Your cart is empty now.
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालखंड प्रारंभापासून ते मराठी सत्तेच्या अखेरपर्यंत आहे. या सहा-साडेसहा शतकांमध्ये सुरुवातीला तेराव्या शतकात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. नंतर बहामनी सत्ता, शिवकाळ, पेशवाई अशा सत्ता बदलत गेल्या. या सत्तांबरोबरच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक वातावरण बदलत गेले. या बदलांचे प्रतिबिंब त्या-त्या काळच्या वाङ्मयात पडले. यादवकाळ, बहामनीकाळ, शिवकाळ व पेशवेकाळ या राजकीय कालखंडांची सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी येथे विस्ताराने सांगितली आहे. या चारही कालखंडातील महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय व इतर संप्रदायातील वाङ्मय व महत्त्वाचे ग्रंथकार यांचा येथे निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय, बखर वाङ्मय व गद्य वाङ्मय या मध्ययुगीन वाङ्मयप्रवाहांचीही सविस्तर चर्चा केली आहे. ग्रंथकारांच्या चरित्राचा धावता आढावा घेऊन साहित्यकृतींच्या विवेचनाला महत्त्व दिले आहे. यादृष्टीने हे लेखन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सर्वांनाच लाभदायक ठरेल यात शंका नाही.
Madhyayugin Marathi Vadmayacha Sthul Itihas