांचा सुरेख संगम साधला आहे. मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिकनियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तुत ‘समाजशास्त्राचा परिचय’ या पुस्तकात सहज, सुलभ व आकलनीय भाषेचा वापर करून विषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी विविध संदर्भ पुस्तकांचा वापर केला आहे.